Devendra Fadnavis Property : देवेंद्र फडणवीस यांची संपत्ती किती? आकडा ऐकून थक्क व्हाल
Maharashtra Assembly Election 2024, Devendra Fadnavis Property: राज्याची विधानसभा निवडणूक येत्या 20 नोव्हेंबरला होणार असून 23 नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभेसाठी देवेंद्र फडणवीसांचा उमेदवारी अर्ज दाखल
देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिज्ञापत्रात एकूण संपत्ती किती?
अर्ज भरण्यासाठी फडणवीसांसोबत 'या' दिग्गज नेत्यांनी लावली उपस्थिती
Devendra Fadnavis Property: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं शक्तीप्रदर्शन करून नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघासाठी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना फडणवीसांनी त्यांची एकूण संपत्ती जाहीर केली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत फडणवीसांकडे 3.78 कोटींची स्थावर मालमत्ता असल्याचं प्रतिज्ञापत्रातून समोर आलं होतं. अशातच 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना फडणवीसांनी त्यांची एकूण संपत्ती घोषित केली आहे. 2023-24 वर्षाची देवेंद्र फडणवीसांची एकूण संपत्ती 3,873,536 पर्यंत पोहोचली आहे. या संपत्तीमध्ये नेमका कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे, ते सविस्त जाणून घेऊ.
हे ही वाचा >> Maharashtra Weather : दिवाळी आली तरी पावसाचं जायचं नाव नाही! आजही 'या' भागांना मुसळधार इशारा
देवेंद्र फडणवीसांच्या प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, 2023-24 मध्ये फडणवीसांच्या एकूण संपत्तीचा आकडा आता चार कोटींच्या जवळजवळ पोहोचला आहे. फडणवीसांची सध्याची संपत्ती ही 3,873,536 रुपये एवढी आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीस यांच्या संपत्तीत किती वाढ?
-
2019-20 : 3 कोटी 19 हजार 905 रुपये
-
2020-21 : 2 कोटी 5 लाख 71 हजार 651 रुपये
-
2021-22 : 3 कोटी 2 लाख 79 हजार 116 रुपये
-
2022-23 : 3 कोटी 8 लाख 61 हजार 207 रुपये
देवेंद्र फडणवीसांनी नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी फडणवीसांनी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठं शक्तीप्रदर्शनही केलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंग हे नेते फडणवीसांचा अर्ज भरताना उपस्थित होते. तसंच पूर्व-नागपूरचे भाजपचे उमेदवार कृष्णा खोपडे, दक्षिण नागपूरचे भाजपचे उमेदवार मोहन मते यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. फडणवीसांनी संविधान चौक ते आकाशवाणी चौक या भागातून मोठी रॅली काढत शक्तीप्रदर्शन केलं आणि नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला.
हे ही वाचा >> Ladki Bahin Scheme : 'लाडकी बहीण'विरोधातील याचिकाकर्त्याने मागितली सुरक्षा, म्हणाला माझ्या जीवाला...
ADVERTISEMENT