महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई तक

ADVERTISEMENT

maharashtra political crises supreme court decision devendra fadnavis
maharashtra political crises supreme court decision devendra fadnavis
social share
google news

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाने अखेर निकाल दिला असून शिंदे-फडणवीस सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यपालांनी केलेल्या अनेक कृती या घटनाबाह्य असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. पण केवळ उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणीला सामोरं न जाता थेट राजीनामा देणं ही एक चूक त्यांना भोवल्याचं कोर्टाच्या निकालातून समोर येत आहे.या निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालावर ते काय म्हणाले हे आहेत, हे जाणून घेऊय़ात.(maharashtra political crises supreme court decision devendra fadnavis reaction)

ADVERTISEMENT

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने आम्ही समाधानी आहोत. फक्त इतकंच सांगतो, की जे लोक कालपर्यंत उड्य़ा मारत होते, सरकार जाणार त्यांच्या मनसुब्यावर पाणी फिरल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर केली. तसेच ज्या चर्चा होत्या त्या चर्चा किती थोतांड होत्या देखील स्पष्ट झाल्याचे फडणवीस म्हणाले आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री 2 वाजता पत्रकार परीष घेतील, त्यामुळे निकालावर अधिक विश्लेषण आम्ही पत्रकार परिषद घेऊ, असे फड़णवीस म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT