Devendra Fadnavis : 'आगे आगे देखिए होता है क्या?' अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर फडणवीस स्पष्टच बोलले

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

devendra fadnavis reaction on  ashok chavan resignation speculation to join bjp maharashyra politics
काँग्रेस ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षसदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

काँग्रेसचे अनेक चांगले नेते भाजपच्या संपर्कात

point

अनेक मोठे नेते भाजप पक्षात येतील

point

काँग्रेस पक्षात नेते गुदमरतायत

Devendra fadnavis reaction on  Ashok chavan resignation : काँग्रेस ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षसदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण (Ashok chavan) भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याची चर्चा सूरू आहे. या राजीनाम्यावर उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे अनेक चांगले नेते भाजपच्या संपर्कात आहे. त्यामुळे 'आगे आगे देखीये होता हे क्या?', असे फडणवीसांनी म्हणत काँग्रेसचे टेन्शन वाढवलं आहे.  (devendra fadnavis reaction on  ashok chavan resignation speculation to join bjp maharashyra politics) 

देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, 'मी तर तुमच्याकडून ऐकलं. काँग्रेसमधले अनेक चांगले नेते जे भाजपच्या संपर्कात आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. तसेच 'ज्या प्रमाणे काँग्रेस पक्ष गेले काही वर्ष वाटचाल करतोय. त्यातून काँग्रेसचे जे जनतेचे नेते आहेत, ते पक्षात गुदमरतायत. त्यामुळे देशभरामध्ये हा ट्रेंड पाहायला मिळतोय, जनतेन नेते भाजपमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे निश्चितपणे काही मोठे नेते भाजप पक्षात येतील. हा मला विश्वास आहे, असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. 

हे ही वाचा : Pankaja Munde: 'माझ्यासोबत राजकारणात दगाफटका झाला, माझा वनवास...', पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अशोक चव्हाण यांनी एक्स या सोशल मीडिया प्लँटफॉर्मवर राजीनाम्याची माहिती दिली आहे.  अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. या राजीनाम्याच्या पत्रात त्यांनी माजी विधानसभा सदस्य असा उल्लेख केला होता. त्यामुळे त्यांनी पक्ष सदस्यत्व सोडण्यापूर्वीच आमदारकीचा राजीनामा दिल्याचे स्पष्ट होत आहे. 

'हे ही वाचा : Shiv Sena : राऊतांचा CM शिंदेंना सणसणीत टोला, आम्ही हनुमान, लंका....

ADVERTISEMENT

दरम्यान अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन त्यांनी आपल्या पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. या सर्व घडामोडीमुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला होता, तसेच या राजीनाम्यानंतर नाना पटोले पक्षश्रेष्ठींची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT