‘अमित शाह म्हणालेले, अपमान सहन करा पण…’, मातोश्रीतील ‘त्या’ बैठकीवर फडणवीसांचे गौप्यस्फोट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Speaking at the BJP meeting in Bhiwandi, Deputy Chief Minister Devendra Fadnavis has made many secret explosions regarding the meeting held with Uddhav Thackeray in 2019.
Speaking at the BJP meeting in Bhiwandi, Deputy Chief Minister Devendra Fadnavis has made many secret explosions regarding the meeting held with Uddhav Thackeray in 2019.
social share
google news

भिवंडी: भाजपा ‘महाविजय-2024’ या कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना शिवसेना (UBT)चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला. ‘ठाकरेंनी बेईमानी केली, खंजीरच खुपसला.. त्यावेळी अमितभाई म्हणालेले, अपमान सहन करा, पण बेईमानी नाही सहन करायची..’ असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी 2019 मध्ये मुख्यमंत्री पदावरून नेमकं काय घडलं या सगळ्या पुन्हा एकदा इतिहास सांगितला. (bjp bhiwandi dcm devendra fadnavis many secret explosions meeting uddhav thackeray 2019 matoshree shiv sena amit shah rashmi thackeray maharashtra political news in marathi)

ADVERTISEMENT

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी तुफान फटकेबाजी केली. उद्धव ठाकरे यांनी पोहरादेवीची खोटी शपथ घेतली.. भाजपने कधीही उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिदाबाबत शब्द दिला नव्हता. मात्र निवडणूक निकालानंतर आलेले आकडे पाहून उद्धव ठाकरेंनी बेईमानी करत आमच्या पाठीत खंजीर खुपसला. अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला. वाचा फडणवीस यांनी ठाकरेंवर नेमके काय-काय आरोप केले तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्याबाबत त्यांनी भाजपच्या नेत्यांना नेमकं काय सांगितलं जाणून घ्या त्याविषयी.

देवेंद्र फडणवीस यांच्या भिवंडीच्या सभेतील अत्यंत महत्त्वाचे मुद्दे

  1. राष्ट्रवादी नवा सहकारी, आपल्या मनात अनेक प्रश्न
  2. संयम आणि नेतृत्वावर विश्वास होता म्हणून 2 वरून 200+ पल्ला गाठू शकलो.
  3. आवश्यकता संपली तेव्हा मुफ्तींच्या सरकारला लाथ मारली. 370 रद्दसाठीची स्ट्रॅटेजी होती, अजून पाकव्याप्त काश्मीर बाकी आहे.. त्याचंही काम सुरू आहे.
  4. आपल्याला विष पचवायचं नाहीये, पण महाविजयाकरता कडू औषध घेण्याची तयारी ठेवा.
  5. दूरचा विचार करायचा तर संयम हवा..
  6. महाराज अफजलखानाला भेटले, तेव्हा मावळ्यांनी महाराजांवर अविश्वास नाही दाखवला. (मला कोणाला अफजलखान म्हणायचं नाही) इतिहासाचा मतितार्थ समजून घ्या.
  7. नेतृत्वावर विश्वास तेव्हा स्ट्रॅटेजी 100 टक्के यशस्वी..
  8. अलिकडे काही लोक शपथा खोट्या घ्यायला लागले (समोरून शेम शेमचे नारे)- पोहोरादेवी इथल्या ठाकरेंच्या शपथेचा उल्लेख..
  9. युती अंतिम टप्प्यात असताना ठाकरेंनी एका रात्री सांगितलं की, मी शाहांशी बोललो आणि मी विनंती केली की आम्हाला मुख्यमंत्रिपद पाहिजे.
  10. मी शाहांना रात्री 1 वाजता फोन केला. शाह बोलले मी त्यांना सांगितलं की CM चा फॉर्म्युला ठरलाय, तडजोड होणार नाही
  11. मग ठाकरे म्हणाले युती होणं कठीण आहे…”

