Politics: भारतातील राजकीय नेत्यांच्या ‘रिटायरमेंट’चा इतिहास नेमका आहे तरी काय?
Politics in Marathi: अजित पवार यांनी शरद पवारांना निवृत्तीचा सल्ला दिल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं. पण यामुळे भारतातील राजकीय नेत्यांच्या निवृत्तीचा आणखी एक मुद्दा आता समोर आला आहे. जाणून घेऊयात याचविषयी सविस्तरपणे.
ADVERTISEMENT

Political in Marathi: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी अचानक बंड केलं. जवळपास शिंदेंच्याच पावलावर पाऊल टाकताना ते पाहायला मिळतायत, मात्र या सगळ्यात अजित पवार एक चूक करून बसले.. शरद पवारांचं (Sharad Pawar) वय काढणं ही त्यांच्यासाठी मोठी चूक असल्याचं म्हटलं जात आहे. 82 झालं, 83 झालं, तुम्ही कधी थांबणार आहात का नाही? या अजित पवारांच्या वक्तव्याने आता ते अडचणीत आलं आहे, यावरून पवारही म्हणाले वय 83 असलं तरी ‘ना टायर्ड हू, ना रिटायर्ड’, पण या सगळ्यात चर्चा होतेय की राजकीय रिटायरमेंटची. खाजगी असो वा सरकारी नोकऱ्या 58-60 वयोगटात तुम्ही आलात की तुमची निवृत्ती होते. कला-साहित्य अशा क्षेत्रात रिटायरमेंट (Retirement) नसली तरी तुमच्या भूमिका बदलतात. 30-40 असलेला हिरो जे अक्शन सीन करतो, ते काही 80 वर्षाच्या हिरोला मिळत नाहीत. मग राजकारण हे एकच असं क्षेत्र आहे का, जिथे रिटायरमेंटच नसते? वय झालं म्हणून काही नेत्यांनी जबाबदारींमधून मुक्त होणं पसंत केलंय का? आपल्या भारतीय राजकीय नेत्यांचा काय आहे रिटायरमेंटचा इतिहास? हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात. (ajit pawar sharad pawar retire politics maharashtra issue of retirement of political leaders in india politics in marathi)
भारतात लोक साधारण वयाच्या 70 वर्षापर्यंत जगतात. भारतातील मध्यम वय पाहिल तर ते 28 वर्षे आहे. म्हणजे भारतातील अर्ध्या लोकांचं वय 28हून अधिक आहे, आणि अर्ध्या जनतेचं वय 28हून कमी. भारत जगातला सर्वात तरूणवर्ग असलेला देश, पण राजकारणी मात्र आपले फारसे तरूण पाहायला मिळत नाही. आपल्या लोकसभेतले अर्ध्याहून अधिक खासदार हे 54 वर्षावरील आहेत. 239 खासदार 60-80, 11 खासदार 80-90 वर्षे आणि एका खासदाराचं वय तर 93 वर्षे आहे (सपा- Shafiqur Rahman Barq)
हे ही वाचा >> शरद पवारांची साथ सोडलेल्या ‘या’ मातब्बर नेत्यांचं काय झालं?, ‘या’ दिग्गजांनी गमावलीय आमदारकी
व्यवसायात रिटायरमेंट जरी नसेल तरी शरीर साथ देईल, पुढची पिढी तयार होईल तोवर ती व्यक्ती काम करत राहते, पण राजकारणात तसं नाहीये. वय काहीही असो, नेता पक्षाचा अध्यक्ष बनून सुद्धा राहतो किंवा मुख्यमंत्री/पंतप्रधान बनून सुद्धा राहतो. नेते म्हणू शकतात जोवर मी निवडणुका जिंकतोय, लोकांचा माझ्यावर विश्वास आहे तोवर मी अमूक-अमूक पदावर कायम राहणार.
भारतीय संविधानात आमदार-खासदारांसाठी कमीत कमी वय तर सांगण्यात आलं आहे, 25 वर्षे. पण जास्तीत जास्त किती? हे नाही सांगण्यात आलं आहे. वय 100 वर्षे असेल, नेता हॉस्पिटलमध्ये असेल किंवा तुरूंगात असेल तरीही तो निवडणूक लढवू शकतो, त्याचा करिष्मा असेल तर जिंकूही शकतो. म्हणूनच भारतामध्ये जवळपास 90 टक्क्यांहून अधिक नेते आजीवन सक्रीय राजकारणात असल्याचं पाहायला मिळतं.










