Eknath Shinde शिवसेनेचे नवे ‘बॉस’; पहिल्या कार्यकारिणीमध्ये घेतले मोठे निर्णय
Shiv Sena’s first national executive Committee : मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या गटाला ‘शिवसेना पक्ष’ (Shiv sena) म्हणून निवडणूक आयोगाने (Election Commission) मान्यता दिली आहे. त्यामुळे ‘शिवसेना’ हे पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह या गोष्टी आता शिंदे गटाला मिळाल्या आहेत. यानंतर आज (21 फेब्रुवारी) शिवसेनेची पहिली राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक शिंदे यांच्या नेतृत्वात पार पडली. […]
ADVERTISEMENT
Shiv Sena’s first national executive Committee :
ADVERTISEMENT
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या गटाला ‘शिवसेना पक्ष’ (Shiv sena) म्हणून निवडणूक आयोगाने (Election Commission) मान्यता दिली आहे. त्यामुळे ‘शिवसेना’ हे पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह या गोष्टी आता शिंदे गटाला मिळाल्या आहेत. यानंतर आज (21 फेब्रुवारी) शिवसेनेची पहिली राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक शिंदे यांच्या नेतृत्वात पार पडली. यात अनेक महत्वाचे ठराव मांडण्यात आले. (Both the posts held by Uddhav Thackeray were demolished. Now all the powers of Shiv Sena are in the hands of Eknath Shinde)
या बैठकीत सर्वात महत्वाचा ठराव होता तो एकनाथ शिंदे यांच्या निवडीचा. एकनाथ शिंदे यांची पक्षाच्या मुख्य नेतेपदी निवड करण्यात असून त्यांना सर्वाधिकार देण्यात आल्याची माहिती मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी दिली. ते म्हणाले, आजच्या बैठकीत अनेक ठराव संमत झाले. निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमावलीनुसारच निर्णय झाले. घटनेला अनुसरूनच एकनाथ शिंदेंनी कार्यकारणीला संबोधित केलं. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन पुढं चाललो आहोत, असेही त्यांनी सांगितलं.
हे वाचलं का?
राज्यपालांनी सरकार पाडायला मदत केली? सिब्बलांचं कोर्टात कोश्यारींकडे बोट
शिवसेनेच्या राष्ट्रिय कार्यकारिणीच्या बैठकीत कोणते ठराव झाले?
-
राष्ट्रीय कार्यकारिणीच्या आजच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांची मुख्यनेतेपदी निवड.
ADVERTISEMENT
एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षाचे सर्वाधिकार.
ADVERTISEMENT
1998 साली बाळासाहेबांनी केलेल्या घटनेनुसारच पक्षात काम चालेल.
कार्याध्यक्ष आणि पक्षप्रमुख ही पद मोडीत.
कोणाच्याही संपत्तीवर, अकाऊंटवर आणि मालमत्तेवर आमचा अधिकार दाखवणार नाही.
चर्चगेट रेल्वे स्टेशनला माजी केंद्रीय मंत्री चिंतामणराव देशमुख यांचे नाव देणे.
सर्व प्रकल्पात भूमीपूत्रांना 80% नोकरीमध्ये स्थान देणार.
मराठी भाषेला अभीजात भाषेचा दर्जा.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावकरकर यांना “भारतरत्न” देणे
UPSC आणि MPSC च्या मराठी मुलांना भक्कम पाठिंबा देणे. जिल्हानिहाय स्पर्धा परीक्षा तयारी केंद्रे
धर्मवीर आनंद दिघे यांचा अपमान करणाऱ्या संजय राऊत यांचा निषेध करणारा ठराव.
गड किल्ले संवर्धन करणे.
सेना-भाजप युती 45 लोकसभा आणि 200 विधानसभा जिंकण्याचा निश्चय.
निवडणुक आयोग नियमांचे पालन करण्याचा ठराव.
राजमाता जिजाऊ, धर्मवीर संभाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्याबाई यांचा महापुरुषांच्या यादीत समावेश करावा.
Thackeray कडून मशालही काढून घेण्याची तयारी, ‘या’ पक्षाची थेट शिंदेंकडे धाव
शिंदेंनी घेतला होता आक्षेप :
निवडणूक आयोगात सुनावणी सुरु असताना शिवसेनेच्या घटनेत उद्धव ठाकरे यांनी केलेल्या बदलावर शिंदे गटाच्या वतीने आक्षेप घेण्यात आला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची घटना तयार केलेली होती. त्यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी घटनेत बदल करून पक्षप्रमुख हे पद निर्माण केले. हे पदच बेकायदा आहे, असा युक्तिवाद शिंदे गटाच्या वतीने करण्यात आला होता.
मूळ पक्षघटनेनुसार पक्षांतर्गत निवडणूक होत असे. पण, निवडणुकीविना उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाले. पक्षातील पदाधिकारी व नेत्यांच्या नियुक्त्या करण्याचा अधिकार उद्धव यांनी स्वत:कडे घेतला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुखपदी झालेली नियुक्ती आणि इतर नियुक्त्याही बेकायदा ठरतात, असा मुद्दा मांडला होता. निवडणूक आयोगानेही शिंदे गटाचा हा युक्तिवाद ग्राह्य धरला होता. त्यानंतर आता शिंदेंकडून शिवसेनेच्या घटनेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT