पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण : पद्मसिंहांच्या विरोधात ओमराजेंच्या बाजूने कोणते युक्तीवाद झाले होते?
Pavanraje Nimbalkar Murder Case : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात न्यायालयात पद्मसिंह पाटील यांच्याविरोधात ओमराजेंच्या बाजूने कोणते युक्तीवाद करण्यात आले होते? जाणून घेऊयात..
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण
पद्मसिंहांच्या विरोधात ओमराजेंच्या बाजूने कोणते युक्तीवाद झाले होते?
Pawanraje Nimbalkar murder case, धाराशिव - गणेश जाधव : पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल आज (दि.16) न्यायाधीशांकडून सुनावण्यात येणार होता. मात्र, न्यायालयाने निकालाची तारीख तीन दिवसांनी पुढे ढकलली आहे. निकाल तीन दिवसांनी 20 जूनला सुनावण्यात येणार आहे.. न्यायाधीशांनी निकालाचा मसुदा तयार केलेला आहे. मात्र, त्यामध्ये काही दुरुस्त्या करायच्या असून अंतिम संकलन बाकी आहे. स्टेनोग्राफर रजेवर असल्यामुळे हे काम पूर्ण होऊ शकले नाही. तसेच, संपूर्ण न्यायालयीन सुट्टीदरम्यान न्यायाधीश विविध कामकाज आणि नियुक्त्यांमध्ये व्यस्त होते, त्यामुळे निर्णय अंतिम स्वरूपात तयार करता आला नाही. दरम्यान, या प्रकरणात ओमराजे निंबाळकर यांच्या आई आनंदीराजे निंबाळकर यांनी न्यायालयात कोणते युक्तीवाद केले होते? जाणून घेऊयात...
मृत्युदंड द्या - शांत डोक्याने नियोजनबद्ध कट, आनंदीदेवी राजेनिंबाळकरांची कोर्टाला विनंती
हेतु, शत्रुत्वसह हत्याकांड पुर्वी व नंतरचा घटनाक्रम - तेरणा ट्रस्ट, कारखाना, निवडणुक वाद, भागीदारी
कै. पवनराजे निंबाळकर व त्यांचा ड्रायव्हर समद काझी या दुहेरी हत्याकांडात पवनराजे यांच्या पत्नी आनंदीदेवी राजेनिंबाळकर यांच्या वतीने कोर्टात लेखी युक्तीवाद सादर केला होता. डॉ पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 आरोपीनी शांत डोक्याने नियोजनबद्ध कट रचून हे दुहेरी हत्याकांड केले, संशयाच्या पलीकडे जाऊन सर्व पुरावे असल्याने व आरोप सिद्ध होत असल्याने आरोपीना मृत्यु दंडाची शिक्षा करावी अशी विनंती आनंदीदेवी राजेनिंबाळकर यांनी कोर्टास केली होती. ऍड पी एम गवाड यांनी युक्तिवाद सादर केला होता. मुंबईतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश एस आर नावंदर यांच्या कोर्टात सुनावणी सुरु होती.









