live blog active
लाइव्ह

Maharashtra Nagar Parishad and Nagar Panchayat Election Result Live: नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणूकीत कोणी मारली बाजी? प्रत्येक क्षणाचे लाईव्ह अपडेट्स एकाच क्लिकवर

मुंबई तक

Maharashtra Nagar Parishad and Nagar Panchayat Election Result Live Updates 2025: स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींसाठी डिसेंबर 2025 मध्ये निवडणुका घेण्यात आल्या. ज्याचा निकाल आज (21 डिसेंबर) या मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. 

ADVERTISEMENT

maharashtra nagar parishad and nagar panchayat election result live updates 2025 bjp shiv sena ncp shiv sena ubt ncp sharad pawar
नगर परिषद निवडणूक निकालाचे LIVE अपडेट
social share
google news

मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. ज्याची मतमोजणी आज (21 डिसेंबर) होणार आहे. त्यानंतर निकाल जाहीर करण्यात येईल. मागील 5 वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या होत्या. त्यामुळे आतापर्यंत टप्प्याटप्प्याने घेतल्या जाणाऱ्या नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुका या यंदा एकच वेळी घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे या निकालांकडे मिनी विधानसभा निवडणुका देखील म्हणून पाहिल्या जात आहेत. या निवडणुकांमध्ये राज्यात कोणत्या पक्षाचं वर्चस्व असेल हे देखील सिद्ध होणार आहे. त्यामुळेच प्रत्येक जिल्ह्यातील नगर परिषदा आणि नगर पंचायतींचे निकालाचे क्षणाक्षणाचे अपडेट आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. (Maharashtra Nagar Parishad Results LIVE Updates)

नगर परिषद आणि नगर पंचायत निकालाचे सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा LIVE BLOG वाचा.

  • 02:01 PM • 21 Dec 2025

    Maharashtra Local Body Election LIVE Updates: पवनी नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवाराचा विजय

    भंडाऱ्यातील पवनी नगर परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार डॉ. विजया राजेश नंदुरकर विजयी झाल्याची माहिती समोर आली आहे. 

  • 01:59 PM • 21 Dec 2025

    Maharashtra Local Body Election LIVE Updates: अकलूज नगरपरिषदेत रेश्मा अडगळे 2793 मतांनी विजयी

    अकलूज नगरपरिषदेत मोहिते पाटील गटाचे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार रेश्मा अडगळे 2793 मतांनी विजयी झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे, माजी आमदार राम सातपुते यांना मोठा धक्का बसला आहे. 
     

  • 01:56 PM • 21 Dec 2025

    Maharashtra Local Body Election Results 2025 LIVE: सिंधुदुर्गच्या मालवण नगर परिषदेत शिवसेनेच्या ममता वराडकर विजयी

    मालवण नगर परिषदेच्या निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाला असून एकूण 20 जागा व नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत शिंदे शिवसेनेने वर्चस्व सिद्ध केले आहे. नगराध्यक्ष पदावर शिवसेनेच्या ममता वराडकर विजयी ठरल्या असून शिंदे गटाने 10 जागांवर विजय मिळवला आहे. भाजपला 5, शिवसेना उबाठाला 4 तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. या निकालामुळे निलेश राणेंनी मालवणचा गड राखल्याचं स्पष्ट झालं असून दुसरीकडे नितेश राणेंना या निवडणुकीत मोठा धक्का बसल्याचं चित्र आहे.
     

  • 01:54 PM • 21 Dec 2025

    Maharashtra Local Body Election Results 2025 LIVE: धारूरमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांचे वर्चस्व, बालासाहेब जाधव विजयी

    बीडच्या धारूरमध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार बालासाहेब जाधव विजयी झाले असून  धारूर मध्ये आमदार प्रकाश सोळंके यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहेत. यामुळे, भाजपच्या मंत्री पंकजा मुंडेंना धक्का बसला असून भाजपचे उमेदवार पराभूत झाल्याची माहिती आहे. नगराध्यक्षासह 20 नगरसेवकांपैकी 11 नगरसेवक अजितदादांच्या राष्ट्रवादीचे असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 3 तर भाजपचे सहा नगरसेवक पदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. 
     

