आधी उद्धव ठाकरेंसाठी रडले, नंतर शिंदे गटात गेले; निर्णय बदलण्यावर संतोष बांगर काय म्हणाले?

पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर सुरूवातीला उद्धव ठाकरेंची बाजू घेणाऱ्या संतोष बांगर यांनी काय उत्तर दिलं, वाचा सविस्तर बातमी
Shivsena Rebel MLA Santosh bangar Journalist Asked Question About Uddhav Thackeray
Shivsena Rebel MLA Santosh bangar Journalist Asked Question About Uddhav Thackeray

शिवसेनेतलं बंड हे अभूतपूर्व होतं हे आता सगळ्या महाराष्ट्राने मान्य केलं आहे. कारण एकनाथ शिंदे यांनी ३९ शिवसेना आमदारांना सोबत घेत उठाव केला. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवडणूकही १६४ मतं मिळवत जिंकली. २१ जूनला हे बंड झालं होतं. त्यावेळी एकनाथ शिंदेंसह सगळ्या आमदारांना साद घालणारे आणि उद्धव ठाकरेंसाठी डोळ्यात अश्रू आणून रडणारे संतोष बांगर आता शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे शिंदे गटातील शिवसेनेच्या आमदारांची संख्या ४० झाली आहे.

Shivsena Rebel MLA Santosh bangar Journalist Asked Question About Uddhav Thackeray
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्यापैकी सर्वाधिक श्रीमंत कोण?

या सगळ्याबाबत शिवसेनेचे बंडखोर आमदार यांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली. संतोष बांगरजी तुम्ही उद्धव ठाकरेंसाठी डोळ्यात पाणी आणून बंडखोर आमदारांना परत यायचं आवाहन केलं होतं. मग आता तुम्ही एकनाथ शिंदे गटात कसे गेलात? हा प्रश्न विचारल्यावर संतोष बांगर म्हणाले 'मी जाऊ का निघून इथून? नो कमेंट्स' उद्धवजींचा मावळा असं स्वतःला म्हणवून घेणाऱ्या संतोष बांगर यांनी शिंदे गटात का गेलो हे बोलणं टाळलं आहे.

असं असलं तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेव्हा विश्वासदर्शक ठराव १६४ मतं मिळवत जिंकला तेव्हाच त्यांनी संतोष बांगर आपल्यासोबत कसे आले ते सांगितलं.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

संतोष बांगर यांना मी बोलवलं नाही. त्यांनी मला फोन केला होता. कसं बोलू असा विचार करत ते घाबरत होते. मला रात्री दीड वाजता फोन केला. मला यायचं आहे, माझी चूक झाली आहे.आणखी तीन ते चार लोक आहेत, त्यांचंही मत तसंच आहे असंही मला बांगर यांनी सांगितलं. त्यानंतर मी बांगर यांना सांगितलं की आपल्याला जे काही करायचं आहे ते खरं करायचं आहे खोटं काहीही नाही. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं.

Shivsena Rebel MLA Santosh bangar Journalist Asked Question About Uddhav Thackeray
कुटुंबाच्या आणि मृत मुलांच्या आठवणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावूक

संजय राऊत यांची टीका

जे आमदार आदल्यादिवशी आपल्या मतदारसंघात जाऊन रडत होते ते शिवसेने गेले तेव्हा आश्चर्य वाटलं. मात्र अशा लोकांना जनता आणि मतदार पुन्हा उभं करणार नाही. आदल्या दिवशी हेच आमदार त्यांच्या मतदारसंघात जाऊन रडत होते. हिंगोलीत लोकांनी त्यांचं स्वागत केलं. एक निष्ठावान म्हणून त्यांच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले होते. मात्र आता तिकडे गेले. या लोकांकडून काय अपेक्षा करणार? अशा लोकांना जनता उत्तर देते असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in