Women Reservation Bill : ‘घरच्या महिला…’, भावना गवळींचे खडेबोल
महिला विधेयकावर बोलताना भावना गवळी संसदेत म्हणाल्या की, मी या विधेयकाला पाठिंबा देते, माझ्या पार्टीचे सर्व खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या विधेयकाचे स्वागत करतात, असे भावना गवळी यावेळी म्हणाल्या आहेत.
ADVERTISEMENT
Women Reservation Bill, Parliament Special Sesssion : नव्या संसदेच्या कामकाजाचा आज दुसरा दिवस आहे. लोकसभेत आज महिला आरक्षण विधेयकावर तब्बल 7 तास चर्चा सुरू आहे. या चर्चासत्रात शिवसेना शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांनी महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देत असल्याची भूमिका मांडली. याचसोबत विरोधकांच्या इंडिया आघाडीवर (India Alliance) जोरदार हल्ला चढवला. (bhavana Gawali criticize congress women reservation bill new parliament special sesssion day 2 Shivsena shinde group)
ADVERTISEMENT
महिला विधेयकावर बोलताना भावना गवळी संसदेत म्हणाल्या की, मी या विधेयकाला पाठिंबा देते, माझ्या पार्टीचे सर्व खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या विधेयकाचे स्वागत करतात, असे भावना गवळी यावेळी म्हणाल्या आहेत. महिलांसाठी नुसती चर्चा करायचं काम पंतप्रधान मोदींनी केले नाही, तर निर्णय घेण्याच काम केल्याचे कौतुक भावना गवळी यांनी यावेळी केली.
हे ही वाचा : Ajit Pawar : ‘सुप्रिया सुळेंना नैराश्य आलं’, अजित पवार गटाची टीका
भावना गवळी यांनी यावेळी विरोधकांच्या इंडिया आघाडीवर देखील टीका केली. विरोधकांची इंडिया ही दल दल की इंडिया (अनेक पक्षांची) आहे, आणि या दलदलीतच कमळ खुलणार, त्यामुळे इंडिया आघाडी जो प्रयत्न करतेय, ते स्वत: च्या दलदलीत फसणार आहे, असा टोला भावना गवळी यांनी इंडिया आघाडीला लगावला.विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या या दलदलीत कमळ फुलणार आहे. त्यामुळे महिला आरक्षणावर शिवेसेना नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणार असल्याचे भावना गवळी म्हणाल्या आहेत.
हे वाचलं का?
भावना गवळी यांनी यावेळी घराणेशाहीवरून देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. घराणेशाहीचा वाद नसला पाहिजे, काहींना वाटतं आमच्या घरातल्या महिला आल्या की आरक्षण मिळालं, असा टोला भावना गवळी यांनी लगावला आहे. महिला सक्षम झाल्या पण असे नाही आहे. त्यामुळे महिलांना आणखीण सक्षम करण्याठी तुम्हाला हे विधेयक पास करावंच लागेल,असे देखील भावना गवळी विधेयकांच्या बाजूने म्हणाल्या आहेत.
हे ही वाचा : ‘बायको बेशुद्ध होती, मी रडत होतो’, वसीम अक्रमने सांगितली भारतातील ‘ती’ आठवण
सोनिया गांधी काय म्हणाल्या?
राजीव गांधींचे स्वप्न अर्धेच पूर्ण झाले आहे, ते या विधेयकाच्या मंजूरीमुळे आता पूर्ण होणार आहे. काँग्रेस पक्षाचा या विधेयकाला पाठिंबा आहे. हे विधेयक मंजूर झाल्यामुळे आम्ही आनंदी आहोत, पण चिंताही आहे, महिला गेल्या 13 वर्षांपासून राजकीय जबाबदारीची वाट पाहत आहेत. सध्या त्यांना जास्त वेळ थांबायला लावले जात आहे. 2 वर्षे, 4 वर्षे, 6 वर्षे, ही प्रतीक्षा किती करावी? हे विधेयक तातडीने मंजूर करावे, अशी आमची मागणी आहे, असे सोनिया गांधी संसदेत म्हणाल्या होत्या.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT