श्री सदस्य मृत्यू: राज ठाकरेंनी शिंदेऐवजी उद्धव ठाकरेंनाच झापलं…

मुंबई तक

ADVERTISEMENT

MNS Chief Raj Thackeray today met Chief Minister Eknath Shinde at Sahyadri Guest House. Various topics were discussed on this occasion.
MNS Chief Raj Thackeray today met Chief Minister Eknath Shinde at Sahyadri Guest House. Various topics were discussed on this occasion.
social share
google news

मुंबई : महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan) सोहळ्यादरम्यान 14 श्री सदस्यांचा मृत्यू झाल्याने या संपूर्ण सोहळ्यालाच गालबोट लागलं. त्यामुळे शिंदे सरकारवर (Shinde Govt) सध्या बरीच टीका केली जात आहे. महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. काँग्रेसने तर या सोहळ्यातील मृतांबाबत 24 एप्रिलला मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचा इशारा दिला आहे. (MNS Chief Raj Thackeray today met Chief Minister Eknath Shinde at Sahyadri Guest House. Various topics were discussed on this occasion.)

ADVERTISEMENT

त्याचवेळी दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मात्र हा एक अपघात असल्याच म्हणतं महाविकास आघाडीला या अपघाताचं राजकारण न करण्याचा सल्ला दिला आहे. राज ठाकरे यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी शिंदे आणि ठाकरेंमध्ये बीडीडी चाळी, सिडको सोडतधारक यांचा घरांचा प्रश्न, मराठी भाषा सक्तीचा मुद्दा अशा विविध विषयांवर चर्चा झाली. यानंतर माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी खारघर दुर्घटनेवर प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा >> ‘आमच्या पोटात काही नव्हतं’; जखमींनी अजित पवार, उद्धव ठाकरेंना काय सांगितलं?

काय म्हणाले राज ठाकरे?

कोरोनाच्या काळातही अनेक प्रकारचा हलगर्जीपणा झाला आहे, त्यावरुनही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आजही दाखल करता येऊ होऊ शकतो. त्यामुळे यावरुन राजकारण करु नये. ती सकाळची वेळ खरंतर करायला नव्हती पाहिजे. मी त्यादिवशी नवी मुंबईमध्येही म्हटलं, धर्माधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनीच सांगायला हवं होतं, त्यांच्या एकटांच्या सत्कार राजभवनावर झाला असता तर इतक्या सगळ्या लोकांना आणण्याची गरज लागली नसती. धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण मिळाला आहे, हा सत्कार त्यांच्यापर्यंत पोहचलाच असता. हा झालेला एक अपघात आणि अपघाताचं काय राजकारण करायचं? असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.

हे वाचलं का?

हेही वाचा >> आप्पासाहेब धर्माधिकारींची ‘श्री समर्थ बैठक’ म्हणजे काय.. लाखो श्रीसेवक त्यांना का मानतात?

महाराष्ट्र भूषण सोहळा चौकशीसाठी सरकारकडून समिती स्थापन :

दरम्यान, ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यानंतर झालेल्या दुर्दैवी घटनेच्या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याकरिता एक सदस्यीय समिती नियुक्त करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची ही समिती असेल. ही समिती एका महिन्याच्या मुदतीत याबाबतचा अहवाल सादर करेल. भविष्यातील अशा प्रकारच्या समारंभाच्या आयोजनाच्या बाबतीत कोणत्या गोष्टींची काळजी- दक्षता घ्यावी, याबाबतही समिती शासनास शिफारशी करेल, असंही सांगण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT