G20 Summit 2023: जो बायडेन यांचं विमानतळावर कोणी केलं स्वागत?, उलटसुलट चर्चांना उधाण

रोहित गोळे

ADVERTISEMENT

g20 summit 2023 live minister of state vk singh welcomed joe biden us president meets pm modi
g20 summit 2023 live minister of state vk singh welcomed joe biden us president meets pm modi
social share
google news

G20 Summit Delhi 2023 LIVE Updates: नवी दिल्ली: राजधानी दिल्ली G-20 शिखर परिषदेसाठी (G20 Summit) सज्ज आहे. या दोन दिवसीय परिषदेत सहभागी होण्यासाठी परदेशी पाहुणे एकामागून एक भारतात येऊ लागले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (joe biden) हे भारतात आले आहेत. त्याआधी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष आणि अनेक देशांचे प्रमुख भारतात पोहोचले. (g20 summit 2023 live minister of state vk singh welcomed joe biden us president meets pm modi)

ADVERTISEMENT

दरम्यान, जो बायडेन हे भारतात आल्यानंतर त्यांचे स्वागत केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंह (V. K. Singh) यांनी केलं. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या स्वागतासाठी एखादा तोलामोलाचा नेता विमानतळावर जाणं अपेक्षित होतं. मात्र, त्याऐवजी व्ही के सिंह यांना पाठविण्यात आल्याने याबाबत राजधानी दिल्लीत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

हे ही वाचा >> Mumbai Crime : एअर होस्टेस हत्या प्रकरण, आरोपीची लॉकअपमध्येच पँटने गळफास घेऊन आत्महत्या

राजधानी दिल्लीत G-20 परिषदेसाठी परदेशी पाहुण्यांच्या आगमनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक दिल्लीत पोहोचले आहेत. पंतप्रधान म्हणून त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. त्याआधी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना नवी दिल्लीत पोहोचल्या. G-20 मध्ये भारताने बांगलादेशला पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे. याशिवाय इटलीचे पीएम जॉर्जिया मेलोनी आणि अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष अल्बर्टो फर्नांडीज दिल्लीला पोहोचले आहेत. त्याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हेही भारतात पोहोचले आहेत. बायडेन आज (8 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.

हे वाचलं का?

जी-20 परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन भारतात आले आहेत. काही वेळात पीएम मोदी आणि बायडेन यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार आहे.

ADVERTISEMENT

मी मोदीजींचा खूप आदर करतो: ऋषी सुनक

G-20 शिखर परिषदेसाठी भारतात आलेले ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक म्हणाले की, मी मोदीजींचा खूप आदर करतो. ते वैयक्तिकरित्या माझ्यासोबत खूपच दयाळू वाहकाक. आम्ही खूप मेहनत करत आहोत. ब्रिटन आणि भारत यांच्यातील व्यापार करार पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. G20 च्या यशासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देत आहे.

ADVERTISEMENT

भारत योग्य वेळी G20 चं यजमानपद भूषवत आहे: ऋषी सुनक

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक सध्या G20 परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात आले आहेत. ते म्हणाले की G20 भारतासाठी खूप मोठे यश आहे. भारत योग्य वेळी या परिषदेचे आयोजन करत आहे. पुढील दोन दिवस सकारात्मक चर्चा अपेक्षित आहे. भारत जागतिक स्तरावर उत्तम काम करत आहे हे पाहून मला अभिमान वाटतो.

हे ही वाचा >> ‘…त्याच हेलिकॉप्टरने इतर शेतकऱ्यांकडेही बघा’, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यावर तोफ डागली

G20 दरम्यान ‘वन अर्थ’, ‘वन फॅमिली’ आणि ‘वन फ्युचर’ यावर लक्ष केंद्रीत करणार:

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘मी G20 परिषदेदरम्यान ‘वन अर्थ’, ‘वन फॅमिली’ आणि ‘वन फ्युचर’ सत्रांचे अध्यक्षपद भूषवेन. यादरम्यान जागतिक समुदायाशी संबंधित समस्यांवर चर्चा केली जाईल. यामध्ये शाश्वत, सर्वसमावेशक आणि संतुलित विकासावर चर्चा देखील समाविष्ट आहे.

G20 शिखर परिषद प्रथमच भारत आयोजित करत आहे: पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘9 आणि 10 सप्टेंबर रोजी दिल्लीतील भारत मंडपम येथे 18 व्या G20 शिखर परिषदेचे आयोजन करण्यासाठी भारत उत्साहित आहे. भारत प्रथमच G20 शिखर परिषदेचे आयोजन करत आहे. येत्या दोन दिवसांत जागतिक नेत्यांशी सकारात्मक चर्चा होण्याचा मला विश्वास आहे. हे सहकार्य आणि मैत्री आणखी दृढ करण्यासाठी मी अनेक जागतिक नेते आणि शिष्टमंडळांच्या प्रमुखांसोबत द्विपक्षीय बैठका घेईन.’

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT