‘गौतमीचा कार्यक्रम ठेऊन अजित पवारांना….’,अब्दुल सत्तार यांच्या कानपिचक्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Abdul sattar on Gautami Patil
Abdul sattar on Gautami Patil
social share
google news

Abdul sattar on Gautami Patil : प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil)सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.मात्र तिची चर्चा आता राजकीय वर्तुळात देखील सुरु झाली आहे. नुकतेच अजित पवार (Ajit Pawar) यांनी ”ती बैलासमोर नाचो किंवा आणखीण कोणासमोर नाचो, तुला काय त्रास होतोय, ” अशी प्रतिक्रिया देऊन पत्रकाराची खिल्ली उड़वली होती. यानंतर आता गौतमी पाटीलवर कृषी मंत्री अब्दुल संतार (Abdul sattar) यांनी प्रतिक्रिया देऊन अजित पवार यांच्या कानपिचक्या घेतल्या आहेत. (abdul sattar says will orgnize gautami patil show and invite ajit pawar)

ADVERTISEMENT

ज्यांचं वय डोळे मारायचे आहेत, ते डोळे मारतात, ज्यांनी लहानपणी मारले नाहीत ते आता मारत असल्याचा टोला अब्दुल सत्तार (Abdul sattar) यांनी यावेळी लगावला. अजित दादा जे जे बोलतात त्याला महत्व आहेच, कारण ते विरोधी पक्षनेते आहेत, असे देखील सत्तार म्हणालेत. तसेच अजित दादा मेरे दोस्त है.., गलतीया सबसे होती है, अब्दुल सत्तार की छप जाती है, अजित पवार की छुप जाती है, अशी शायरी देखील सत्तार यांनी यावेळी बोलवून दाखवली.

हे ही वाचा : ”गौतमी पाटील बैलासमोर नाचो, नाहीतर…”, अजित पवारांची तुफान फटकेबाजी

कृषी मोहोत्सवात गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवला होता, आता आम्ही आणखी एकदा गौतमी पाटीलचा कार्यक्रम पुन्हा ठेवू आणि या कार्यक्रमाला अजित पवार यांना बोलवू असे देखील अब्दूल सत्तार (Abdul sattar) म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

दरम्यान अब्दूल सत्तार यांना गौतमी पाटीलला ओळखतात का? असा सवाल विचारण्यात आला होता. यावर सिल्लोडला कृषी मोहोत्सवात गौतमी पाटीलचा (Gautami Patil) कार्यक्रम पाहिल्याची कबूली त्यांनी दिली. आपल्या राज्यात लावणी ही संस्कृती आहे. मी डान्सबार मध्ये कधी गेलो नाही. पण लावण्या मी अनेकदा पाहिल्या आहेत. कारण यात डोक्यापासून पायापर्यंत मराठी संस्कृतीला शोभेल असा वेश असतो,असे देखील अब्दूल सत्तार (Abdul sattar) म्हणाले आहेत. छत्रपती शिवरायांच्या काळापासून लावण्या चालतात. जिजाऊ पुरस्कार विजय सिंह मोहिते पाटील यांनी सुरेखा पुणेकर यांना दिला होता, अशी आठवण देखील त्यांनी यावेळी सांगितली.

हे ही वाचा : VIDEO: …अन् पुण्यात बावऱ्या बैलापुढे थिरकली गौतमी पाटील!

अजित पवार काय म्हणाले?

बैल काय गाईसमोर नाचू देत तिचा तो अधिकार आहे. हाच गौतमीचा व्यवसाय आणि उपजिविकेचे साधन देखील आहे. कला आणि अभिनयाच्या माध्यमातून ती त्याच्याकडे बघते.आता हे सगळ बघत असताना माझं लहान बाळाचे बारसं आहे आणि त्याला अजून काहीच कळत नाही, तरी देखील बारशाच्या निमित्ताने बोलावलंय तर तिला नाचावचं लागेल. मग बैलाचा वाढदिवस असो किंवा बैलपोळाच्या शर्यतीत बैलगाडा पहिला आला असो, तिचे ते कामच आहे, असे देखील अजित पवार म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT