Shiv Sena Mlas case : सरन्यायाधीशांचे विधानसभा अध्यक्षांना खडेबोल, समजून घ्या 9 मुद्द्यांमध्ये - Mumbai Tak - shiv sena mlas disqualification case supreme court dy chandrachud rahul narvekar ekanth shinde vs udhhav thackeray read full story - MumbaiTAK
बातम्या राजकीय आखाडा

Shiv Sena Mlas case : सरन्यायाधीशांचे विधानसभा अध्यक्षांना खडेबोल, समजून घ्या 9 मुद्द्यांमध्ये

सर्वात आधी सरन्यायाधीशांनी सविस्तर सुनावणी 3 आठवड्यांनंतर होईल असं म्हटलं होतं. त्यानंतर ही सुनावणी 2 आठवड्यानंतर होईल असं म्हटलं. तसंच विधानसभा अध्यक्ष राहुला नार्वेकर यांना अपात्रतेबाब निर्णय घेण्यासंदर्भात काय कारवाई करणार याचं वेळापत्रक देण्यासाठी एक आठवड्यात सादर करण्याच्या सुचना दिल्या आहे.
shiv sena mlas disqualification case supreme court dy chandrachud rahul narvekar ekanth shinde vs udhhav thackeray read full story

Shiv sena mlas disqualification case supreme court : आमदारांच्या अपात्रतेच्या रखडलेल्या सुनावणीवर सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना आजच्या सुनावणीत फटकारलं. सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली नाही, मात्र याचिकेचं लिस्टिंग झालं होतं. ठाकरे गटाच्या याचिकांची सुनावणी सरन्यायाधीशांनी सुरुवातीला 3 आठवड्यानंतर आणि त्यानंतर दोन आठवड्यानंतर घेणार असल्याचं सांगितलं. सविस्तर सुनावणी होणार असल्याचंही सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे. (shiv sena mlas disqualification case supreme court dy chandrachud rahul narvekar ekanth shinde vs udhhav thackeray read full story)

अपात्रतेच्या मुद्यासंदर्भात 11 मेच्या निकालात सुप्रीम कोर्टाने निकाल देऊन कोणतीच कारवाई झाली नसल्याबाबतही सरन्यायाधीशांनी प्रश्न उपस्थित केला. आजच्या या सुनावणीत सरन्यायाधीश काय म्हणाले ते बघा….

हे ही वाचा : Special Parliament Session : मोदीजींना हात जोडून विनंती, सुप्रिया सुळेंनी भाजपला पुन्हा घेरलं

सर्वात आधी सरन्यायाधीशांनी सविस्तर सुनावणी 3 आठवड्यांनंतर होईल असं म्हटलं होतं. त्यानंतर ही सुनावणी 2 आठवड्यानंतर होईल असं म्हटलं. तसंच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना अपात्रतेबाब निर्णय घेण्यासंदर्भात काय कारवाई करणार याचं वेळापत्रक देण्यासाठी एक आठवड्यात सादर करण्याच्या सुचना दिल्या आहे.

या सुनावणीवेळी धनंजय चंद्रचूड म्हणाले

1) महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना अपात्रतेच्या याचिकेवरती निर्णय घ्यावाच लागेल.
2) विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणात उशीर करू नये.
3) असं दिसतंय की निवडणूक आयोगाला नोटीस काढण्याच्या पलीकडे काहीच केलेलं नाही.
4) सुप्रीम कोर्टात 11 मेला दिलेल्या निर्णयावेळी आम्ही कालमर्यादा ठरवून दिली नव्हती. पण, अध्यक्षांनीसुध्दा सुप्रीम कोर्टाची प्रतिष्ठा सांभाळणं आवश्यक आहे.
5) आम्ही अध्यक्षांना निर्णय घ्यायला सांगितले. चार महिने उलटले नोटीस पाठवण्याच्या पलिकडे काय झालंय? असा सवालही सरन्यायाधीशांनी उपस्थित केला.
6)अध्य़क्षांना सुनावणी करावीच लागेल आणि त्यांना सुनावणीच्या तारखाही द्याव्या लागतील.
7) आम्हांला अपात्रतेच्या सुनावणीचं वेळापत्रक आठवड्याभरात द्या असा आदेशही सरन्यायाधीशांनी दिला.
8) अनिश्चित कालावधीसाठी ही सुनावणी चालू शकत नाही, असं महत्त्वाचं विधानही चंद्रचूड यांनी केलं.
9) दोन आठवड्यानंतर आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी होईल तर शिवसेनेच्या चिन्ह आणि नावावर तीन आठवड्यानंतर सुनावणी होणार, असं सरन्याधीश म्हणाले.

सुप्रीम कोर्टाने आमदार अपात्रतेबाबतच्या सुनावणीचं वेळापत्रक बनवण्याबद्दलची सूचना अध्यक्षांना दिली. कोर्टाच्या निर्णयाचा आदर राखला जाईल, अशी अपेक्षा करतो. अध्यक्षांनी एका आठवड्यात सुनावणी सुरू करावी आणि आम्हाला स्टेटस रिपोर्ट द्यावा, असं चंद्रचूड म्हणाले.

हे ही वाचा : Crime News : अवघ्या 115 रुपयांवरून पेटला वाद अन् थेट मित्रावरच केले सपासप वार!

स्वरा भास्कर बनली आई , मुलीला दिला जन्म… Team India विश्वचषक जिंकण्याची शक्यता, कारण आहे खूप खास! तुमचीही प्रेमात उडालीये झोप? कारण… परिणीती, कियारा, आलिया… लग्नानंतर अभिनेत्रींचे व्हायरल लुक! राजेशाही लग्नातही परिणीतीच्या पायात दिसले स्वस्त सँडल, किंमत बघून विश्वास बसणार नाही VIDEO: iPhone 15 साठी तुफान मारहाण, दुकानात नेमकं काय घडलं? Parineeti Chopra निघाली सासरी, राघव चड्ढांसोबतचे व्हायरल Photo भारतातील ‘ही’ 7 पर्यटन स्थळं, परदेशी स्थळांनाही टाकतात मागे! कपल्ससाठी पुण्यातील जपानी शैलीचं बेस्ट गार्डन… जे मैत्रीचं आहे खास प्रतिक! Raghav-Parineeti यांचा शाही विवाह! पाहिलेत का खास फोटो? सर्पाच्या जोडीचा चिमुकल्यांवर प्राणघातक हल्ला! अखेर… डोक्यावर फेटा, काळा चष्मा… राघव चड्ढांचा रॉयल वेडिंग लुक! 6,6,6,6.. सूर्याने रचला इतिहास, कोहलीचाही मोडला ‘तो’ विक्रम! Premanand Maharaj : ‘या’ 2 गोष्टी करा… विघ्न जातील अन् येतील चांगले दिवस! Jasprit Bumrah ला दुसऱ्या वनडेत का खेळवलं नाही? Katrina Kaif प्रेग्नेंट? सगळीकडे विकी एकटाच का फिरतो? Jio air fiber vs Jio fiber : तुमच्यासाठी कोणतं कनेक्शन फायद्याचं? Alibaug मधील ‘ही’ ठिकाणं नक्की करा एक्सप्लोर! तुमच्या मोबाईलमधील इंटरनेटचे स्पीड कमी झाले असेल तर हे पर्याय निवडा घरच्या घरी बनवा तुमच्या आवडीचं चीज! सोपी आहे रेसिपी…