Sanjay kaka patil : “जयंत पाटील लवकरच भाजपात प्रवेश करणार”

मुंबई तक

ADVERTISEMENT

hasan mushrif big statement on jayant patil oath in mahayuti ncp crisis ajit pawar sharad pawar
hasan mushrif big statement on jayant patil oath in mahayuti ncp crisis ajit pawar sharad pawar
social share
google news

स्वाती चिखलीकर, सांगली: 

ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) भाजपात प्रवेश करणार,अशी चर्चा गेल्या अनेक महिन्यापासून राजकीय वर्तुळात सुरू आहे. या चर्चेवर जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण देऊन पडदा टाकला होता.मात्र तरी देखील आता पुन्हा एकदा जयंत पांटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहे. यावेळेस चर्चा सुरू होण्यामागचे कारण भाजप खासदार संजयकाका पाटील (SanjayKaka Patil) ठरले आहेत. कारण खा. संजयकाका पाटील यांनी जयंत पाटील लवकरच भाजपात प्रवेश करणार असे सूचक विधान केले आहे. या विधानानंतर जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. (ncp jayant patil join bjp soon bjp mp sanjaykaka patil big statement maharashtra politics)

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे लवकरच भाजपामध्ये जाणार असल्याचे सूचक विधान सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांनी केले आहे. ते सांगली जिल्ह्यातील मिरज येथे एका कार्यक्रमात बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगली जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी घेतलेल्या बैठकीत जयंत पाटील यांचे समर्थक हजर होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नेमके कुठे जाणार असा सवाल करण्यात आला होता. यावर ते भाजपामध्ये येऊ शकतात असे सूचक विधान सांगलीचे भाजपाचे खासदार संजयकाका पाटील यांनी केले आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Supriya Sule : “राष्ट्रवादीमध्ये अजूनही फूट पडलेली नाही”, सुळेंचं मोठं विधान

तसेच 15 दिवसापुर्वीच जयंत पाटलांनी सुरेश भाऊंचा कार्यक्रम घेतला. त्यात आता जयंत पाटील भाजपमध्ये येतात की राष्ट्रवादीत जातात किंवा अजित दादांच्या गटात राहतात…पण लवकरच प्रवेश आपल्या बिळाशी आहे, भाजपच्या होकायंत्राच्या बळावर आपण दिशा ठरवूया,असे खळबळजनक विधान करून संजयकाका पाटील यांनी जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाचे सूचक विधान केले.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा प्रश्न सुप्रिया सुळे यांना माध्यमांनी केला होता, यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “संजयकाका पाटील काय बोलले, हे मी काही ऐकलं नाही. संजयकाका पाटील आणि माझी अलिकडेच भेट झाली होती. आम्ही संसदेत भेटलो होतो. त्यावेळी मला याबद्दल काही बोलले नाही. पण, आता त्यांना भेटले की मी नक्की विचारेन.”, असे त्या म्हणाल्या.

ADVERTISEMENT

जयंत पाटील काय म्हणाले?

दरम्यान याआधी देखील गृहमंत्री अमित शाह पुण्यात असताना अजित पवार यांनी जयंत पाटलांची त्यांच्याशी भेट घडवून आणल्याचे वृत्त अनेक प्रसिद्धी माध्यमांनी दिले होते. यावेळी देखील जयंत पाटलांच्या प्रवेशाची चर्चा सुरु झाली होती. यावर जंयत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली होती. “माझ्याविषयी गैरसमज पसरवू नका. मी शाहांना भेटलो याचे काही पुरावे आहेत का? मी संध्याकाळी आणि आज सकाळी पवारसाहेबांसोबत होतो. रात्री दीड वाजेपर्यंत अनिल देशमुख, राजेश टोपेंसोबत बैठकीत होतो. माझ्यासाठी मनोरंजन आहे, असे जयंत पाटील म्हणाले होते.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : India Alliance : मुंबईतील बैठकीत विरोधक दोन गोष्टी ठरवणार, काय आहे अजेंडा?

“मी माझ्याच घरी आहे. तुम्हीच बातम्या करतायत, तुम्हीच खुलासे करा. आमच्या पक्षवाढीसाठी बैठका सुरू आहेत. माझ्यावर कुणाचा दबाव नाही. मला कुणी सांगितलेले नाही किंवा मी असं काही बोललेलो नाही. कुणाशीच चर्चा झालेली नाही. मी दररोज पवारसाहेबांना भेटतोय. माझी रोज करमणूक सुरू आहे. त्यात काल दुपारी भर पडली. आज सुरू आहे. महाराष्ट्रात माझ्याविषयी गैरसमज पसरवणारी आहे. हे योग्य नाही”, अशी भूमिका जयंत पाटील यांनी मांडली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT