“अयोध्या दौऱ्याला नाव ठेवू नका, अन्यथा रामभक्त जागा दाखवतील” : CM शिंदेंचा अजित पवारांना इशारा

ADVERTISEMENT

CM Ekanth Shinde replied to NCP Leader Ajit Pawar on Ayodhya Visit
CM Ekanth Shinde replied to NCP Leader Ajit Pawar on Ayodhya Visit
social share
google news

CM Eknath Shinde on Ayodhya visit :

“अयोध्या आणि राम मंदीर आमच्या अस्थेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री होते, नेते आहेत. पण रामभक्तांना फालतुगिरी म्हणत असाल तर हे रामभक्तच तुम्हाला धडा शिकवतील, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिला. ते अयोध्येमधून पत्रकार परिषदेत बोलत होते. आजचा अयोध्या दौरा म्हणजे माझ्या आयुष्यातील परमोच्च आनंदाचा क्षण आहे.मी आयुष्यात विसरणार नाही, अशा भावनाही यावेळी शिंदेंनी व्यक्त केल्या. (CM Ekanth Shinde replied to NCP Leader Ajit Pawar on Ayodhya Visit)

रावण राज्य म्हणणं हा प्रभू रामाचा अपमान :

दरम्यान, रावण राज्य या आदित्य ठाकरे यांच्या टिकेवर बोलताना शिंदे म्हणाले, रावण राज्य म्हणणं हा प्रभू रामाचा अपमान आहे. त्यांना मी सांगू इच्छितो, जेव्हा पालघरमध्ये साधूंची हत्या झाली तेव्हा कोणाचं सरकार होतं? एका नेव्हल अधिकाऱ्याला मारलं तेव्हा कोणाचं सरकार होतं? राणा कुटुंबीयांना तुरुंगात टाकलं तेव्हा कोणाचं सरकार होतं? दाऊदशी संबंध असलेल्या मंत्र्याचा राजीनामा घेऊ शकला नाही. पण त्याचवेळी परवा पालघरमध्ये 2 साधुंचे हत्याकांड आपल्या लोकांनी वाचविले, हे रामाचे राज्य असल्याचं शिंदे म्हणाले. तर अजित पवार यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, अजितदादा उपमुख्यमंत्री होते, नेते आहेत. रामभक्तांना फालतुगिरी म्हणताय, पण तुम्हाला रामभक्तच धडा शिकवतील.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या बृजभूषण सिंग यांनी शिंदे-फडणवीसांचं ‘असं’ केलं स्वागत…

अयोध्येतून राज्यातील परिस्थितीवर लक्ष्य आहे :

मी सकाळी सात वाजल्यापासून सर्व जिल्हाधिकारी, विभागीय अधिकारी, सचिव यांच्या संपर्कात आहे. त्यांच्याशी सातत्याने चर्चा करत आहे. शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे तिथं त्यांना स्पॉट व्हिजीट करण्याचे आदेश दिले आहेत. 8 ते 9 महिन्यात आमच्या सरकारनं चांगलं काम आहे. आमचं सरकार सर्वसामान्यांचं आहे. गरीब, शेतकरी, कामगार, कष्टकऱ्यांचे सरकार आहे.

‘हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन’ :

उत्तर भारतीय आणि महाराष्ट्रीय आता वेगवेगळे नाहीत. खंद्याला खंद्याला लावून काम करतात. ज्या सवलती महाराष्ट्रातील लोकांना मिळतात, त्याच सवलती वर्षांनूवर्ष मुंबईत आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या उत्तर भारतीयांनाही मिळतात. महाराष्ट्र भवनासाठी जागा देण्याची मु्ख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती केली आहे. त्यांनी त्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. लवकरच भव्य महाराष्ट्र भवन उभं राहिलं आणि या भवनाला हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन असं नाव देण्यात येईलं, अशी घोषणा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली.

ADVERTISEMENT

Eknath Shinde in Ayodhya Live : “यांना ऑपरेशनची गरज नाही, गोळ्याच पुरेशा”

पंतप्रधान मोदींनी बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण केलं :

2019 मध्ये लोकांचं जे मत होतं तेच आम्ही केलं. लोकांनी भाजप-शिवसेनेला मत दिलं होतं. पण खुर्चीच्या मोहापायी चुकीचं पाऊल उचललं. बाळासाहेब ठाकरेंनी ज्यांना कायम दूर ठेवलं होतं त्यांच्यासोबत सरकार बनवलं. पण ही चूक आम्ही सुधारली. आज खुलेपणाने आम्ही दोन्ही पक्षांची विचारधारा घेवून दर्शनाला सोबत आलो आहोत. बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिराचं स्वप्न पाहिलं होतं. कश्मीरमधील 370 कलम हटवण्याचं स्वप्न पाहिलं होतं. पंतप्रधान मोदींनी बाळासाहेब ठाकरेंची स्वप्न पूर्ण केली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT