‘केंद्रातल्या शकुनीमामाला भीती म्हणून….’, अमोल कोल्हेंचा रोख नेमका कुणावर?
Maharashtra Politics Latest News : केंद्र सरकारला सत्तेत 9 वर्ष झाली आहेत. या 9 वर्षातली पाप बघितल्यानंतर जनता आपल्याला जागा दाखवणार याची भिती बळावल्याने शकुनीमामा जागा झालाय. आणि वेगवेगळे फासे टाकून राष्ट्रवादीवर ही परिस्थिती उद्भवल्याची टीका शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केले आहे.
ADVERTISEMENT
Maharashtra Politics Latest News : केंद्र सरकारला सत्तेत 9 वर्ष झाली आहेत. या 9 वर्षातली पाप बघितल्यानंतर जनता आपल्याला जागा दाखवणार याची भिती बळावल्याने शकुनीमामा जागा झालाय. आणि वेगवेगळे फासे टाकून राष्ट्रवादीवर ही परिस्थिती उद्भवल्याची टीका शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol kolhe) यांनी केले आहे. अमोल कोल्हे नाशिकच्या येवल्यातील एका सभेत बोलत होते. (ncp sharad pawar group mp amol kolhe criticize central government nashik yewla meering maharashtra politics)
ADVERTISEMENT
राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवारांनी अजित पवारांविरूद्ध मोर्चा उघडला आहे आणि महाराष्ट्रात सभा घ्यायला सुरुवात केली आहे. पहिली सभा अजित पवार गटाच्या छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकल्या येवल्यात घेतली होती. या सभेला राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांच्यासारखे अनेक नेते उपस्थित होते. या सभेत बोलताना अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारच्या 9 वर्षांचा कामांचा हिशेब मांडला.
हे ही वाचा: ‘तुम्हाला काय वाटतं मी गेले असते तर, मला…’, सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट, अजितदादांवर हल्लाबोल
हाच तो शकुनीमामा आहे, ज्याच्यामुळे महाभारत घडलं. म्हणजे आता आपण विरोधात असतो तर त्याला कौरव म्हणतो, ज्याची संख्या जास्त असते त्याला कौरव म्हणतो, ज्याची संख्या कमी असते त्याला पांडव म्हणतो. पण समोरून आक्रमन आलं तर कौरव-पांडव भाऊ एकत्र येऊन मुकाबला करतात. पण याच्यात मीठाचा खडा कोणी टाकला, मीठाचा खडा टाकला हा शकुनीमामाने टाकला. या मीठाच्या खड्याचा आकार टरबूज्या सारखा म्हणतायत, किंवा कमळाच्या फुलासारखा म्हणतायत,पण मला कमळाच फुल दिसतंय, अशी टीका अमोल कोल्हे यांनी भाजपवर केली.
हे वाचलं का?
केंद्रातल्या सरकारला सत्तेत येऊन 9 वर्ष झाली. यानिमित्त अनेक कार्यक्रम सुरु झाले. पण केंद्रात बसलेल्या सरकारला महागाई कमी झाली नाही, 18 कोटी रोजगार आले नाही, शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट झाले नाही, याची जाणील आहे,असे अमोल कोल्हे म्हणाले आहेत. आता ही सगळी पाप बघितल्यानंतर जनता आपल्याला जागा दाखवणार याची भिती बळावल्यानंतर शकुनीमामा जागा झालाय. आणि वेगळे फासे टाकून ही परिस्थिती उद्भवतेय अशी टीका अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारवर केली.
हे ही वाचा: Sharad Pawar Interview: अजितदादांच्या बंडानंतर शरद पवारांची Mega Exclusive मुलाखत जशीच्या तशी
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT