शिवसेना-राष्ट्रवादीच्या 'त्या' वादाचं गुपित भास्कर जाधवांनी केलं क्लिअर!

राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाच्या वेळी शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये काही वाद झाल्याचं वृत्त समोर येत होतं. ज्याविषयी शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
शिवसेना-राष्ट्रवादीच्या 'त्या' वादाचं गुपित भास्कर जाधवांनी केलं क्लिअर!
shiv sena ncp dispute rajyasabha election mla bhaskar jadhav clears secret(फाइल फोटो)

मुंबई: राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु होऊन काही वेळ होत नाही तोच अशा बातम्या समोर येऊ लागल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आपला उमेदवारासोबत कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून मतदानाचा कोटा 42 वरुन 44 केल्याचं बोललं जात होतं. पण या सगळ्या वादाचं नेमकं गुपित काय आहे हे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी क्लिअर केलं आहे.

जेव्हा अशा प्रकारच्या बातम्या समोर आल्या तेव्हा मात्र, शिवसेनेत काहीशी अस्वस्थता निर्माण झाली होती. राजकीय वर्तुळात अशीही चर्चा सुरु झाली की, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या या भूमिकेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रचंड संतप्त झाले आहेत. मात्र, जेव्हा 'मुंबई Tak'ने शिवसेना आमदार भास्कर जाधव यांच्याशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी एकूण चर्चेबद्दल किंवा वादामागचं नेमकं गणित काय आहे ते सांगितलं.

पाहा भास्कर जाधव काय म्हणाले:

'आज आम्ही खूप आनंदी आहोत, खुशीत आहोत.. भाजपचे उमेदवार पराभूत होऊन महाविकास आघाडीचे चारीच्या चारी उमेदवार चांगल्या मताने निवडून येतील काही चिंता करण्याचं कारण नाही. गुलाल आमचाच.. काही चिंता नाही, मिरवणूक आमचीच.' अशा विश्वास भास्कर जाधव यांनी व्यक्त केला.

'कोणी कोणाला मतदान करावं हा त्यांचा-त्यांचा हक्क आहे. त्या हक्कानुसार ते जर कोणाला मतदान करत असतील तर शेवटी लोकशाहीमध्ये मतदानाचा हक्क बजावणं हे कर्तव्य आहे म्हणून ते त्यांचं कर्तव्य बजावता येतं.' असं मत भास्कर जाधव यांनी व्यक्त केलं आहे.

'महाविकास आघाडीकडे पहिल्या राऊंडलाच चारही उमदेवार निवडून येतील एवढ्या मोठ्या प्रमाणात मताधिक्य आहे.'

shiv sena ncp dispute rajyasabha election mla bhaskar jadhav clears secret
Rajya sabha Election Live : शिवसेनेच्या संजय पवारांना राष्ट्रवादीसह कुणी-कुणी केलं मतदान?

'राष्ट्रवादी आणि काँग्रेसने मतांचा कोटा वाढवला वैगरे या सगळ्या फक्त बातम्या आहे. तुम्ही एक लक्षात घ्या गरज असेल तेवढीच मतं घेतली जातील आणि पहिल्या राऊंडलाच चारही उमेदवार निवडून येतील.' असं म्हणत भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत कोणताही वाद नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

शिवसेनेच्या संजय पवारांना राष्ट्रवादीसह कुणी-कुणी केलं मतदान ?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना शिवसेनेची १४ मते मिळाली आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसची ९, काँग्रेसची २, समाजवादी पार्टीची २, बच्चू कडू यांच्या प्रहारची २, अपक्ष आमदार किशोर जोरगेवार, चंद्रकांत पाटील, राजेंद्र यड्रावरकर, गीता जैन, नरेंद्र भोंडेकर, मंजुळा गावित, विनोद अग्रवाल, शंकरराव गडाख, आशिष जयस्वाल यांनी मतदान केल्याची माहिती आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in