G-20: पंतप्रधान नरेंद्र मोदींची Exclusive मुलाखत जशीच्या तशी…
PM Modi Exclusive Interview: G20 चे अध्यक्षपद भूषवून भारत संपूर्ण जगाला नवा मार्ग दाखवत आहे. असे पंतप्रधान मोदींनी बिझनेस टुडेला खास मुलाखतीत सांगितले आहे. वाचा हीच मुलाखत जशीच्या तशी
ADVERTISEMENT

PM Modi Exclusive Interview on G-20: राहुल कंवल/सौरव मजूमदार /सिद्धार्थ ज़राबी: नवी दिल्ली: G-20 चे अध्यक्षपद हा भारतासाठी ऐतिहासिक क्षण आहे. या जागतिक संघटनेचे अध्यक्षपद भूषवून भारत (India) अनेक जागतिक समस्या सोडविण्यास मदत करत आहे. बहुपक्षीय विकास बँकांमध्ये (MDBs) सुधारणा असो, G20 मध्ये आफ्रिकन युनियनचा समावेश असो किंवा हवामान बदलावर लक्ष केंद्रित करणं असो. या वर्षी G20 चे नेतृत्व करून, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ‘ग्लोबल साऊथ’च्या समस्या सोडवण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याची खात्री करून दिली आहे. (business today exclusive interview with prime minister narendra modi on g 20 power digital power and economy)
पुढील महिन्यात 9 आणि 10 सप्टेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या G20 नेत्यांच्या शिखर परिषदेच्या अगोदर, PM मोदींनी Business Today शी 40 मिनिटं एक्सक्लुझिव्ह बातचीत केली. या मुलाखतीत पीएम मोदींनी भारतासमोरील संधींबद्दल सांगितले, ज्यामुळे त्यांना जागतिक समस्या सोडवण्यात मदत झाली. देशाची डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर कशी जगासाठी आकर्षणाचे केंद्र बनली आहे, भारताच्या मॅन्युफॅक्चरिंग हब बनण्याच्या क्षमतेसह इतर अनेक मुद्द्यांवर पंतप्रधान मोदी खुलेपणाने बोलले आहेत.

पंतप्रधान मोदींची संपूर्ण मुलाखत जशीच्या तशी:
प्रश्न: भारताला G20 चे अध्यक्षपद अशा वेळी मिळाले आहे जेव्हा आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सी भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या क्षमतेबद्दल उत्साही आहेत. G20 शिखर परिषद उदयोन्मुख आर्थिक शक्तीस्थान आणि जागतिक आर्थिक मंचांवर विश्वासार्ह आवाज म्हणून भारताची प्रतिमा मजबूत करण्यास कशी मदत करेल असे तुम्हाला वाटते?









