Supreme court : ‘सुप्रीम’ फैसल्यामुळे या दिवशी होणार ‘भूकंप’?
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची मॅरेथॉन सुनावणी 16 मार्च 2023 रोजी पूर्ण झाली. पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने निकाल राखून ठेवला. येत्या 3-4 दिवसांत सुप्रीम कोर्ट हा निकाल लागणार असल्याचं का म्हटलं जातंय.
ADVERTISEMENT

शिंदे सरकार घटनाबाह्य आणि ते कोसळणार म्हणजे कोसळणारच असं आदित्य ठाकरे गेल्या दहा महिन्यांपासून छातीठोकपणे सांगत आहेत. पण कसं आणि कधी कोसळणार हे मात्र सांगत नाहीत. या दाव्यामागे सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा आधार असल्याचं म्हटलं जातंय. कोणत्याही क्षणी सुप्रीम फैसला येणार आहे. येत्या 3-4 दिवसांत हा निकाल लागणार असल्याचं का म्हटलं जातंय, त्यामुळे भूकंप होईल का, या सगळ्यांचा अर्थ काय हेच समजून घेऊयात…
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची मॅरेथॉन सुनावणी 16 मार्च 2023 रोजी पूर्ण झाली. पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने निकाल राखून ठेवला. सुनावणीनंतर साधारणतः महिनाभरात निकाल लागतो. 16 एप्रिलला महिना झाला. आता दुसरा महिनाही होतोय. पण त्याआधीच महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा आणि भवितव्य ठरवणारा सुप्रीम निकाल लागण्याची दाट शक्यता आहे.
हेही वाचा >> ‘उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणं अशक्य’; देवेंद्र फडणवीसांचं ‘मुंबई Tak बैठक’मध्ये मोठं भाकित
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे झाली. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वातील या घटनापीठात न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. नरसिंहा यांचा समावेश आहे.
Maharashtra Political Crisis : सुप्रीम कोर्टाचा निकाल कधी?
यापैकीच एक न्यायमूर्ती एम. आर. शाह येत्या 15 मेला सेवानिवृत्त होणार आहेत. आणि संकेत असा आहे, की सुनावणी पूर्ण झाली असेल आणि संबंधित घटनापीठातील एखादे न्यायमूर्ती सेवानिवृत्त होणार असतील, तर त्यांच्या सेवानिवृत्तीआधी निकाल दिला जातो. अयोध्येतील बाबरी मशिदीबद्दल तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वातील पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी झाली. आणि गोगोईंच्या निवृत्तीआधी राखीव ठेवलेला निकालही जाहीर झालं. त्यामुळेच महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाचा निकालही एम. आर. शाह यांच्या निवृत्तीआधी म्हणजेच 14 मेच्या आधी लागण्याची दाट शक्यता आहे.










