Mood of the nation : राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ने काय कमावलं आणि गमावलं, ते लोकांनीच सांगितलं…

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

mood of the nation Congress Rahul Gandhi Bharat Jodo Yatra
mood of the nation Congress Rahul Gandhi Bharat Jodo Yatra
social share
google news

Rahul Gandhi : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेला सुरुवात केल्यापासून ती यात्रा प्रचंड चर्चेत आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा आणि 2024 च्या निवडणुकीआधी भारत जोडो पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण आता आज तकने मूड ऑफ द नेशन हा सर्वे केला आहे. या सर्वेमध्ये आज तक देशातील नागरिकांना राहुल गांधींबाबत अनेक सवाल उपस्थित केले आहेत. हे प्रश्न भारत जोडो यात्रेसंदर्भातही होते.

ADVERTISEMENT

राहुल गांधी यांची प्रतिमा बदलली

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेबाबत प्रश्न उपस्थित करताना लोकांना विचारले की, भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी यांची प्रतिमा किती बदलली आहे. त्यांच्या या प्रश्नानंतर 44 टक्के लोकांना सांगितले की, या यात्रेमुळे राहुल गांधी यांच्याकडे बघण्याची प्रतिमा सुधारली आहे. तर 33 टक्के लोकांना वाटले की, त्यांची प्रतिमा जैसे थी अशीच राहिली आहे. तर 13 टक्के लोकांनी म्हटले आहे की, जी प्रतिमा होती, त्यापेक्षा त्यांची प्रतिमा खराब झाली आहे.

विरोधक म्हणून फेल

त्यानंतर राहुल गांधी यांनी विरोधी पक्षात असणाऱ्या राहुल गांधी यांचे काम कसे आहे त्याबद्दल लोकांच्या मनात काय भावना आहेत. याबद्दलही प्रश्न करण्यात आले तेव्हा 34 टक्के लोकांनी सांगितले की, राहुल गांधी यांचे काम आणि त्यांचे भाषण जबरदस्त झाले आहे. तर 18 टक्के लोकांना म्हटले की, त्यांचे काम निश्चितच चांगले आहे. तर 15 टक्के लोकांनी त्यांचे विरोधात असणं ठिक असल्याचे सांगत 27 टक्के लोकांनी विरोधक म्हणून त्यांची प्रतिमा वाईट झाली आहे.

हे वाचलं का?

सदस्यत्व पुन्हा एकदा बहाल

सर्वोच्च न्यायालयाकडून राहुल गांधी यांना रद्द केलेले संसदेचे सदस्यत्व पुन्हा एकदा बहाल केले आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा वडनगरचे खासदार म्हणून पुन्हा एकदा चर्चेत आले.‘मूड ऑफ द नेशन’च्या माध्यमातून राहुल गांधी यांच्या सदस्यत्वाबद्दल नागरिकांना सवाल केला. त्यावर 31 टक्के लोकांनी या निर्णयाचे समर्थन आणि स्वागतही केले. तर 21 टक्के लोकांनी हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगितले. तसेच 31 टक्के लोकांनी हा निर्णय राजकीय हेतूने घेतला असल्याचे म्हटले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT