लाइव्ह

Maharashtra Breaking News : आमचं सरकार देना बँक, ते लोक तर लेना बँकवाले होते- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंकजा मुंडे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Maharashtra breaking news in marathi : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी यांच्यावर दोन बंदुकीतून एकूण सहा राऊंड फायर करण्यात आले. त्यापैकी तीन गोळ्या बाबा सिद्दिकी यांच्या छातीत लागल्या. या घटनेनंतर राजकारणात खळबळ उडाली. सध्या याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली. नवनवीन अपडेट्स याप्रकरणी येत आहेत.

ADVERTISEMENT

तर दुसरीकडे आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे आजच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते शशिकांत कांबळे यांची प्रदेश चिटणीसपदी निवड झाली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते शशिकांत कांबळे यांना निवडीचे पत्र देण्यात आले.  

अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर... 

ADVERTISEMENT

  • 12:53 PM • 14 Oct 2024

    Maharashtra News : टोलमाफीच्या निर्णयावर मनसेप्रमुख राज ठाकरे काय म्हणाले?

    मुंबईत प्रवेश करणाऱ्या टोल नाक्यांवर संपूर्णपणे टोल माफी देण्यात येणार आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. या निर्णयानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया देत सर्व नागरिकांचे तसेच मनसे सैनिकांचेही अभिनंदन केलं आहे.

    टोलच्या व्यवहारात पारदर्शकता हवी, आणि जिथे रस्त्याच्या कामांचे पैसे वसूल झालेत, तिथले रस्ते टोलमुक्त झाले पाहिजेत या मागणीसाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी प्रचंड संघर्ष केला… आम्ही टोलनाक्यांची तोडफोड केली यावरून आमच्यावर टीका झाली, पण सरकार नावाची यंत्रणा कुठलीही असो, त्यांना टोकाचं पाऊल उचलल्याशिवाय गांभीर्य कळत नाही, असं राज ठाकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

  • 12:51 PM • 14 Oct 2024

    Maharashtra News : टोलमाफीचा निर्णय निवडणुकीपुरता नाही तर कायमस्वरुपी- एकनाथ शिंदे

    “टोलमाफीचा निर्णय निवडणुकीपुरता नाही तर कायमस्वरुपी असेल. टोलमाफीमुळे ट्रॅफिकची समस्या दूर होणार आहे. हा निर्णय ऐतिहासिक असून सरकारचा हा मास्टरस्ट्रोक आहे,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

     

  • 12:50 PM • 14 Oct 2024

    Maharashtra News : आमचं सरकार देना बँक, ते लोक तर लेना बँकवाले होते- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

     

    “टोल माफ करण्याची गेल्या अनेक वर्षांपासून जनतेकडून मागणी होत आहे. मी आमदार असताना टोलमाफीसाठी आंदोलन केलं होतं. या निर्णयामुळे कारने प्रवास करणाऱ्या लाखो लोकांना दिलासा मिळणार आहे,” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे.

     

  • 12:36 PM • 14 Oct 2024

    Maharashtra News : वाशी टोलनाक्यावर मनसेकडून जल्लोष

    मुंबईत प्रवेश करणाऱ्या टोल नाक्यांवर संपूर्णपणे टोल माफी देण्यात येणार आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीतील या निर्णयानंतर नवी मुंबईत मनसेनं वाशी टोल नाक्यावर पेढे वाटून जल्लोष केला आहे.

     

  • ADVERTISEMENT

  • 11:35 AM • 14 Oct 2024

    Maharashtra News : सरकारचा मोठा निर्णय! आज रात्रीपासून मुंबईत टोलमाफीची घोषणा

    राज्य सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मागणी होत असलेल्या टोलमाफीची अखेर घोषणा करण्यात आली आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या टोल नाक्यांवर संपूर्णपणे टोल माफी देण्यात येणार आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.


     

follow whatsapp

ADVERTISEMENT