लाइव्ह

Maharashtra Breaking LIVE : 'अशोकरावांना पश्चाताप होईल, चुकीचा निर्णय घेतला', कुणी केली टीका?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Congress leader Balasaheb Thorat has said that Ashok Chavan took a wrong decision, pressure or selfishness has to be checked behind it.
अशोक चव्हाणांनी चुकीचा निर्णय घेतला, त्यामागे दबाव की स्वार्थ हे तपासावे लागेल, असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.
social share
google news

Ashok Chavan to Join Bjp : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेसची साथ सोडली होती.  त्यानंतर दोन दिवसात ते आपला निर्णय कळवणार होते. त्यात आता ते आजच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. या घडामोडीसह राज्यातील इतर घडामोडींसाठी मुंबई तक लाईव्ह ब्लॉग नक्की वाचा. 

लाइव्हब्लॉग बंद

 • 09:31 PM • 13 Feb 2024

  शिवाजी पार्कवर सभा घेणारे आता गल्लीबोळात सभा घेतात- उदय सामंतांची ठाकरेंवर टीका

  काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले अशोक चव्हाण हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना मानणारा वर्ग महाराष्ट्राभर आहे. त्यामुळे त्याचा फायदा नक्कीच महायुतीला होणार आहे. त्यांच्यामुळे अनेक आमदार महायुतीत येतील असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख आहेत. त्यामुळे लोकशाहीमध्ये त्यांना त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. पण एकच वाईट वाटतं आहे की, 'शिवाजी पार्कवर सभा घेणारे आता कॉर्नरवर, रस्त्यावर, चावडीवर व गल्लीबोळामध्ये सभा घ्यायला लागले आहेत. त्यामुळे ही त्यांची प्रगती आहे की अधोगती आहे ते आपणच ठरवावे असा टोलाही उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे..

 • 09:23 PM • 13 Feb 2024

  जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ उद्या बीड बंदः मराठा समन्वयकांचे आवाहन

  मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ उद्या महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यामध्ये बंद पुकारण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. तरीही शासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने बीडचे मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाला संपवण्याचा विचार सरकार करत असेल तर मराठा समन्वयकांनी जिल्हा बंदचे आवाहन केले असून, मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक होऊन रस्त्यावर उतरेल असा इशारा मराठा समन्वयकांनी दिला आहे.

 • 07:33 PM • 13 Feb 2024

  अशोक चव्हाण भाजपात जाताच यशोमती ठाकुरांचं ट्विट

  आम्ही मजबूत होतो आणि आहोत. आमच्यातले काहीजण ईडी आणि सीबीआयच्या भीतीमुळे निश्चितच वेगळा विचार करत आहेत. परंतु आम्ही देशाच्या विकासासाठी आणि सर्वधर्मसमभावासाठी अखेरपर्यंत काँग्रेसच्या विचारधारेची एकनिष्ठ राहून काम करणार आहोत. 

  आजच्या प्रमुख नेत्यांच्या  बैठकीत याबाबतच्या विचारावर आम्ही सर्वांनी पुन्हा एकमत व्यक्त केलं. काँग्रेस प्रभारी मा. रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत गांधी भवन येथे काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, विधान परिषदेतील गटनेते माजी मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षाताई गायकवाड, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री विश्वजीत कदम अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुआ, हुसेन दलवाई यांच्यासह नेते उपस्थित होते.

 • 06:35 PM • 13 Feb 2024

  'अशोकरावांना पश्चाताप होईल, चुकीचा निर्णय घेतला', कुणी केली टीका?

  अशोक चव्हाणांनी चुकीचा निर्णय घेतला, त्यामागे दबाव की स्वार्थ हे तपासावे लागेल, असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे. तसेच अशोकरावांना घेतलेल्या निर्णयाचा त्यांना पश्चाताप होईल.  

  ईडी आणि यंत्रणांचा वापर केवळ विरोधकांना दाबण्यासाठी होतोय, काँग्रेसने स्वपक्षातील नेत्यांवरही कारवाई केली होती. देशभरात 150 पेक्षा अधिक विरोधी पक्षाच्या नेत्यांवर ईडीची करावाई सुरु आहे, त्यात भाजपच्या नेत्यांची नावं कुठे आहेत?  असा सवालही थोरात यांनी उपस्थित केला. 

