MLA Disqualification निकालाआधी CM शिंदेंची मंत्र्यांसोबत बैठक, घेतले 9 मोठे निर्णय

रोहित गोळे

ADVERTISEMENT

before the mla disqualification verdict cm eknath shinde held a cabinet meeting announced 9 major decisions
before the mla disqualification verdict cm eknath shinde held a cabinet meeting announced 9 major decisions
social share
google news

MLA Disqualification verdict and Cabinet Meeting: मुंबई: शिवसेना आमदार अपात्रतेबाबत (Shiv Sena MLA Disqualification) आज (10 जानेवारी) अंतिम निर्णय दिला जाणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) हे आज दुपारी 4 वाजता निकालाचं वाचन करणार आहेत. ज्याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. मात्र, असं असताना याच निकालाच्या अवघ्या काही तास आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी 9 अत्यंत महत्त्वाचे असे निर्णय घेतले आहेत. (before the mla disqualification verdict cm eknath shinde held a cabinet meeting announced 9 major decisions)

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet Meeting) मुंबईत पार पडली. यावेळी विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. एकीकडे आमदार अपात्रता निकालाची धाकधूक असताना दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठक घेत काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहे..

हे ही वाचा>> MLA Disqualification: कोणाच्याही मनातही नसेल असा निकाल देणार नार्वेकर.., मोदी-शाहांसारखं वापरणार धक्कातंत्र?

वाचा आमदार अपात्रता निकालापूर्वी घेतलेले मंत्रिमंडळ निर्णय:

1. राज्यात नागरी भागातील अतितीव्र कुपोषित (SAM) बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यास मान्यता.

हे वाचलं का?

2. ग्रामविकास विभागातील योजनांच्या जाहिरात व प्रसिद्धीसाठी नवीन लेखाशिर्ष उघडण्यास मंजुरी

3. शासकीय लेख्यातून (मकोनी नमुना क्रमांक ४४ द्वारे) आहरित केलेल्या सहायक अनुदानाच्या जलद संवितरण व संनियंत्रणासाठी आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकरिता आभासी वैयक्तिक ठेव लेखा कार्यपद्धती लागू करण्यास मंजुरी.

ADVERTISEMENT

4. ‘सत्यशोधक’ मराठी चित्रपटास आकारल्या जाणाऱ्या राज्य वस्तू व सेवा कराच्या प्रतिपूर्तीस मंजुरी

ADVERTISEMENT

5. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, विरार या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना व सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करण्यास मंजुरी

6. पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठीच्या अनुदानात रु.५० हजारांवरून वरुन रु. एक लाखांपर्यंत वाढ.

7. महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ लागू असलेल्या पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित परिमंडळातील गावठाणामधून स्थलांतरित न झालेल्या प्रकल्पग्रस्तांना नवीन पुनर्वसित गावठाणाऐवजी रोख रक्कम स्वरुपात आर्थिक पॅकेज देणार

8. श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पात्र शिधापत्रिकाधारकांना प्रति शिधापत्रिका आनंदाचा शिधा देण्यास मंजुरी

9. राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांची अतिरिक्त २८६३ आणि सहाय्यभूत ११०६४ पदे निर्माण करण्यास तसेच ५८०३ पदे बाहययंत्रणेद्वारे उपलब्ध करुन घेण्यास मंजुरी

हे ही वाचा>> Mla Disqualification : ‘अध्यक्षांनी आमच्या बाजूने निकाल दिला पाहिजे’; CM शिंदे स्पष्टच बोलले

असे महत्त्वाचे 9 निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने घेतले आहेत. मात्र, आता अवघ्या काही तासात त्यांच्या सरकारबाबत अत्यंत महत्त्वाच निकाल हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सुनावणार आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT