‘चिरडायचं नसेल तर हाच एक पर्याय’; काँग्रेस, राष्ट्रवादीला सेनेचा सल्ला
वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या आघाडीची अखेर घोषणा झाली. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे महाविकास आघाडीबद्दल प्रश्न उपस्थित होताहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची भूमिका काय असेल, असाही प्रश्न यानिमित्ताने होत आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून शिवसेनेनं (UBT) महाविकास आघाडीतील मित्र पक्षांना सल्ला वजा इशारा दिलाय. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आघाडी केल्यानंतर उद्धव […]
ADVERTISEMENT

वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या आघाडीची अखेर घोषणा झाली. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे महाविकास आघाडीबद्दल प्रश्न उपस्थित होताहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची भूमिका काय असेल, असाही प्रश्न यानिमित्ताने होत आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून शिवसेनेनं (UBT) महाविकास आघाडीतील मित्र पक्षांना सल्ला वजा इशारा दिलाय.
प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आघाडी केल्यानंतर उद्धव ठाकरे आधीच्या दोन मित्र पक्षांना कसं, टिकवून ठेवणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला स्वीकारणार का, याची उत्सुकता आहे. त्यातच आज सामना अग्रलेखातून शिवसेनेनं (UBT) महाविकास आघाडीतील दोन्ही मित्र पक्षांना भविष्यातील धोक्याचा इशारा देताना जुळवून घेण्याचाच सल्ला दिलाय.
शिवसेनेनं (UBT) सामना अग्रलेखात म्हटलंय की, “प्रकाश आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या वंचित बहुजन आघाडीस मागच्या सार्वत्रिक निवडणुकीत 14 टक्के मते मिळाली व त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या युतीचे नुकसान झाले. आंबेडकरांनी मार्ग बदलल्यामुळे यापुढे मतविभागणी टाळता येईल व लोकसभा, विधानसभा निवडणुकांत हुकूमशाही प्रवृत्तीचा पराभव करता येईल.”
Uddhav Thackeray : मोदी आले तरी ‘बाळासाहेबांशिवाय’ मतं मिळू शकत नाहीत!