लाइव्ह

Maharashtra News Live : काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर

मुंबई तक

ADVERTISEMENT

  vidhan parishad election congress declare pradnya satav name
काँग्रेसकडूनही विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
social share
google news

Maharashtra assembly monsoon session updates : महाराष्ट्रात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक होऊ घातली आहे. तर दुसरीकडे काही महिन्यांवर येऊ ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. (Maharashtra Latest Live News)

ADVERTISEMENT

पावसाळी अधिवेशनात मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात अनेक मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. पावसाळी अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरू आहे. त्यामुळे विरोधक आणि सत्ताधारी यांच्या अनेक मुद्द्यांवरून खडाजंगी होत आहे. 

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 रिक्त जागांसाठी निवडणूक होत असून, महायुती आणि महाविकास आघाडीकडून कोणाला संधी मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. 

या सगळ्यांचे ताजे अपेडट्स वाचण्यासाठी आणि महाराष्ट्र-देशातील घटनांबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी वाचा...

 


 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

  • 06:28 PM • 01 Jul 2024

    काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर

    भाजप पाठोपाठ आता काँग्रेसकडूनही विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. 
      

  • 02:10 PM • 01 Jul 2024

    Vidhan Sabha Election 2024 : "आम्ही 30 ते 35 जागा लढवू"

    आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही 30 ते 35 जागा लढू शकतो. परंतु, त्या कुठून लढवायच्या याबाबत आमचा अजून निर्णय झाला नाही, अशी माहिती राजू शेट्टी यांनी दिली.

  • 01:15 PM • 01 Jul 2024

    Vidhan Parishad Election Result 2024 : तीन मतदारसंघातील मतपत्रिकांची मोजणी पूर्ण

    कोकण पदवीधर मतदारसंघ

     321 केंद्रातील एकूण मतपत्रिकांची मोजणी 8 फेऱ्यांमध्ये पूर्ण. 
    एकूण 1 लाख 43 हजार 297 मतपत्रिका योग्यरित्या आढळल्या. 
    आता प्रत्येक टेबलवर 1 हजार मतपत्रिका देण्यात आल्या आहेत यातून वैध व अवैध मतपत्रिकांची तपासणी सुरु. एकूण 4 फेऱ्या होतील. 
    त्यानंतर अवैध मतपत्रिका वगळून वैध मतांचा कोटा ठरवला जाईल. 

    मुंबई पदवीधर 

    एकूण 67 हजार 644 मतपत्रिकांची जुळवणी पूर्ण झाली.
    मतपत्रिकांच वैध-अवैध तपासणी सुरु. 
    त्यानंतर कोटा ठरेल. 

    मुंबई शिक्षक मतदारसंघ

    एकूण 12 हजार मतपत्रिकांची जुळवणी पूर्ण झाली आहे. 
    यातील 402 मतपत्रिका अवैध आढळल्या. 
    5800 हा कोटा विजयी घोषित करण्यासाठी ठरविण्यात आला आहे. 
    प्रत्यक्ष मतमोजणी सुरु सुरुवातीस पहिल्या  पसंतीची मते त्या त्या उमेदवारांना वाटप करण्याचे काम सुरु होईल.

  • 12:04 PM • 01 Jul 2024

    Nyaya Sanhita Act : 'अपेक्षा करणं चुकीचं ठरेल', शरद पवार मोदी सरकारवर संतापले

    भारतात तीन नवे गुन्हेगारी कायदे लागू झाले आहेत. भारतीय नागरी संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम असे तीन कायदे लागू करण्यात आले असून, यावरून शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.  

    "देशाच्या कायदा सुव्यवस्थेतील बदल हा देशाच्या विरोधी पक्षातील १५० खासदारांना निलंबित करून करण्यात आला ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकत नाही. या बदलात चर्चा आणि सूचनांचा अभाव दिसून येतोय. यासह देशाच्या सुरक्षा यंत्रणेवर येणारा ताण अधिक ठळक होतोय. काळानुरूप बदल होणं गरजेचं असलं तरी यात पारदर्शकता आणण्यासाठी चर्चा घडवून अधिक ठोस पावलं उचलता येऊ शकली असती. मात्र एककलमी कार्यक्रम राबवण्याच्या मानसिकतेने झपाटलेल्या राज्यकर्त्यांकडून चर्चेची अपेक्षा करणं चुकीचं ठरेल", अशा शब्दात शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान मोदी यांच्यावर केली आहे. 


     

  • ADVERTISEMENT

  • 10:44 AM • 01 Jul 2024

    Chiplun Crocodile : चिपळूण शहरात रस्त्यावर दिसली मगर

    चिपळूणमधील चिंचा नाका परिसरात महाकाय मगर रस्त्यावर आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. 

    शहरातून वाहणाऱ्या शिव नदीच्या पात्रात मगरींचा वावर आहे. पावसाळ्यात अनेकदा या मगरी शहरात मानवी वस्तीमध्ये दिसून येतात. 

    रविवारी (30 जून) रात्री अशीच एक भली मोठी मगर रस्त्यावर दिसून आली. ही मगर पाहून रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांची चांगलीच बोबडी वळली.

    मगरीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार वायरल होत असून, मानवी वस्तीमध्ये मगरींचा मुक्त वावर हा आता चिंतेचा विषय बनू लागला आहे.

     

  • 09:07 AM • 01 Jul 2024

    MLC Election Result 2024 : नाशिक शिक्षण मतदारसंघात मतमोजणी सुरू

    विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी केंद्रीय वखार महामंडळ गोदाम येथे सुरू झाली आहे. 

    नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांत एकूण  64  हजार 848 मतदारांनी मतदान केले आहे. मतमोजणी ३० टेबलवर होत आहे.

  • ADVERTISEMENT

  • 09:05 AM • 01 Jul 2024

    MLC Election News : विधान परिषदेच्या 11 जागांवर कुणाला संधी?

    विधान परिषदेच्या 11 जागा रिक्त होत असून, त्यासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 2 जुलै शेवटची तारीख आहे. त्यामुळे महायुतीतील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुणाला उमेदवारी दिली जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. 

    दुसरीकडे महाविकास आघाडीकडे आमदारांची संख्या कमी आहे. त्यामुळे किती उमेदवार उतरवणार आणि निवडणूक बिनविरोध करायची की नाही? याबद्दल आज निर्णय होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

  • 08:55 AM • 01 Jul 2024

    Vidhan Parishad Election Result Live : विधान परिषद निवडणुकीचा आज निकाल, कोण जिंकणार?

    विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षण या चार मतदारसंघाचा निकाल आज (1 जुलै) जाहीर होत आहे. मतमोजणीला सकाळी 7.30 वाजता सुरूवात झाली असून, पसंती क्रमानुसार मतदान असल्याने मतमोजणीला वेळ लागू शकतो आणि त्यामुळे निकाल जाहीर होण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे. 

    या निवडणुकीच्या निमित्ताने महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना बघायला मिळाला आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिले आहेत. त्यामुळे या मतदारसंघाचा निकाल काय लागणार, हे बघणेही औत्सुक्याचे आहे. 


     

follow whatsapp

ADVERTISEMENT