काल आमदार झाले आज थेट मारण्याची भाषा.. कर्डिले हे बरं नव्हं..
BJP MLA Akshay Kardile Controversial Speech : धीरज परदेशी यांच्या हत्येनंतर अहिल्यानगरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार अक्षय कर्डिले यांच्या वादग्रस्त भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
काल आमदार झाले आज थेट मारण्याची भाषा
कर्डिले हे बरं नव्हं..
BJP MLA Akshay Kardile Controversial Speech : अहिल्यानगर (अहमदनगर) महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्या हत्येनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राहुरीचे नवनियुक्त भाजप आमदार अक्षय कर्डिले यांचा एक संतापजनक आणि चिथावणीखोर भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जमलेल्या जनसमुदायासमोर बोलताना कर्डिले यांनी मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. त्यांनी मारण्याची आणि मुंडके छाटण्याची भाषा केल्याने त्यांच्या वक्तव्यावरून समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. धीरज परदेशी यांच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर हे भाषण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात आमदार कर्डिले यांनी केलेल्या वक्तव्याची क्लिप मागील दोन दिवसांपासून समाज माध्यमांवर वेगाने व्हायरल होत आहे.
हेही वाचा : "नरेंद्र मोदी रात्री झोपत नाहीत, आम्ही त्यांना वेड लावू... आणि ते चाणक्य.." राहुल गांधी का झाले एवढे आक्रमक?
धीरज परदेशी यांचा खून कशामुळे झाला?
धीरज परदेशी हे अहिल्यानगर महानगरपालिकेच्या विद्युत विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होते. एफआयआरमध्ये दिलेल्या माहितीनुसार, महानगरपालिकेचे वायरमन युनुस शेख यांनी धीरज आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मुकुंदनगर परिसरातील दर्गा दायरा येथे कामासाठी जाण्यास सांगितले होते. काम सुरू असताना कब्रस्तान परिसरातून धीरज यांच्या ओरडण्याचा आवाज त्यांच्या सहकाऱ्यांना आला. कैलास मुळे घटनास्थळी पोहोचले असता मेहराज सैय्यद, सिराज सैय्यद, मुस्तकीम सैय्यद आणि युनुस सैय्यद हे धीरज यांना लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडने मारहाण करत असल्याचे त्यांना दिसले. धीरज मदतीसाठी आरडाओरड करत होते, मात्र मारहाण सुरूच होती. त्यानंतर आरोपी दुचाकीवरून फरार झाले. जखमी धीरज यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणात सहा आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा : शिवसेना सुनावणी: आमदार अपात्रतेवरून सिब्बलांनी घेरलं, सुप्रीम कोर्टातील युक्तिवाद जसाच्या तसा..