  • 01:51 PM • 21 Dec 2025

    LIVE Nagar Parishad Results 2025: जालन्याच्या भोकरदन नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार विजयी

    Maharashtra Local Body Election LIVE Updates: जालन्याच्या भोकरदन नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विजयी झाल्या आहेत. भोकरदन नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपकडून आशा माळी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून मिर्झा समरिन या नगर अध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. या निवडणुकीत भाजपा नेते रावसाहेब दानवे आणि आमदार संतोष दानवे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, या निवडणुकीत दानवे यांच्या उमेदवार आशा माळी यांचा पराभव झाला असून दानवे पिता पुत्राला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, निवडणुकीचा निकाल जाहीर होताच दानवे यांच्या भोकरदन येथील निवासस्थानासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केलाय. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गौरव साळी यांनी...
     

  • 01:48 PM • 21 Dec 2025

    Maharashtra Nagar Panchayat Results LIVE Updates: गडचिरोली देसाईगंज नगरपरिषदेत भाजपाच्या उमेदवार विजयी

    गडचिरोलीतील देसाईगंज नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदाच्या बीजेपी च्या उमेदवार लता मुरलीधर सुंदरकर 741 मतांनी विजयी झाल्याची माहिती आहे. 

  • 01:46 PM • 21 Dec 2025

    Maharashtra Local Body Election LIVE Updates: धाराशिवच्या परंडा नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गटाचा अध्यक्षपदावर विजय

    धाराशिव येथील परंडा नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाकीर सौदागर हे 189 मतांनी विजयी घोषित झाले आहेत.

    परंडा नगरपरिषद – नगरसेवक पदाचा निकाल
    शिवसेना शिंदे गट : 8 जागांवर विजय 
    जनशक्ती आघाडी : 12 जागांवर विजय

    परंडा नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदावर शिवसेना शिंदे गटाने यश मिळवलं असलं तरी नगरसेवक संख्येत जनशक्ती आघाडीला आघाडी मिळाल्याने पुढील राजकीय समीकरणांकडे लक्ष लागलं आहे.

  • 01:42 PM • 21 Dec 2025

    Maharashtra Local Body Election Results 2025 LIVE: जालन्यात परतूर नगर परिषद निवडणुकीत भाजपच्या उमेदवार विजयी...

    जालन्यातील परतूर नगर परिषद निवडणुकीत भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रियंका राक्षे विजयी 1800 मतांनी प्रियंका राक्षे यांचा विजय झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, अजित पवार गटाच्या उमेदवार  शांताबाई बाबुराव हिवाळे या पराभूत झाल्याचं वृत्त आहे. 

  • 01:35 PM • 21 Dec 2025

    Maharashtra Nagar Panchayat Results LIVE Updates: बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई नगर परिषदेचा निकाल

    अंबाजोगाई नगर परिषद निवडणूकीत भाजपचे नंदकिशोर मुंदडा विजयी झाल्याची माहिती आहे. ते भाजपचे आमदार नमिता मुंदडा याचे सासरे आहेत. अंबाजोगाई नगरपरिषद निवडणूक ही चुरशीची निवडणूक असून नगराध्यक्ष पदाचे पराभूत उमेदवार राजकिशोर मोदी यांच्याकडे 25 वर्षांपासून अंबाजोगाई नगरपरिषद ताब्यात होती. विशेष म्हणजे या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांनी पक्ष्याचे चिन्ह न घेता स्वतंत्र आघाडी स्थापन केली होती. 
     

  • 01:31 PM • 21 Dec 2025

    Maharashtra Nagar Panchayat Election Results 2025 LIVE: वसमत नगरपरिषदेत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार विजयी...