  महाराष्ट्रातील इतर काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाणांसोबत जाणार नाहीत. आम्ही 15 तारखेला सगळ्या आमदारांची बैठक बोलावली आहे, त्यात पुढच्या रणनीतीची चर्चा करु. तसेच जागावाटपाबद्दल कुठलाही गोंधळ नाही, आम्ही सगळे मित्रपक्ष बसून ठरवू, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. 

 • ADVERTISEMENT

 • 04:07 PM • 13 Feb 2024

  उदय सामंतांचा ठाकरेंना टोला

  अशोक चव्हाण हे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांना मानणारा वर्ग महाराष्ट्राभर आहे.नक्कीच महायुतीला त्यांचा फायदा होईल व अनेक आमदार महायुतीत येतील, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे. 

  उ.बा.ठा. चे ते पक्षप्रमुख आहेत.लोकशाहीमध्ये त्यांना त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. पण एकच वाईट वाटतंय की शिवाजी पार्कवर सभा घेणारे आता कॉर्नरवर ,रस्त्यावर, चावडीवर व  गल्लीबोळामध्ये सभा घ्यायला लागेलत त्यामुळे ही त्यांची प्रगती आहे की अधोगती आहे ते आपणच ठरवावे, असा टोला उदय सामंतांनी ठाकरेंना लगावला. 

 • 02:14 PM • 13 Feb 2024

  अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेस घेणार पत्रकार परिषद

  आम्ही शरद पवार यांच्यासोबत बैठक घेतली आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाबद्दल बोललो. आम्ही उद्धव ठाकरेंना भेटलो होतो आणि आम्ही लवकरच जागा वाटपाचा निर्णय घेऊ. आमची भेट चांगली झाली आणि आम्ही एकत्र काम करू, असे रमेश चेन्नीथला म्हणाले आहेत. तसेच अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशावर रमेश चेन्नीथला यांनी बोलणे टाळले आहे. आम्ही 3 वाजता पत्रकार परिषद घेऊन बोलू, असे रमेश चेन्नीथला यांनी माध्यमांना सांगितले. 

 • ADVERTISEMENT

 • 01:57 PM • 13 Feb 2024

  आजपासून भाजपमध्ये कामाला सुरुवात करतो

  पक्ष सोडल्यानंतर काहींनी टीपण्णी केली, काहींनी समर्थन केले. पण मी कुणावरही दोषारोप केले नाही आणि करणारही नाही. आजपासून भाजपमध्ये कामाला सुरुवात करतो, असे चव्हाण म्हणालेत.

  एक नवीन सरूवात मी करतो आहे. भाजपचे जी ध्येयधोरणे आहेत. त्या पद्धतीने निश्चितच काम केले जाईल. पक्ष जो मला आदेश देईल, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील त्या पद्धतीने काम करण्याचा माझा मानस आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले आहेत. 

 • 01:33 PM • 13 Feb 2024

  भाजपमध्ये प्रामाणिकपणे काम करेन : अशोक चव्हाण

  गेल्या 38 वर्षाचा राजकीय प्रवास आहे, आज मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली, स्फुर्ती आणि प्रेरणा घेऊन, देशामध्ये आणि राज्यामध्ये चांगलं काम करता आलं पाहिजे, सकारात्मक भूमिका घेऊन पुढील वाटचाल केली पाहिजे आणि राज्याच्या आणि देशाच्या योगदान दिलं पाहिजे, या प्रामाणिक भूमिकेतून पक्षप्रवेश केला असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे. 

  देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होते आणि मी मुख्यमंत्री होतो. तोही कालावधी आम्ही अनुभवला आहे. विकास करताना आम्ही दोघांची सकारात्मक भूमिका घेतली आहे.विरोधी पक्षात असताना सुद्धा फडणवीसांनी माझ्या जिल्ह्याला न्याय देण्याची भूमिका घेतली आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले आहेत. 

