Rahul Narvekar यांच्या निकालावरून दानवेंचा हल्लाबोल, 'पात्र तेच फक्त नावं वेगळी'

ADVERTISEMENT

 Rahul Narvekar Ambadas Danave
Rahul Narvekar Ambadas Danave
social share
google news

NCP MLA Disqualification : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी निकाल दिल्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danave) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. या निकालाबद्दल बोलताना त्यांनी म्हटले आहे की, 'पूर्वीच्या काळी चित्रपटाचे सिक्वल येत होते, त्या सिक्वलमधून नाव बदलायचे आणि तोच सिनेमा पुन्हा दाखवायचे. त्या चित्रपटाच्या सिक्वलप्रमाणेच आजचा राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेचा निकाल आला' अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे. 

न्यायालयाच्या निकषावरून निकाल

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाच्या निकषांवरून पक्षाची राज्यघटना, पक्षाचं नेतृत्व आणि विधिमंडळ गटाच्या बहुमतावरून हा निर्णय दिला असल्याचे सांगितले होते. मात्र त्यांच्या या निकालानंतर अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या निकालावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

निकालाचे ग्राऊंड आधीच तयार

अंबादास दानवे यांनी निकालावरून पोस्ट करताना म्हटले आहे की, 'एका चित्रपटाचा सिक्वल यापूर्वी यायचे. फक्त नाव बदलायचे आणि तोच सिनेमा परत दाखवायचा हेच आज घडलं आहे. मुळात हा निकाल देण्यासाठीचे ग्राउंड निवडणूक आयोगाने अगोदरच तयार करून ठेवले होते. यापेक्षा वेगळा निकाल अपेक्षित नव्हताच. पात्र तेच फक्त नवे वेगळी.' असल्याचा सांगत त्यांनी नार्वेकरांवरही त्यांनी निशाणा साधला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

फक्त नाव बदलायचे

ठाकरे गटाच्या शिवसेनेबाबतही हाच निकाल दिल्यामुळे अंबादास दानवे यांनी हा टोला लगावला आहे. फक्त नाव बदलायचे आणि तोच सिनेमा परत दाखवायचा हेच आज घडलं आहे असं म्हणत त्यांनी ज्या प्रमाणे शिवसेनेचा निकाल त्यांनी दिला होता, तसाच निकाल त्यांनी आताही राष्ट्रवादीचा दिला असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. 

शिवसेनेचाही असाच निकाल

विधानसभा अध्यक्षांच्या निकालावरून शरद पवार गटाला मोठा धक्का बसला असला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील ठाकरे गटाच्या शिवसेना या त्यांच्या मित्र पक्षालाही याच पद्धतीने निकाल नार्वेकरांनी दिला होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेचा निकाल देतानाही त्याच पद्धतीने निकाल दिल्याने त्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> 'रायबरेलीकरांनी मला राजकीय वाटेवर चालायला शिकवलं'

    follow whatsapp

    ADVERTISEMENT