    हिंगोलीतील वसमत नगर परिषदेच्या निवडणूक रिंगणात असलेल्या अजित पवारच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनीता बाहेती ह्या 3 हजार 454 मतांनी विजयी झाल्याचं वृत्त आहे. 

  • 01:29 PM • 21 Dec 2025

    Maharashtra Nagar Panchayat Results LIVE Updates: साताऱ्यातील फलटणमध्ये भाजपचे समशेर सिंह निंबाळकर विजयी

    संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या फलटण नगरपरिषद निवडणुकीमध्ये माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या गटाचे भाजपचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर (कमळ) अत्यंत चुरशीच्या लढतीत विजयी झाले आहेत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेत राजे निंबाळकर यांचा त्यांनी पराभव केला आहे त्यामुळे या पराभवामुळे आ. रामराजे नाईक निंबाळकर यांना धक्का बसल्याचं मानलं जात आहे. 

  • 01:28 PM • 21 Dec 2025

    Maharashtra Nagar Panchayat Election Results 2025 LIVE: वर्ध्यातला नगराध्यक्षपदाचा पहिला निकाल भाजपाकडे...

    वर्ध्यातला नगराध्यक्षपदाचा पहिला निकाल भाजपाकडे आला असून सिंदी रेल्वे नगराध्यक्षपदाच्या भाजपाच्या उमेदवार राणी स्नेहल कलोडे विजयी झाल्याची माहिती आहे. यामध्ये, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सुनीता कलोडे यांचा केला दारुण पराभव झाल्याचं वृत्त आहे. 
     

  • 01:26 PM • 21 Dec 2025

    LIVE Nagar Panchayat Results 2025: नांदेडच्या धर्माबाद नगरपालिकेत मराठवाडा जनहित पार्टी ( औदर) सविता गोलमवाड विजयी

    नांदेड येथील धर्माबाद नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे मराठवाडा जनहित पार्टी (औदर) सविता गोलमवाड विजयी झाल्याचं वृत्त आहे. 

  • 01:23 PM • 21 Dec 2025

    Maharashtra Local Body Election LIVE Updates: वरणगावात भाजपाला धक्का, अपक्ष उमेदवार विजयी

    वरणगावात अपक्ष उमेदवार अध्यक्षपदाचे सुनील काळे विजयी झाले असून यामुळे भाजप पक्षाला मोठा धक्का बसला आहे. 

  • 01:22 PM • 21 Dec 2025

    Maharashtra Local Body Election Results 2025 LIVE: बीडच्या धारूर नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचा विजय

    बीडच्या धारूर नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बाळासाहेब जाधव विजयी झाल्याचं वृत्त आहे. 20 पैकी 11 जागांवर राष्ट्रवादी अजित पावर गट विजयी झाला आहे. 
     

  • 01:20 PM • 21 Dec 2025

    Maharashtra Local Body Election LIVE Updates: जुन्नर नगरपरिषदेतील नगराध्यक्ष पदाचे विजयी उमेदवार

    जुन्नर नगरपरिषदेतील नगराध्यक्ष पदाचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे: 
     
    सुजाता मधुकर काजळे (शिवसेना शिंदे गट)