  मी आजपर्यंत प्रामाणिकपणे काम केलेले आहे. आणि मी तुम्हाला ग्वाही देऊ इच्छितो की भाजपमध्ये प्रामाणिकपणे काम करेन, पक्षाला कशी ताकद मिळेल, आगामी निवडणूकीत जास्तीत जास्त यश देशात तर मिळेलच पण महाराष्ट्रात कशा पद्धतीने मिळवता येईल, यासाठी माझ्या अनुभवाचा वापर करवून मिळवू, असे अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

 • 01:23 PM • 13 Feb 2024

  देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत अशोक चव्हाणांचा भाजपमध्ये प्रवेश

  ज्येष्ठ नेतृत्व, अनेक वर्ष लोकसभा, विधानसभा गाजवली, विविध मंत्रीपदे भूषवली आणि दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे, ते अशोक चव्हाण  भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, आमच्यासाठी आनंदाच दिवस आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

 • 11:23 AM • 13 Feb 2024

  'मी आज भाजपमध्ये प्रवेश करणार'

  आज मी माझ्या राजकीय आयुष्याची पुन्हा नव्याने सुरूवात करतोय.मी रितसर भापजमध्ये प्रवेश करणार आहे. दुपारी 12 ते 12.30 च्या आसपास देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलारांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहे, मी पक्षप्रवेशासाठी निघालो आहे, असे अशोक  चव्हाण यांनी माध्यमांना सांगितले आहे. 

 • 10:32 AM • 13 Feb 2024

  चव्हाणांच्या भाजप प्रवेशावर दानवेंनी फडणवीसांना डिवचलं

  आज अशोक चव्हाण औपचारीकपणे भाजपवासी होणार, अश्या बातम्या आहेत. खरं तर ते एका उंचीचे लोकनेते आहेत. त्यांचा प्रवेश देश पातळीवरील एखाद्या नेत्याने करून घेणे अपेक्षित होते ज्याला चव्हाणांच्या बरोबरीचा जनाधार आहे.पण ज्यांना 'डिमोशन'चे बक्षिस मिळाले, तेच चव्हाणांना प्रवेश देणार आहेत म्हणे. सोबत आमदारकीसाठी हातपाय आपटणारे एक बारावे खेळाडू असणार आहेत म्हणे..

 • 09:04 AM • 13 Feb 2024

  एक व्यक्ती गेली म्हणून पूर्ण पक्ष डिस्टर्ब होत नाही

  राजकारणात पक्षात बदल होत असतात. एक व्यक्ती गेली म्हणजे पूर्ण पक्ष डिस्टर्ब झाला असं समजण्याचा कारण नाही नक्कीच नाही. या परिस्थितीतून काँग्रेस नव्याने उभारी घेईल आणि पक्ष मजबुतीने उभा राहील, असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. त्याचसोबत माझ्या संदर्भात काही ववड्या पसरवण्याचा काम सुरू होते.अमरावतीचा रवी राणाची प्रवृत्ती निष्ठा बदलून विस्टा खाण्याची आहे, अशी बोचरी टीका वडेट्टीवरा यांनी रवी राणा यांच्यावर केली

  मला काँग्रेस पक्षाने खूप काही दिलेला आहे. आता मला फार काही अपेक्षा नाही. शेवटपर्यंत काँग्रेसमध्ये राहून या विचारधारेबरोबर काम करण्याची निर्धार मी केलेला आहे. अशोकराव चव्हाण यांच्याशी माझे पंधरा वर्षे सोळा वर्षापासून कौटुंबिक स्नेहाचे संबंध आहे.मग मुंबईची इंडियाची आघाडीची बैठक असेल नागपूरला असलेली काँग्रेसची सभा असो आम्ही खांद्यावर घेऊन काम केलेला आहे संबंध आणि विचारधारा वेगळी आहे.चव्हाण यांचा राजीनामा बद्दल प्रदेशाध्यक्ष बाबत मला फार काही माहिती नाही त्यावर मी बोलणार नाही.
   

 • 08:52 AM • 13 Feb 2024

  अशोक चव्हाणांचा आजच होणार भाजप प्रवेश?

  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेसची साथ सोडली होती. त्यानंतर येत्या 15 फेब्रुवारीला छत्रपती संभाजी नगरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती. मात्र आजच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. 

  अशोक चव्हाण यांचा आजच दुपारी साडेबारा वाजता भापज प्रदेश पक्ष कार्यालयामध्ये पक्षप्रवेश होणार आहे. उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत माजी आमदार अमर राजूरकर हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहे. 

follow whatsapp

ADVERTISEMENT