Maharashtra Assembly Election 2024 LIVE : राज्यात महायुतीचे सरकार येणार- देवेंद्र फडणवीस
Maharashtra Election Live Updates : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी 'मुंबई Tak'च्या या लाइव्ह ब्लॉगमध्ये जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...
ADVERTISEMENT
Maharashtra Assembly Election 2024 LIVE News and Updates in Marathi : राज्यात सध्या विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे. काल निवडणूक अर्जांची छाननी झाली. अनेक ठिकाणी प्रचारसभा होत आहेत.
अशातच उमेदवारी न मिळाल्याने नाराज असणारे शिवसेना शिंदे गटाचे नेते श्रीनिवास वनगा नॉट रीचेबल होते. आता त्यांच्या कुटुंबियांचा त्यांच्याशी संपर्क झालेला असला तरी श्रीनिवास वनगा तीन दिवस नंतर अद्यापही घरी परतलेले नाहीयेत.
अजित पवारांनी आर. आर. पाटील यांच्याबाबत केलेल्या विधानावर प्रतिक्रिया येत आहेत. आर. आर. आबांची मुलगी स्मिता पाटील यांनी या सगळ्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT
अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...
लाइव्हब्लॉग बंद
- 03:09 PM • 31 Oct 2024
Maharashtra Assembly Election 2024 : 'आशिष शेलार यांनी माहिती दडविली', वर्षा गायकवाडांनी केला थेट आरोप!
आशिष शेलार यांनी आपल्या उमेदवारी प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे. काँग्रेस या प्रकणारत राज्य निवडणूक आयोगात तक्रार करणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.
- 01:11 PM • 31 Oct 2024
Maharashtra assembly election 2024 : शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराला हृदयविकाराचा झटका!
चोपडा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार प्रभाकर आप्पा सोनवणे यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. प्रभाकर सोनवणे हे जळगाव येथून चोपड्याला प्रचारासाठी जात असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
प्रभाकर आप्पा सोनवणे यांची तब्येत आता चांगली असून ते लवकरच बरे होऊन प्रचारामध्ये सहभागी होतील, अशी माहिती प्रभाकर सोनवणे यांचे चिरंजीव दिनेश सोनवणे बोलताना दिली आहे.
- 12:20 PM • 31 Oct 2024
Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात महायुतीचे सरकार येणार- देवेंद्र फडणवीस
राज्यातील जनतेच्या मनात विश्वास होत आहे. महायुतीचं सरकार येणार आहे. लोकांमध्ये सकारात्मकता दिसून येत आहे. नामांकन पूर्ण झाले आहे. काही ठिकाणी आमचे क्रॉस फॉर्म आले होते. त्याबाबत शिंदे यांच्या घरी बैठक झाली, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
- 12:18 PM • 31 Oct 2024
Maharashtra Assembly Election 2024 : राज ठाकरे यांच्यासोबत बोलणी सुरु- देवेंद्र फडणवीस
राज ठाकरे यांनी व्यापक हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. क्षेत्रिय अस्मितेला भाजपचं समर्थन राहिलं आहे. पण त्यासोबत राष्ट्रीय अस्मिता आहे. त्याचा स्वीकार व्हावा. ही राष्ट्रीय अस्मिता म्हणजे हिंदुत्व आहे. राज ठाकरे यांनी हिंदुत्व स्वीकारलं आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांच्यासोबत बोलणी सुरु आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
- 11:47 AM • 31 Oct 2024
Maharashtra Assembly Election 2024 : वसई नालासोपारामध्ये शिवसैनिकांमध्ये नाराजी
शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांच्या विरोधात वसई नालासोपारामधील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. वसई विधानसभेत महाविकास आघाडीत बिघाडी, काँग्रेस च्या उमेदवारा विरोधात शिवसेना उबाटा गटाचे विनायक निकम यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. वसई आणि नालासोपारा शिवसेनेचे पारंपरिक मतदारसंघ असताना जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांच्या एकाधिकारशाही मुळे हे मतदारसंघ महाविकास आघाडीत काँग्रेसला सुटल्याचा शिवसैनिकांचा आरोप आहे. पक्षाचा आदेश मानून आम्ही उमेदवारी अर्ज मागे घेवून, आघाडीच्या उमेदवारांचे काम करणार, मात्र पक्षप्रमुखांनी आमचे म्हणणे एकूण घेवून, जिल्हाप्रमुख पंकज देशमुखांचा राजीनामा घ्यावा, शिवसैनिकांची एकमुखाने मागणी केली आहे.
- 11:46 AM • 31 Oct 2024
Maharashtra Assembly Election 2024 : आपल्याला एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही -मनोज जरांगे पाटील
गोरगरिबांना न्याय द्यायचा असेल तर आपल्याला एकत्र यावे लागेल तुमच्यावर अन्याय होणार नाही मात्र न्याय होईल. महाराष्ट्रात आणि देशातील सर्व जनतेला दीपावलीच्या शुभेच्छा देतो. दिवाळीचा एक दिवसाचा आयुष्याला कधीच पुरत कायमचा आनंद मिळण्यासाठी एक एक मतदान करा घराच्या बाहेर पडा. तुमच्या लेकरांचे आणि जातीच्या बाजूने मतदान करा तरच कल्याण होणार आहे खरी दिवाळी आनंदाची होणार आहे. यांना धडा शिकवा, आपल्या लेकराला ज्यांनी तळपायाला लागलं त्यांची मया आता करू नका, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.
- 11:45 AM • 31 Oct 2024
Maharashtra Assembly Election 2024 : संजय राऊत यांचा राज ठाकरे यांच्यावर आरोप
आमदार निवडून येण्यासाठी मनसे नेते राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी हातमिळवणी केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT