सहा महिने नाही, अजित पवारांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवणार -देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठे विधान केले. सध्या मुख्यमंत्री बदलले जाणार नाही. अजित पवारांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवू, असे फडणवीस म्हणाले.
ADVERTISEMENT
Devendra fadnavis on Ajit Pawar chief ministerial post : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा निघाला की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावरून जाणार ही चर्चा राज्यात सुरू होते. गेल्या काही महिन्यांत या चर्चेने अनेकवेळा डोकं वर काढलंय. अजित पवार भाजप-शिवसेना युतीत सामील झाल्यानंतर या तर्कविर्तकांना उधाण आलं. कारण विरोधकांकडूनही अशीच विधानं केली गेली. एकनाथ शिंदे जाणार आणि अजित पवार मुख्यमंत्री होणार, हा प्रश्न देवेंद्र फडणवीसांनी निकाली काढला. त्याचबरोबर अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाबद्दल मोठं विधान केलं.
ADVERTISEMENT
‘इंडिया टुडे कॉनक्लेव्ह मुंबई २०२३’ कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत झाली. या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी काही राजकीय गौप्यस्फोट केले. त्याचबरोबर महायुतीबद्दल उठणाऱ्या राजकीय वावड्यांवरही उत्तर दिलं.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांवर काय सांगितलं?
प्रश्न : अपात्रतेच्या आधारावर अनेक जण म्हणत आहेत की, अजित पवार यांना मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळू शकते. ते म्हणतात की, मला सहा महिने द्या.. मी मुख्यमंत्री बनून सगळ्या गोष्टी बदलून टाकेन… अशा प्रकारचं काही आश्वासन त्यांना देण्यात आलं आहे का?
हे वाचलं का?
हेही वाचा >> अजित पवारांपुढं भाजप नमलं, दादांनी ‘हवं ते’ घेतलं; पालकमंत्र्यांची नवी यादी जाहीर!
देवेंद्र फडणवीस : पहिली गोष्ट… सहा महिन्यात काही गोष्टी बदलत नाहीत. त्यामुळे अजितदादांना जेव्हा मुख्यमंत्री बनायचं असेल तेव्हा संपूर्ण पाच वर्षासाठी मुख्यमंत्री बनवू. हे काही सहा महिन्यांनी वैगरे काही होत नाही. जेव्हा संधी येईल तेव्हा बनवू त्यांना.
हेही वाचा >> “शरद पवारांनीच राष्ट्रपती राजवट लावायला सांगितलं”, देवेंद्र फडणवीसांनी फोडला बॉम्ब
आता तर मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. लोकसभेची निवडणूक असो, विधानसभेची निवडणूक असो… एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वात निवडणूक लढवली जाईल. म्हणून आपण हे डोक्यातून काढून टाका की, महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलला जाईल. महाराष्ट्रात मुख्यमंत्री नाही बदलणार, नाही बदलणार…
विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात शिवसेना शिंदेंकडेच राहणार
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री राहणार असं सांगताना देवेंद्र फडणवीसांनी विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात असलेल्या प्रकरणाबद्दलही सूचक भाष्य केले. फडणवीसांनी सांगितलं की, कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे, तो अतिशय स्पष्ट आहे. विधानसभा अध्यक्षांना शिवसेना कुणाची हेही ठरवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे शिवसेना शिंदेंकडे राहील. शिंदेंच मुख्यमंत्री राहतील आणि निवडणूक आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली लढू, असं त्यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT