Maharashtra Live News : 'सरकार सत्तेच्या नशेच्या धुंदीत, महाराष्ट्र नासवण्याचं काम...', ड्रग्ज प्रकरणावर ठाकरेंचा हल्लाबोल!
Maharashtra News Live : महाराष्ट्र आणि देशातील महत्त्वाच्या घटनांचे लाईव्ह अपडेट्स...
ADVERTISEMENT
Maharashtra Breaking news live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचे अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी हे अधिवेशन होत असून, मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
पुणे कार अपघात प्रकरण, तसेच पुणे ड्रग्स प्रकरणाचे मुद्दे या अधिवेशनात गाजणार. सरकारच्या शेवटच्या अधिवेशनात विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
परिषद निवडणुकीनंतर आता राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीबाबत देखील सरकारच्या हालचाली, महायुतीत राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडी बाबत चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे.
ADVERTISEMENT
- 01:22 PM • 27 Jun 2024
Maharashtra News : 'सरकार सत्तेच्या नशेच्या धुंदीत, महाराष्ट्र नासवण्याचं काम होतंय...', ड्रग्ज प्रकरणावर ठाकरेंचा हल्लाबोल!
'संपूर्ण राज्या या सरकारला बाय-बाय म्हणत आहे. उद्या घोषणांचा पाऊस पडेल पण हा गाजर अर्थसंकल्प आहे. पेपर लीक होतोय, मंदिर लीक होतंय, यांना लाज नाही. अमरावती जिल्ह्यात रोज एक शेतकरी आत्महत्या करतोय. शिंदे अमावस्या-पौर्णिमेला त्यांची पंचतारांकीत शेती करायला जातात, हॅलिकॉप्टरने प्रवास करणारा त्यांच्या सारखा पहिलाच शेतकरी असेल. शेतकरी आत्महत्या करतात आणि शिंदे पंचतारांकीत शेती करतात.' असं म्हणत ठाकरेंनी शिंदेंवर हल्लाबोल केला. 'तत्काळ शेतकऱ्यांची कर्ज माफी करा, थापा खूप झाल्या शेतकऱ्यांना मदत करा. मविआच्या काळात झालेल्या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना फायदा झाला.' अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली. 'फडणवीसांनी आधी कर्जमाफी केली, ती अजून सुरूच... मुला-मुलींमध्ये भेदभाव करू नका. लाडकी बहीण प्रमाणे लाडका भाऊही योजना आणा. पोलीस भरतीला येणाऱ्या तरूणांचे हाल होतात, त्यांची सोय करा.' असं उद्धव ठाकरे स्पष्ट बोलले.
- 12:24 PM • 27 Jun 2024
Maharashtra Monsoon Session: ठाकरे-फडणवीसांचा एकाच लिफ्टने प्रवास! घडलं काय?
आजपासून विधिमंडळाच पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. यावेळी एक एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहायला मिळाले ज्याची आता प्रचंड चर्चा होत आहे. विधानभवनात एकाच लिफ्टने जाताना ठाकरे आणि फडणवीस दिसले आहेत.
- 11:00 AM • 27 Jun 2024
Maharashtra Monsoon Assembly: विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत विरोधकांचे आंदोलन
आजपासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. यावेळी विधानभवनाच्या पाऱ्यांवर विरोधक आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधकांनी घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले आहे. याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून त्यांना अभिवादन केले.
- 10:51 AM • 27 Jun 2024
Maharashtra News : सत्ता येणार नाही हे माहीत असल्याने सत्ताधाऱ्यांची धावपळ- विजय वडेट्टीवार
आजपासून विधिमंडळाच पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. “सत्ता येणार नाही हे माहीत असल्याने सत्ताधाऱ्यांची धावपळ. हे महाराष्ट्राला उद्धवस्त करणार त्रिकुटाच सरकार आहे. मविआच्या बैठकीत जे ठरेल तेच अंतिम असेल” असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
- 09:28 AM • 27 Jun 2024
Maharashtra News : सगे सोयऱ्याच्या अध्यादेशाला ओबीसी बांधवांचा विरोध- लक्ष्मण हाके
सगे सोयऱ्याच्या अध्यादेशाला ओबीसी बांधवांचा पूर्णपणे विरोध आहे. सरकारवरचा भरोसा उडाल्यामुळे आम्ही हे आंदोलन केले आहे. आणि आता जनतेत जात असल्याचे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी सांगितले. सगे सोयरे आणि बोगस कुणबी प्रमाणपत्र नोंदणीला आमचा विरोध आहे. 54 लाख नोंदी जर तुम्ही कुणबी म्हणून केला असाल तर ओबीसींच आरक्षण हे पूर्णपणे उध्वस्त झालेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री महोदय यांनी आमच्या आरक्षणाला कसा धक्का लागत नाही ते सांगावे, अनेक आमदार, खासदार आणि मंत्री येऊन गेले आता अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात 60 टक्के ओबीसींच्या हितासाठी चर्चा झाली पाहिजे, असे ते म्हणाले.
- 08:44 AM • 27 Jun 2024
Maharashtra News : पुण्यानंतर आता ठाणे, मीरा-भाईंदरमध्ये होणार बुलडोझर कारवाई
पुणे शहरानंतर आता ठाणे, मीरा-भाईंदरमध्ये मध्येही बुलडोझरने कारवाई करण्यात येणार आहे. ठाणे, आणि मीरा-भाईंदरमधील अनधिकृत पब, बारवर बुलडोझर फिरवला जाणार आहे. शहराला अंमलीपदार्थ मुक्त करण्यासाठी कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनपा आयुक्त, पोलिस आयुक्तांना दिले आहेत.
- 08:43 AM • 27 Jun 2024
Maratha Reservation : सगे सोयऱ्यांच्या अधिसूचनेबाबत आज मुंबई हायकोर्टात 11 वाजता सुनावणी
सगे सोयऱ्यांच्या अधिसूचनेबाबत आज मुंबई हायकोर्टात 11 वाजता महत्वाची सुनावणी होणार आहे. सरकार आज कोर्टापुढे मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडणार आहे. सगोसोयरेच्या अधिसूचनेला ओबीसी संघटनांनी आव्हान दिलं असून त्यामुळे सरकारच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे. ओबीसी नेते आज हायकोर्टात सुनावणीला ऊपस्थित राहणार आहेत.
- 08:42 AM • 27 Jun 2024
Pune Zika Virus News: पुण्यात भयानक झिका व्हायरसची एन्ट्री
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झालेत. त्यामुळे, प्रंडड उकाड्यात होरपळलेल्या लोकांना काहीसा गारवा अनुभवायला मिळतोय. मात्र, तरीही अनेक ठिकाणी ताप, थंडीच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं दिसतंय. त्यात चिंता वाढवणाऱ्या झिका व्हायरसनेही एन्ट्री केल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT