Vidhanparishad: 'भ@&# माझ्याकडे हात...', अंबादास दानवेंची भाजप आमदार प्रसाद लाडांना भर सभागृहात शिवीगाळ

मुंबई तक

Ambadas Danve Vs Prasad Lad: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रसाद लाड यांना सभागृहातच शिवीगाळ केल्याचं समोर आलं आहे. जाणून घ्या नेमकं काय घडलं.

ADVERTISEMENT

अंबादास दानवेंची भाजप आमदार प्रसाद लाडांना भर सभागृहात शिवीगाळ
अंबादास दानवेंची भाजप आमदार प्रसाद लाडांना भर सभागृहात शिवीगाळ
social share
google news

Ambadas Danve: मुंबई: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केलेल्या एका विधानवरुन महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच चांगलंच रण पेटलं. हा वाद एवढा पेटला की, विधानपऱिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी भर् सभागृहात भाजप आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली. ज्यानंतर विधानपरिषदेत प्रचंड गदारोळ झाला. 

राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी विधानपरिषदेत भाजपच्या वतीने करण्यात आली होती. ज्यानंतर याच मुद्द्यावर बोलताना अंबादास दानवे हे बोलण्यासाठी उभे राहिल्यावर प्रसाद लाड यांनी त्यांच्या दिशेने काही हातवारे केले. ज्यानंतर दानवेंचा पारा हा चांगलाच चढला आणि त्यांनी थेट अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. 

अंबादास दानवेंनी दिली प्रसाद लाडांना शिवी, नेमकं काय घडलं?

राहुल गांधी यांच्या निषेधाचा ठराव विधानपरिषदेत करण्यात यावा अशी मागणी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केली. ज्यावर बोलण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे उभे राहिले. पाहा यावेळी अंबादास दानवे नेमकं काय म्हणाले. 

सभापती महोदय, माझा मुद्दा हा आहे की, जे काही वक्तव्य ज्याचं असेल त्याचं लोकसभेत झालेलं आहे. त्याचा संबंध आपल्या कामकाजाशी येतो का? हा माझा प्रश्न आहे. मला असं वाटतं.. हिंदुत्वाचा मुद्दा मांडणारे हे आपल्या सभागृहामध्ये...' 

हे वाचलं का?

    follow whatsapp