    हे ही वाचा >> कुटुंबच संपलं! मुलांना दिलं विष अन् पत्नीसह घेतला गळफास

  12. तीन दिवसांनी पुन्हा एक मध्यस्थ येऊन म्हणाले की ठाकरेंना पुन्हा बोलायची इच्छा आहे. मग पालघरच्या जागेवर बोलणं. मुख्यमंत्रिपदाचा विषय सील तेव्हाच झालेला.
  13. बाळासाहेबांच्या खोलीतील बोलणीनंतर पत्रकार परिषदेची rehearsal केली. रश्मी वहिनी आल्या मग मला पुन्हा rehearsal करायला सांगितली.
  14. ठाकरेंनी बेईमानी केली, खंजीरच खुपसला..
  15. ठाकरेंनी शब्द फिरवल्यानंतर राष्ट्रवादीसोबत काय बोलणी झालं ते सगळं अजित पवारांनी सांगितलंच..
  16. अमितभाई म्हणालेले- अपमान सहन करा, पण बेईमानी नाही सहन करायची.
  17. भाजपने ठाकरेंचे उमेदवार निवडून यावे यासाठी घाम गाळलाय
  18. तुमच्या मनात शंका असू देऊ नका, हा अधर्म नाही. महाभारताने हेच शिकवलंय. कर्णाचे कवचकुंडल काढून घेतल्याशिवाय विजय मिळवता येणार नाही हे कृष्णाला माहिती होतं. भीष्माला पराभूत करायला शिखंडीला उतरवलं.
  19. हा अधर्म नाही ही कूटनिती. राजकारणात relevant राहावं लागतं.
  20. दोन पक्ष फोडले असं लोक म्हणतात. पण जनादेशाची हत्या करण्याचं काम २०१९ ला कुणी केलं?
  21. शिंदे-दादांवर मी मोहिनी टाकेन आणि ते येतील इतके लहान आहेत का ते? ज्यावेळी अन्याय त्यावेळी शिंदे जन्माला येईल..
  22. सेनेशी आमची इमोशनल युती, पण राष्ट्रवादीशी पॉलिटिकल मैत्री. 10 वर्षात तीही इमोशनल मैत्री होईल. काँग्रेस, मुस्लिम लीग, MIM सारख्या तुष्टीकरणाच्या पक्षांना सोबत नाही घेणार

    हे ही वाचा >> BJP: अजित पवारांना सोबत घेण्याचा निर्णय चुकला?, ‘हा’ सर्व्हे भाजपसाठी धोक्याची घंटा

  23. बावनकुळें तुम्हाला सांगतो, दुसऱ्यांचं स्वागत करताना तुमची तयारी वाया घालवणार नाही. अजित पवार जर बिभीषण मग आपण कोण? ते ज्यांच्याकडून आपल्याकडे आले मग ते कोण?
  24. रामाने सांगितलेलं- यांच्या आल्यामुळे रावण मनातून पराभूत होईल, जो मनातून पराभूत तो कधीच विजयी नाही. 2019 ची उत्तरं 2023 मध्ये मिळाली, तशी 2023 ची 2026 मध्ये मिळतील.
  25. अनेक स्ट्रॅटेजी आपण करतोय, पण ज्या प्रश्नांची उत्तरं मिळाली त्यावर समाधानी राहा, बाकी पुढे मिळतील.
  26. अनेक लोकनेते पैदा होतात, तुम्ही मला नेता बनवलात. मी तुम्हाला उत्तरदायी. पण तुम्हीही पक्षाला उत्तरदायी आहात. महिला मंत्री बनवला नाही तर विस्तार होणारच नाही. आपल्याला करता आलं नाही. निश्चित महिला मंत्री करू.
  27. सेना-राष्ट्रवादीला सोबत घेऊन महाविजय मिळवू.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT