राष्ट्रवादीला पुन्हा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळू शकतो का?

राहुल गायकवाड

ADVERTISEMENT

It is possible for NCP to regain the status of a national party.
It is possible for NCP to regain the status of a national party.
social share
google news

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीला (NCP) धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाकडून काढून टाकण्यात आला आहे. राष्ट्रवादीने राष्ट्रीय पक्षासाठी आवश्यक असलेल्या निकषांची पूर्तता न केल्याने हा दर्जा काढून घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण देखील रंगताना दिसत आहे. पण राष्ट्रवादीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा पुन्हा मिळवणं शक्य आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या निकाषांपैकी एका निकषाची पूर्तता करणं आवश्यक आहे. कसं ते आपण समजून घेऊ. (It is possible for NCP to regain the status of a national party.)

ADVERTISEMENT

एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कसा मिळतो?

एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यासाठी निवडणूक आयोगाने निकष ठरवलेले आहेत. त्या निकषांची पूर्तता केल्यानंतर एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त होतो. कुठल्या पक्षाला राष्ट्रीय दर्जा द्यायचा आणि कुठल्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून घ्यायचा हे त्या त्या वेळच्या परिस्थितीवरुन ठरवलं जातं.

NCP : शरद पवारांना आयोगाने का दिला धक्का? राष्ट्रवादीचा ‘राष्ट्रीय दर्जा’ जाण्यामागची ‘ही’ आहेत कारण

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्यासाठी कुठले निकष आहेत?

  • लोकसभेच्या एकूण जागांच्या किमान २ टक्के जागा ३ राज्यांमधून. म्हणजेच लोकसभेत ३ राज्यांमधून किमान ११ खासदार.
    लोकसभेत किमान ४ खासदार. सोबतच ४ राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांमध्ये किमान ६ टक्के मत.
    किमान ४ राज्यांमध्ये संबंधित पक्षाला राज्य पक्षाचा दर्जा.

राष्ट्रवादीला कसा होवू शकतो राष्ट्रीय पक्ष?

राष्ट्रवादीला महाराष्ट्र आणि नागालँड या 2 राज्यांमध्ये चांगला जनाधार आहे. या दोन्ही राज्यांमध्ये 6 टक्क्यांपेक्षा जास्त मत मिळवली आहेत. मात्र याव्यतिरिक्त राष्ट्रवादीला देशातील इतर राज्यांमध्ये 6 टक्के मत मिळविता आली नाहीत. राष्ट्रवादीने मागील काही काळात गुजरात, गोवा, केरळ, झारखंड अशा काही राज्यांमध्ये निवडणुका लढविल्या आहेत.

हे वाचलं का?

राष्ट्रवादीला मोठा धक्का; निवडणूक आयोगाकडून राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द

मात्र केरळ आणि गुजरात वगळता अन्य राज्यात राष्ट्रवादीला खातं उघडता आलं नाही. शिवाय राष्ट्रवादीला यापूर्वी गोवा, मेघालय, बिहार अशा राज्यांमध्ये यश मिळालं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला आता यश मिळालेल्या आणि यापूर्वी यश मिळालेल्या राज्यांमध्ये आणि येणाऱ्या काळात इतर राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये प्रयत्न करुन निवडणूक आयोगाचे निकष पूर्ण केल्यास पुन्हा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळू शकतो. येत्या काळाच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी हे निकष पूर्ण करु शकते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT