ऑपरेशन सिंदूरचं सत्य समोर आलं अन् पाकिस्तानची दातखिळीच बसली!

मुंबई तक

‘Declassified: Operation Sindoor’ या वेब सीरीजनंतर ऑपरेशन सिंदूरवरील डॉक्युमेंट्रीवर पाकिस्तानच्या ISPR ने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

ADVERTISEMENT

operation sindoor documentary pakistan ispr reaction india
ऑपरेशन सिंदूर
Google CTA

मुंबई: ‘ऑपरेशन सिंदूर’वर डिस्कव्हरी इंडियाने तयार केलेल्या ‘Declassified: Operation Sindoor’ या डॉक्युमेंट्रीनंतर भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. 15 ऑगस्ट रोजी डिस्कव्हरी आणि डिस्कव्हरी+वर या डॉक्युमेंट्रीचा प्रीमियर झाला. या डॉक्युमेंट्रीमध्ये 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या 88 तासांच्या लष्करी कारवाईची माहिती दाखवण्यात आली आहे. लष्करी आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मुलाखतींसह ऑपरेशनची आखणी, लक्ष्यांची निवड आणि हल्ला कसा पार पडला, यासंबंधीचे अनेक पैलू यात मांडण्यात आले आहेत.

या डॉक्युमेंट्रीवर पाकिस्तानच्या लष्कराच्या मीडिया विंग ISPRने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ISPRने भारतावर इतिहास पुन्हा लिहिण्याचा आणि ‘ऑपरेशन सिंदूर’च्या घटनांचे चुकीचे चित्रण केल्याचा आरोप केला. तसेच डॉक्युमेंट्रीतील दावे फेटाळून लावत पाकिस्तानने ‘मरका-ए-हक’चा उल्लेख केला आणि भारतीय हल्ल्यांना प्रत्युत्तर दिल्याचा दावा पुन्हा केला. यासोबतच भारतीय लष्कराची आठ विमाने पाडल्याचा जुना दावाही पाकिस्तानने पुन्हा मांडला.

34 लक्ष्यांची ओळख, त्यातून 9 ठिकाणांची निवड

डॉक्युमेंट्रीमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ‘ऑपरेशन सिंदूर’च्या तयारीदरम्यान भारताने सुरुवातीला 34 संभाव्य लक्ष्यांची ओळख केली होती. त्यानंतर त्यापैकी 9 अचूक ठिकाणांची निवड करण्यात आली. यामध्ये पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या ताब्यातील जम्मू-काश्मीरमध्ये असलेल्या दहशतवादी संघटनांच्या ठिकाणांचा समावेश होता. डॉक्युमेंट्रीनुसार, मुरीदके आणि बहावलपूर यांसारख्या ठिकाणांचाही या लक्ष्यांमध्ये समावेश होता.

हे ही वाचा>> मोदी 'दिमागी नक्सल' म्हणाले अन् इथे नवा पक्ष तयार झाला!

ऑपरेशनची संपूर्ण तयारी अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती. डॉक्युमेंट्रीमध्ये सांगण्यात आले आहे की, 7 मे 2025 रोजी रात्री 1:05 वाजता हल्ले सुरू होण्याच्या काही तास आधीपर्यंतही ऑपरेशनची नेमकी वेळ लष्करातील मोजक्याच लोकांना माहिती होती.