Thackeray vs Thackeray: शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला, 'कोरोना काळात बंगल्यात...'

मुंबई तक

ADVERTISEMENT

शर्मिला ठाकरेंनी केली उद्धव ठाकरेंवर टीका
Sharmila_Thackeray_criticized_Uddhav_Thackeray
social share
google news

Sharmila Thackeray criticize Udhhav thackeray: पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या गेल्या काही दिवसांपासून राजकारणात सक्रीय झाल्याचं दिसून येत आहे. मनसेच्या अनेक कार्यक्रमात त्या सक्रिय भाग घेताना दिसत आहे. विशेष म्हणजे नुसता सक्रिय भागच नव्हे तर टीकास्त्र डागतानाही दिसल्या आहेत. आता असेच पुण्याच्या एका कार्यक्रमात शर्मिला ठाकरे  (sharmila thackeray) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर (udhhav thackeray) जोरदार हल्ला केला आहे. कोविड काळात सत्ताधारी पक्ष बंगल्यात बसला होता अशी टीका शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. ( mns sharmila thackeray criticize udhhav thackeray pune news raj thackeray mns maharashtra politics)

शर्मिला ठाकरेंनी नेमकी काय केली टीका?

पुण्यातील कोंढवा गावातील प्रथम महिला नगरसेविका आरती बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. शर्मिला ठाकरे म्हणाल्या की,  मार्च-एप्रिलला लोकसभा निवडणूका सुरू होतील. तर ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूका होतील आणि पुढच्या वर्षी महापालिका निवडणूका लागतील. तरी सुद्धा आमची कामे थांबत नाही, आम्ही निवडून येऊ किंवा नको येवोत. तसेच कोविड काळात आपल्या पक्षाने जी कामे केली ती कुठल्याही पक्षाने केली नव्हती. तेव्हा सत्ताधारी बंगल्यात बसले होते, असा टोला शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

दरम्यान आपला पक्ष त्यावेळी रस्त्यावर होता.  आपण आपली चांगले चांगले मनसैंनिक गमावले. आमचा पक्ष इतकी काम करत होता. इतके चांगले उमेदवार होते, इतकी चांगली काम केली होती. पण लोकांनी (मतदानाच्यावेळी) चुक केली. पण मला यावेळी वाटते लोत ही चुक करणार नाही आणि चांगले उमेदवार निवडून आणतील, असा विश्वास शर्मिला ठाकरेंनी जनतेवर व्यक्त केला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

तसेच तुमच्या फोनवर उपलब्ध असलेले चांगले उमेदवार आहेत. हे उमेदवार तुमची कामं पटापट करतात. त्यांना तुम्ही तिथे नेऊन बसवा. त्यांना नक्कीच मला वरच्या स्तरावर बघायचं आहे”, असंही शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

धारावी पुर्नविकासाच्या मुद्यावरून ठाकरेंना घेरले

शर्मिला ठाकरे यांनी धारावी पुर्नविकास आणि मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन देथील ठाकरेंना घेरले होते.धारावीचा पुनर्विकास करायचाच होता तर तुमचं सरकार असताना करून टाकायचा, कोणी तुमचे हात धरले होते, असा सवाल शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला. राज्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी विरोधक करत आहेत. मात्र, तुमचं सरकार असताना तुम्ही आरक्षणाचे विधेयक विधानसभेत का मंजूर केलं नाही? हा प्रश्न तर कोरोना काळात सुरू झाला नव्हता. मराठा समाजाच्या आरक्षणाचे मोर्चे वर्षानुवर्षे निघत आहेत. मग तुम्ही त्यांना आरक्षण का दिलं नाही? असा सवाल शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला विचारला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT