Majhi Ladki Bahin Yojana: 'या' महिलांना मिळणार 4,500 रूपये! मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा
Majhi Ladki Bahin Yojana : जळगाव येथील दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदेंनी नवीन माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना 3 हप्त्यांचे म्हणजे एकूण 4 हजार 500 रुपये मिळणार आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हफ्त्याबाबत मुख्यमंत्री शिंदेंनी जळगावात मोठी घोषणा केली.
'या' महिलांना मिळणार 4,500 रूपये!
31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख
Who Will Get First installment of 4,500 rs in Ladki Bahin Yojna? : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या घोषणेनंतर राज्यातील महिलांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. त्यांचा या योजनेला उत्सफूर्द असा प्रतिसाद मिळत आहे. रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता जमा होणार असल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत आता लाडक्या बहिणींना भेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात दौरा सुरू करण्यात आला आहे. मंगळवारी (13 ऑगस्ट) जळगाव जिल्ह्यातून पहिल्या दौऱ्याला सुरूवात झाली. यावेळी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हफ्त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. (Majhi Ladki Bahin Yojana these women will get 4,500 rupees of first installment cm eknath shinde made big announcement)
ADVERTISEMENT
रक्षाबंधनाच्या आधी म्हणजे 17 ऑगस्टला मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. यासाठी आता फक्त 2 दिवस उरले आहेत. आतापर्यंत राज्यात 1 कोटी 40 लाख महिलांची नोंदणी पूर्ण झाली आहे. यावेळी जळगाव येथील दौऱ्यात शिंदेंनी नवीन माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना 3 हप्त्यांचे म्हणजे एकूण 4 हजार 500 रुपये मिळणार आहेत.
हेही वाचा : "...याचं पुतण्या म्हणून कायम दुःख राहील", रोहित पवारांची अजित पवारांसाठी 'पोस्ट'
'या' महिलांना मिळणार 4,500 रूपये!
लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे. पण या योजनेची सुरूवात जुलै महिन्यापासून झाली आहे. यावेळी अर्ज करण्याची अंतिम तारीख पुढे ढकलण्यात आली आणि 31 ऑगस्ट अर्ज करण्याची शेवटची तारीख म्हणून निश्चित केली गेली. अशा परिस्थितीत, ज्या महिलांनी जुलै महिन्यात किंवा 17 ऑगस्टपूर्वी अर्ज केले आहेत त्यांना दोन हफ्त्यांचे पैसे म्हणजेच 1500 नुसार 3000 रूपयांचा पहिला हफ्ता मिळणार आहे.
हे वाचलं का?
हेही वाचा : Maharashtra Weather: मुंबईकरांची होणार धावपळ! तुमच्या भागांत कसा असेल पाऊस?
तर, ज्या महिला 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करणार त्यांना सप्टेंबर महिन्यासह जुलै आणि ऑगस्ट असे तीन महिन्यांचे हफ्ते मिळणार आहेत. एकाच वेळी महिलांच्या खात्यात 3 हप्त्यांचे म्हणजे एकूण 4 हजार 500 रुपये जमा होतील. नंतरसुद्धा ही योजना सुरू राहणार असून महिलांना दरमहा 1500 रूपये मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
हेही वाचा : Baramati Vidhan Sabha: अजित पवारांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला!
लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या होणार सक्षम
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत. यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळ, महिला सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेबरोबर राज्यातील विकास कामांना खीळ न बसू देता ते अविरतपणे चालू ठेवण्यात येतील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT