Govt Jobs : भारतीय हवाई दलात भरती सुरु, देशसेवेची सुवर्णसंधी, काय आहेत पात्रतेचे निकष?
भारतीय हवाई दलात देशसेवेची सुवर्णसंधी चालून आली आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत 11 डिसेंबर आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भारतीय हवाई दलात भरती
काय आहेत पात्रतेचे निकष?
जाणून घ्या सविस्तर
IAF Recruitment : भारतीय हवाई दलात (Indian Air Force) नोकरी करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. याअंतर्गत कमिशन्ड ऑफिसर पदांच्या एकूण 284 जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये 'AFCAT एंट्री' अंतर्गत फ्लाइंग ब्रांचसाठी 36, ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) साठी 124 आणि ग्राउंड ड्युटी (नॉन-टेक्निकल) साठी 108 जागा भरल्या जाणार आहेत. याव्यतिरिक्त 'NCC स्पेशल एंट्री' अंतर्गत फ्लाइंग ब्रांचमध्ये 10 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या असून, 'GATE स्कोर एंट्री' द्वारे ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) पदांच्या 16 जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता काय?
या भरतीसाठी पदांनुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. AFCAT फ्लाइंग ब्रांचसाठी उमेदवार भौतिकशास्त्र व गणित विषयांसह 60 टक्के गुणांसह बारावी आणि 60 टक्के गुणांसह BE/B.Tech पदवी असणे अनिवार्य आहे. ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) पदासाठी भौतिकशास्त्र आणि गणितासह 50 टक्के गुणांसह बारावी आणि 60 टक्के गुणांसह BE/B.Tech पदवी गरजेची आहे, तर नॉन-टेक्निकल पदासाठी 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा B.Com, BBA, BMS, BBS, CA, CMA, CS, CFA किंवा B.Sc (फायनान्स) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच NCC स्पेशल एंट्रीसाठी 'एनसीसी एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र' आणि GATE स्कोर एंट्रीसाठी BE/B.Tech पदवीसह वैध GATE स्कोर असणे बंधनकारक आहे.
हे ही वाचा : 13 शिक्षकांची आत्महत्या, 400 कोटींची थकबाकी; पुण्यातील प्रसिद्ध शिक्षणसंस्थेला उच्च न्यायालयाचा दणका
अर्ज कसा करावा?
उमेदवारांच्या वयोमर्यादेचा विचार केल्यास 1 जानेवारी 2028 रोजी फ्लाइंग ब्रांचसाठी वय 20 ते 24 वर्षांच्या दरम्यान, तर ग्राउंड ड्युटी (टेक्निकल आणि नॉन-टेक्निकल) पदांसाठी 20 ते 26 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. अर्ज शुल्काच्या बाबतीत AFCAT एंट्रीसाठी उमेदवारांना 550 रुपये आणि त्यावर जीएसटी शुल्क भरावे लागेल, मात्र NCC स्पेशल एंट्री आणि GATE स्कोर एंट्रीद्वारे अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
हे ही वाचा : मुंबईची खबर : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा; BMC च्या ऑडिटमधून धक्कादायक माहिती समोर
अर्जाची अंतिम मुदत
देशसेवेची इच्छा बाळगणाऱ्या पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 11 डिसेंबर 2026 ही आहे. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या भरतीसाठीची लेखी परीक्षा 31 जानेवारी 2027 रोजी देशभरातील विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी afcat.edcil.co.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
