Vidhanparishad Election: महायुतीत कुस्ती.. 'ही' इलेक्शन जागेवर फिरलीय!

निलेश झालटे

Nanded VidhanParishad Election: भाजपमध्ये प्रवेशानंतर अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अमरनाथ राजूरकर यांना उमेदवारी मिळाल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.

ADVERTISEMENT

nanded legislative council election clash between mahayuti and maha vikas aghadi will election prove difficult for ashok chavan here are reasons
Vidhanparishad Election
google news

नांदेड: नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत यंदा राजकीय चुरस वाढताना दिसत आहे. इथं महत्त्वाचं म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीतील अंतर्गत संघर्ष समोर आल्यानं जोरदार चर्चा सुरुय. भाजप, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने सध्या तरी निवडणूक बहुरंगी झालय. विशेष म्हणजे भाजपमध्ये प्रवेशानंतर अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अमरनाथ राजूरकर यांना उमेदवारी मिळाल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. 

या निवडणुकीत कुणाकडे किती मतं? गणित कसं आहे? अशोक चव्हाण यांना विधानपरिषद जड जाणार का? उमेदवारांची नेमकी ताकद काय? जाणून घ्या नेमकं गणित काय.

नांदेड विधान परिषदेचं नेमकं गणित काय?

अपडेट अशी आहे की, नांदेड विधानपरिषद निवडणुकीसाठी दाखल झालेले ८ उमेदवारांचे एकुण 17 अर्ज मंगळवारी झालेल्या छाननीत वैध ठरले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ४ जून असल्याने राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. नांदेडच्या राजकीय वर्तुळात अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या विधान परिषद निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार असे संकेत आहेत. मात्र दोन्ही बाजूला अंतर्गत संघर्ष आहे. हा संघर्ष मॅनेज करण्यात कोण बाजी मारतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 

आता महायुतीच्यावतीने भाजपचे अमरनाथ राजूरकर, काँग्रेसचे रामदास पाटील, यांच्यासह ज्योतिबा खराटे, कृष्णा नागेश पाटील (अपक्ष),प्रविण पाटील चिखलीकर, माधवराव पवार, पंकज गायकवाड, प्रशांत इंगोले या आठ उमेदवारांनी एकुण 17 अर्ज दाखल केले होते. यापैकी अमरनाथ राजूरकर आणि रामदास पाटील या दोघांनीही नामनिर्देशनपत्रांसोबत आपापल्या पक्षाचा एबी फॉर्म दाखल केला आहे.  

हे वाचलं का?