Bjp : ठाकरेंचे टीकेचे बाण, भाजपनं डागली तोफ; ‘पावसेना उरली नाही’
देवेंद्र फडणवीसांवर पाव उपमुख्यमंत्री अशी टीका करण्याआधी तुमच्या शिल्लक सेनेची काय अवस्था झालीय ती बघा, आता तुमच्याकडे पाव सेनाही देखील उरलेली नाही, अशा शब्दात भाजपने ठाकरेंच्या टीकेचा समाचार घेतला आहे.
ADVERTISEMENT
BJP Reply Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीसांचा पाव उप मुख्यमंत्री असा उल्लेख करत त्यांना डिवचलं होते. ठाकरेंच्या या टीकेवर आता भाजपने पलटवार केला आहे. देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) पाव उपमुख्यमंत्री अशी टीका करण्याआधी तुमच्या शिल्लक सेनेची काय अवस्था झालीय ती बघा, आता तुमच्याकडे पाव सेनाही देखील उरलेली नाही, अशा शब्दात भाजपने ठाकरेंच्या टीकेचा समाचार घेतला आहे. (bjp reply udhhav thackeray over devendra fadnvis deputy cm criticicized maharashtra politics)
ADVERTISEMENT
महाराष्ट्र भाजपने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ठाकरेंच्या टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे. सत्तेसाठी सोनिया सेनेपुढे गुडघे टेकून भगव्याला छेद देण्याचं पाप कुणी केलं? असा थेट सवाल भाजपने ठाकरेंना केला आहे. तसेच ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा पाव उप मुख्यमंत्री असा उल्लेख केला होता. देवेंद्रजींवर पाव उपमुख्यमंत्री म्हणून टीका करण्याआधी तुमच्या शिल्लक सेनेची काय अवस्था झाली ती बघा. सच्चा शिवसैनिकानं तुमची साथ कधीच सोडलीय. आता तुमच्याकडे पाव सेनाही उरलेली नाही, असा पलटवार भाजपने ठाकरेंवर केला.
हे ही वाचा : Baramati lok sabha : ‘कुणाच्या बापाचं ऐकणार नाही’, अजित पवारांचा बारामतीकरांना इशारा
मुख्यमंत्री असताना कोकणातील मराठी माणसाला वाऱ्यावर सोडणाऱ्या उद्धव ठाकरेंना निवडणुका तोंडावर असताना कोकणाची आठवण झाली. उद्धव ठाकरे तुम्ही फक्त भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता, प्रत्यक्ष कृतीत मात्र तुम्हाला औरंग्याबद्दलचं प्रेम दिसून येतं.
भाजपचं सुरूवातीपासून…
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 4, 2024
हे वाचलं का?
ठाकरे काय म्हणाले?
तुम्ही पाव उप मुख्यमंत्री झालात, पुन्हा येईन पुन्हा येईन अशा घोषणा करताना तुम्ही मोठे होता. घोषणा करताना टरबूज आणि एवढं ते चिराट. तरी तुम्हाला काही पटत नाही. तर तुम्ही फोडाफोडीचे धंदे करतात, अशा ठाकरेंनी फडणवीसांवर जोरदार टीका केली होती.
हे ही वाचा : Jitendra Awhad : ‘काकाच्या मृत्यूची वाट बघताय’, अजित पवारांमुळे आव्हाडांचा चढला पारा
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT