Election Results 2023: निकालानंतर संजय राऊत रोखठोकच बोलले, ‘काँग्रेसला आता…’

मुंबई तक

ADVERTISEMENT

BJP wins Rajasthan Madhya Pradesh and Chhattisgarh Congress wins in Telangana in one state Congress should think
BJP wins Rajasthan Madhya Pradesh and Chhattisgarh Congress wins in Telangana in one state Congress should think
social share
google news

Sanjay Raut: राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये (Rajasthan, Madhya Pradesh and Chhattisgarh) भाजपने विजय मिळवला तर तेलंगणामध्ये काँग्रेसने आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केला आहे. चार राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांमुळे (Assembly Elections) आगामी निवडणुकांची गणितं बांधली जात आहेत. त्यामुळेच आज खासदार संजय राऊत यांनी बोलताना सांगितले की, आज लागलेल्या या निकालांचा (Election Result) लोकसभेच्या निडणुकतीवर आणि इंडिया (I.N.D.I.A.) आघाडीवरही त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. मात्र या निकालाचा काँग्रेसला गांभीर्याने विचार करावा लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट सांगितले आहे.(BJP wins Rajasthan Madhya Pradesh and Chhattisgarh Congress wins in Telangana in one state Congress should think)

ADVERTISEMENT

निकालाचा परिणाम नाही

खासदार संजय राऊत यांनी बोलताना सांगितले की, या 3 राज्यांच्या निकालाचा परिणाम इंडिया आघाडीवर होणार नाही, मात्र राजस्थानमधील काँग्रेसची सत्ता गेल्याने काँग्रेसला आणि त्यांच्या नेत्यांना विचार करावा लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी संजय राऊत यांनी हेही सांगितले की, या निकालामुळे आता काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या घरी 6 डिसेंबर रोजी बैठक होणार असून इंडिया आघाडीतील महत्वाचे नेते या बैठकीला हजेरी लावणार आहेत. तर महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही या बैठकीला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या निवासस्थानी बैठक होणार असून आगामी काळातील निवडणुकीविषयी ध्येय धोरणंही या बैठकीत ठरणार आहेत. पराभवाची कारणं आणि आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या ध्येयधोरणाबाबत चर्चा केली जाणार आहे.

राजस्थानच्या परंपरेनुसार निकाल

राजस्थानमध्ये काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला. राजस्थानच्या निकालाचे विश्लेषण करताना खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, हा विजय भाजपचा नाही तर राजस्थानसारख्या राज्याला पाच वर्षानंतर जो बदल हवा असतो तो त्यांनी केला आहे. त्यामुळे हा भाजपचा विजय नाही तर राजस्थानच्या परंपरेनुसार हा भाजपला दिलेला कौल असल्याचे त्यांनी सांगितले.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> MP Assembly Election Results 2023: मध्य प्रदेशमध्ये जनतेने काँग्रेसला थेट नाकारलं, भाजपच्या हाती पुन्हा सत्तेच्या चाव्या

पराभवाचे चिंतन

ज्या प्रमाणे राजस्थानमध्ये काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला त्याच प्रमाणे छत्तीसगडमध्येही पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे छत्तीसगडमध्ये काँग्रेसला स्वीकारावा लागलेला पराभव चिंताजनक असल्याचेही मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे काँग्रेसने नव्या चेहऱ्यांनी संधी दिली पाहिजे आणि या पराभवाचे चिंतन केले पाहिजे असं स्पष्ट मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

पराभव राहुल गांधींचा नाही

तसेच या निवडणुकीचे विश्लेषण करताना भाजप नेत्यांकडून हा पराभव राहुल गांधींचा असल्याची टीका केली आहे. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, हा पराभव एकट्या राहुल गांधींचा नाही. कारण निवडणूक ही पक्षाच्या चिन्हावर लढली जाते, हे काम टीम वर्कचं आहे. त्यामुळे हा पराभव राहुल गांधींचा नसून पक्षाचा पराभव झाला असून आता काँग्रेसला चिंतन करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Telangana Election Results 2023 Live : तेलंगणात मुख्यमंत्री KCRची हॅट्ट्रीक हुकली, जनतेची काँग्रेसला साथ

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT