Supriya Sule NCP Split : अजित पवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमधील आमदारांचा एक बाहेर पडला. त्यानंतर हा गट भाजप-शिवसेना सरकारमध्ये सामील झाला. या घटनेला दीड महिना होऊन गेला असला, तरी राष्ट्रवादीचा कोणता आमदार कोणत्या गटात असा प्रश्न कायम आहे. त्यातच दुसरीकडे अजित पवार-शरद पवारांची भेट झाली. या भेटीने अनेक चर्चा झाल्या. त्याची धूळ खाली बसत नाही, तोच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केलंय.
पुण्यात सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी खासदार सुळे म्हणाल्या, “अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नाही. आमचे अध्यक्ष शरद पवार आहेत. राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील आहेत. ही आमच्या पक्षाची सध्याची वस्तुस्थिती आहे.”
हेही वाचा >> छत्रपती संभाजीनगर : आईनेच 20 वर्षाच्या लेकीला पेटवले, कारण ऐकून पोलिसही हादरले
पुढे त्या म्हणाल्या की, “आमच्या पक्षाची भाजपबरोबर कोणतीही आघाडी नाही. युती नाही. काही नाही. आमच्यापैकी काही लोकांनी वेगळा निर्णय घेतला आहे. ते आमच्या जेव्हा लक्षात आलं, तेव्हा कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे त्यांच्याबद्दल (अजित पवार गट) जे काही म्हणणं मांडायचं होतं. ते आम्ही मांडलं आहे.”
चोरडियांच्या घरी गुप्त बैठक, सुप्रिया सुळे म्हणाल्या…
चोरडियांच्या घरी बैठक झाली. दोन्ही गट एकत्र येऊन आमचा बळी जाईल, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे, यावरून सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्या म्हणाल्या, “राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुणीच द्विधा मनस्थितीत आहे, असं मला वाटतं नाही. आणि गुप्त मीटिंग आम्ही कधीच करत नाही. चोरडियांच्या घरी जायला काय गुप्तपणा? पवार आणि चोरडिया कुटुंबाची अजित पवार आणि माझ्या जन्माआधीपासूनची मैत्री आहे. त्यामुळे त्यांच्या घरी जायला कसली चोरी?”
आमदारांवर राष्ट्रवादीने कारवाई का केली नाही?
“पक्षातील काही लोकांना फोडण्यात यश आलेलं आहे. गेलेल्या आमदारांवर कारवाई केली गेली नाहीये, कारण एकतर कोण गेलंय याबद्दल आमच्याकडे स्पष्टता नाहीये. आमच्याकडे अजूनही सगळेच आमदार येतात. सगळे साहेबांना (शरद पवार) भेटतात. आम्ही सगळे भेटतो. कांद्याचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर नाशिकमधील आमदारांनी मलाही पत्र लिहिलं. काहीतरी मार्ग काढा. माझ्याकडे पत्र आहेत”, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी कारवाई न होण्याचं कारण सांगितलं.
हेही वाचा >> Congress: शिंदे, अजित पवार गट चोऱ्या लपवण्यासाठी सत्तेत.. हा माणूस काय भानगडी… : पृथ्वीराज चव्हाण
“ज्या लोकांनी शपथ घेतली, त्यातून हे स्पष्ट आहे की, ते या सरकारचा भाग आहेत. त्यांच्यावर कारवाई झालीये. आम्ही प्रक्रिया केलेली आहे. निवडणूक आयोगाने आम्हाला जे प्रश्न विचारलेत, त्याची उत्तरंही आम्ही दिली आहेत”, असेही त्या म्हणाल्या.