    नगरसेवक 20

    धनुष्यबाण - 8
    राष्ट्रवादी काँग्रेस - 6
    मशाल 1
    अपक्ष 2
    काँग्रेस-1

    प्रभाग क्रमांक 1: धनुष्यबाण - खोंड राजश्री संदीप, धनुष्यबाण- मंदा किरण बुट्टे 
    प्रभाग क्रमांक 2: शिवसेना - अलका शिवाजी फुलपगार, घड्याळ- प्रशांत दत्तात्रय सराईकर 
    प्रभाग क्रमांक 3: काँग्रेस-  राहीन इसाक कागदी, घड्याळ-अंकिफ इनामदार
    प्रभाग क्रमांक 4: धनुष्यबाण - सुवर्णा श्रीकांत जाधव, धनुष्यबाण - मयूर शिवाजी महाबरे प्रभाग क्रमांक 5: घड्याळ- अनुजा गणेश पातूरकर, धनुष्यबाण - ऍड. समीर बाळासाहेब पुरवन्त
    प्रभाग क्रमांक 6: कमळ- अनिल शिवाजी रोकडे, अपक्ष( राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत ) वैष्णवी श्याम पांडे.
    प्रभाग क्रमांक 7: धनुष्यबाण - अंजली अरुण शिंदे, कमळ- नरेंद्र भालचंद्र तांबोळी 
    प्रभाग क्रमांक 8: मशाल- रूपाली आकाश( गोटू परदेशी), धनुष्यबाण- विक्रम (दादू) किरण सिंग परदेशी
    प्रभाग क्रमांक 9: घड्याळ -सना शफी मन्सूरी, अपक्ष- महमदशेर  जमाहुसेन सय्यद
    प्रभाग क्रमांक 10: घड्याळ- अब्दुल वाजीद अब्दुल रज्जाक इनामदार, अपक्ष- मुमताज बनू रिजवान पटेल

  • 01:15 PM • 21 Dec 2025

    Maharashtra Nagar Panchayat Election Results 2025 LIVE: सावंतवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचं दणदणीत यश

    सिंधुदुर्गच्या सावंतवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने दणदणीत यश मिळवत वीस पैकी 11 जागांवर विजय मिळवून निर्विवाद सत्ता स्थापन केली आहे. भाजपच्या श्रद्धाराजे भोसले यांनी तब्बल 900 मतांच्या फरकाने विजय संपादन करत नगराध्यक्षपदावर आपला दावा मजबूत केला. शिंदे गटाच्या शिवसेनेला 7 जागांवर समाधान मानावे लागले, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला केवळ 1 जागा मिळाली असून काँग्रेसलाही एका जागेवर समाधान मानावे लागले. या निकालामुळे सावंतवाडीत दीपक केसरकर यांच्या बालेकिल्ल्याला मोठा धक्का बसला असून राजकीय समीकरणे बदलल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • 01:13 PM • 21 Dec 2025

    Maharashtra Nagar Panchayat Results LIVE Updates: सांगोला नगरपरिषद शिवसेनेचे उमेदवार आनंदा माने विजयी

    सांगोला नगरपरिषदेत शिवसेनेचे उमेदवार आनंदा माने विजयी झाल्याची माहिती आहेत. माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगोल्याचा गड राखल्याचं बोललं जात आहे. तसेच, सांगोल्यात शेकाप आणि भाजपला मोठा धक्का बसला आहे. 

  • 01:04 PM • 21 Dec 2025

    Maharashtra Nagar Panchayat Results LIVE Updates: बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जय पाटील चौथ्यांदा विजयी

    बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जय पाटील चौथ्यांदा विजयी झाले आहेत. त्यांच्या विरोधात असलेल्या उमेदवाराला केवळ 200 मतांवर समाधान मानावे लागले. जय पाटील यांचा निवडणुकीदरम्यान पैसे मोजतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. जय पाटील चौथ्यांदा विजयी झाले असून त्यापूर्वी त्यांनी उपनगराध्यक्ष म्हणून देखील काम पाहिलं आहे. 

  • 01:02 PM • 21 Dec 2025

    LIVE Nagar Parishad Results 2025: अमरावतीच्या चांदूरबाजारात भाजपला मोठा धक्का, बच्चू कडूंनी होम ग्राउंड राखलं...

    अमरावतीच्या चांदूरबाजारात प्रहारच्या मनीषा नागलिया 125 मतांनी विजयी झाल्या असून बच्चू कडूंनी होम ग्राउंड राखल्याचं सांगितलं जात आहे. तसेच, भाजपच्या कांता अहिर  यांचा निसटता पराभव झाल्याचं वृत्त आहे. 

follow whatsapp