कार्यक्रम रद्द, आमदारांची बैठक? अखेर मौन सोडत अजित पवार स्पष्टच बोलले…

ADVERTISEMENT

NCP Leader Ajit Pawar Speaks on NCP and Chief minister post clam in 2024
NCP Leader Ajit Pawar Speaks on NCP and Chief minister post clam in 2024
social share
google news

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांची भाजपशी जवळीत वाढत असून ते येत्या काही दिवसात भाजपशी हातमिळवणी करण्याच्या विचारात असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. अशात अजित पवार यांनी आजचे पुण्यातील कार्यक्रम अचानक रद्द केल्याने या चर्चांना खतपाणी मिळालं. यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची एक बैठक बोलावली असल्याच्या बातम्याही काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या. मात्र आता अखेर अजित पवार यांनी या सगळ्यावर मौन सोडलं असून त्यांनी आपली भूमिका ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट केली आहे. (Ajit Pawar is thinking of joining hands with BJP in the coming days, what he said?)

ADVERTISEMENT

काय म्हणाले अजित पवार?

खारघर (नवी मुंबई) येथे रविवारी झालेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या श्रीसदस्यांच्या कुटुंबियांना व उष्माघातामुळे बाधित झालेल्या श्रीसदस्यांना भेट देऊन त्यांना धीर देण्यासाठी मी ‘एमजीएम’ हॉस्पिटलमध्ये सोमवारी पहाटेपर्यंत उपस्थित होतो. सोमवारी माझा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता. मी मुंबईतच आहे.

’16 आमदार अपात्र झाले, तर…’, अजित पवारांनी केली बेरीज अन् सांगितला बहुमताचा आकडा

हे वाचलं का?

उद्या, मंगळवार दि. १८ एप्रिल २०२३ रोजी मी विधानभवनातील माझ्या कार्यालयात उपस्थित राहणार असून कार्यालयाचे नियमित कामकाज सुरु राहणार आहे. मंगळवारी मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत, त्या पूर्णत: असत्य आहेत. मी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली नाही, याची नोंद घ्यावी, असं त्यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

अजित पवार यांच्या भाजपशी हातमिळविणीच्या चर्चा का?

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवलेला आहे. हा निकाल लवकरच येण्याची शक्यता आहे. त्याचं अनुषंगाने अजित पवारांच्या नावाभोवती चर्चेनं फेर धरला आहे. न्यायालयाने शिंदेसह 16 आमदार अपात्र ठरवले, तर अजित पवार आणि राष्ट्रवादीचे आमदार भाजपसोबत जाऊ शकतात. अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यात शरद पवारांनीही पक्षातील आमदारांबद्दल केलेल्या विधानाने या चर्चेला हवा मिळाली. त्यातच अजित पवार यांनी यापूर्वीही अशाच प्रकारे अचानक कार्यक्रम रद्द केले होते. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याच्या बातमी समोर आली. त्यामुळे अजित पवारांच्या मनात चाललंय काय? या प्रश्नाने डोकं वर काढलं आहे.

ADVERTISEMENT

“राष्ट्रवादी काँग्रेस तोडण्यासाठी… “, ‘त्या’ चर्चेवर संजय राऊत स्पष्टच बोलले

अजित पवारांच्या नाराजीबद्दल राऊत काय म्हणाले?

“अजित पवार काल आमच्याबरोबर होते. ते नागपुरातील महाविकास आघाडीच्या सभेसाठी आले होते. काल अजित पवारांचा आमच्या सोबत चांगला संवाद होता. अजित पवार हे आमच्याच सोबत विमानामध्ये होते. अजित पवार, मी, उद्धव ठाकरे साहेब हे सगळे सहकारी होते आणि मला अजिबात वाटत नाही की, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून वेगळ्या दिशेने जातील. त्यांच्याशी चर्चा करताना वाटले नाही. नागपूरवरून आल्यानंतर ते उद्धव ठाकरेंसोबत रुग्णांची भेट घेण्यासाठी गेले. त्यांच्याशी आमचा संवाद चांगला आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT