Hemant Soren: Jharkhand च्या राजकारणात भूकंप, मुख्यमंत्र्यांनाच अटक, ‘हे’ होणार नवे CM!

रोहित गोळे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Jharkhand CM Hemant Soren News: रांची: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजभवनात पोहोचल्यानंतर त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला. राज्यपालांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला देखील आहे. आता त्यांच्या जागी झारखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून चंपई सोरेन (Champai Soren) यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, हेमंत सोरेन यांना अंमलबजावणी संचलनालया (ED) कडून कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. (earthquake in jharkhand politics chief minister hemant soren will be arrested by ed champai soren will be the new cm)

याआधी मंगळवारी मुख्यमंत्री सोरेन हे 40 तासांनंतर अचानक दिल्लीहून रांचीला पोहोचले होते. सोरेन यांनी दिल्ली ते रांची असा 1250 किमीचा प्रवास कारने केला होता. येथे त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चाच्या वरिष्ठ नेत्यांची आणि सहयोगी आमदारांची भेट घेतली होती. या बैठकीला सीएम सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेनही उपस्थित होत्या. या बैठकीत पुढील रणनीतींवर चर्चा झाल्याचे जेएमएमचे म्हणणे आहे. याच बैठकीत चंपई सोरेन यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजतं आहे.

आम्ही सरकार स्थापनेचा दावा केला: चंपाई सोरेन

राजभवनातून बाहेर पडताना झारखंडचे नवे भावी मुख्यमंत्री चंपई सोरेन म्हणाले की, ‘आम्ही राज्यपालांसमोर सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. आम्ही 43 आमदारांच्या पाठिंब्याने गेलो होतो.’ झामुमोचे आमदार आलमगीर म्हणाले की, ‘आम्ही 43 आमदारांच्या पाठिंब्याची पत्रे सादर केली आहेत. राज्यपालांनी आम्हाला लवकरच बोलावू असे सांगितले आहे.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेमंत सोरेन सध्या ईडीच्या ताब्यात

हेमंत सोरेन सध्या ईडीच्या ताब्यात असल्याचा दावा झारखंड मुक्ती मोर्चाचे खासदार महुआ माझी यांनी केला आहे. ईडीच्या टीमसोबत ते राजीनाम्यासाठी राजभवनात गेले होते, तिथे त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी चंपई सोरेन यांना राज्याचे नवे मुख्यमंत्री बनवण्यात यावं यासाठी पत्र देण्यात आलं आहे. नवीन मुख्यमंत्री चंपई यांचा शपथविधी आजच झाला पाहिजे, अशी JMM पक्षाची मागणी आहे. अशा परिस्थितीत राजभवनाबाहेर आमदारांचा गोंधळ सुरूच आहे.

कोण आहेत ‘झारखंड टायगर’ चंपई सोरेन?

JMM आमदारांनी चंपई सोरेन यांची विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. झारखंड टायगर म्हणून प्रसिद्ध असलेल्या चंपई सोरेन आता झारखंडचे पुढील मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. सध्या चंपाई झारखंडचे वरिष्ठ कॅबिनेट मंत्री आहेत. याआधी हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना यांचेही नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Maha Vikas Aghadi : आंबेडकरांचे काँग्रेससोबत सूर जुळेना! ‘वंचित’ एका अटीमुळे ‘मविआ’तून बाहेरच

चंपई सोरेन हे सरायकेला-खरसावां जिल्ह्यातील जिलिंगगोडा गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव सिमल सोरेन असून ते शेती करायचे. चार मुलांमध्ये चंपई हा त्यांचा मोठा मुलगा. चंपई यांनी सरकारी शाळेत दहावीपर्यंत शिक्षण घेतले. दरम्यान, त्यांचे कमी वयातच मानको यांच्याशी लग्न झाले. लग्नानंतर चंपई यांना 4 मुलं आणि तीन मुली झाल्या.

ADVERTISEMENT

याच काळात बिहारपासून वेगळ्या झारखंड राज्याची मागणी जोर धरू लागलेली. शिबू सोरेन यांच्यासोबत चंपई देखील झारखंडमधील चळवळीत सामील झाले. लवकरच ते ‘झारखंड टायगर’ या नावाने प्रसिद्ध झाले. यानंतर चंपई सोरेन यांनी सरायकेला मतदारसंघातून पोटनिवडणुकीत अपक्ष आमदार म्हणून निवडून येत त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर ते झारखंड मुक्ती मोर्चात सहभागी झाले.

भाजप सरकारमध्येही होते मंत्री

भाजप नेते अर्जुन मुंडा यांच्या 2 वर्षाच्या सरकारमध्ये चंपई सोरेन यांना कॅबिनेट मंत्री बनवण्यात आले होते आणि महत्त्वाची मंत्रिपदेही देण्यात आली होती. चंपई हे 11 सप्टेंबर 2010 ते 18 जानेवारी 2013 पर्यंत मंत्री होते. यानंतर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आणि त्यानंतर हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील झारखंड मुक्ती मोर्चा सरकारमध्ये चंपई सोरेन यांना अन्न, नागरी पुरवठा आणि वाहतूक मंत्री करण्यात आले होते.

हे ही वाचा>> BMC: शिंदे-भाजपच्या आमदारांना कोट्यवधी.. ‘मविआ’च्या आमदारांचे हात रिकामेच’!

हेमंत सोरेन यांच्या सरकारमध्ये दुसऱ्यांदा मंत्री

त्याच वेळी, हेमंत सोरेन 2019 मध्ये पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर, चंपई सोरेन यांना परिवहन, अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती आणि मागासवर्गीय कल्याण मंत्री करण्यात आलेले. चंपई हे झामुमोचे उपाध्यक्षही आहेत. आता त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली आहे. यानंतर चंपाई झारखंडचे नवीन मुख्यमंत्री असतील.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT