‘…म्हणून भाजप बिधुरींसारख्या माणसांना पुढं करतं’, राहुल गांधींनी साधला निशाणा

मुंबई तक

ADVERTISEMENT

rahul gandhi criticism bjp promoting people representatives ramesh bidhuri divert attention one nation one election
rahul gandhi criticism bjp promoting people representatives ramesh bidhuri divert attention one nation one election
social share
google news

Rahul Gandhi: देशातील अनेक महत्वाचे मुद्दे आणि विषयच आता गायब करण्यात आले आहेत. एक देश, एक निवडणूक या मुद्यावरुन लक्ष भटकवण्यासाठीच भाजपचीच ही खेळी असल्याची टीका काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (MP Rahul Gandhi) यांनी भाजपवर केली आहे. यावेळी त्यांनी रमेश बिधुरी (Ramesh Bidhuri) यांच्या लोकसभेतील अभ्यतेवरही टीका करत भाजप (BJP) महत्वाच्या मुद्यावर निवडणूक लढवू शकत नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे. त्यामुळेच रमेश बिधुरींसारखे लोक संसदेत अशा प्रकारची विधाने करु शकतात असा गंभीर आरोप त्यांनी भाजपवर (BJP) केल  आहे.

ADVERTISEMENT

मुख्य मुद्यांपासून लक्ष विचलित

राहुल गांधी यांनी भाजपच्या नेत्यावर टीका करत त्यांनी सांगितले की, भाजपला मुख्य मुद्यांपासूनच लक्ष विचलित करायचे आहे. त्यामुळेच भाजपचे आमदार रमेश बिधुरी आणि निशिकांत दुबे यांच्याद्वारे वाद निर्माण करून जात जनगणनेपासूनही लक्ष विचलित करु पाहत आहे असा गंभीर आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे.

कर्नाटक निवडणूक भाजपला धडा

दिल्लीतील एका माध्यम परिषदेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, भाजपला खरा धडा मिळाला आहे तो कर्नाटक निवडणुकीत. कारण ते अनेक मुद्यांवर लक्ष विचलित करु पाहत होते, तर आम्ही आमचे मुद्दे न सोडल्यामुळे कर्नाटक निवडणूक आम्हाला जिंकता आली असंही त्यांनी यावेळी सांगितले.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> ‘जनतेपेक्षा त्यांना हायकमांड…’, सुप्रिया सुळेंच्या देवेंद्र फडणवीसांना कानपिचक्या

आमची विजयला गवसणी

राहुल गांधी यांनी आगामी काळातील निवडणुकीविषयी बोलतानाही सांगितले की, तेलंगणामध्ये कदाचित काँग्रेस जिंकू शकते. त्याच प्रमाणे मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या विजयावर मोहर उमटू शकते. तसेच राजस्थानमध्ये तर आम्ही विजयाच्या फार जवळ असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

काँग्रेसने रणनीती आखली

भाजपने जरी अनेक मुद्यावरचे लक्ष विचलित करायचा प्रयत्न करत असले तरी त्यांना आम्ही आता ती संधीच देणार नाही. कारण आता काँग्रेसने आपली रणनीती आखली आहे. देशासमोरचे खरे प्रश्न हे असमानता, बेरोजगारी, ओबीसी आणि आदिवासींवर होत असलेला अन्याय हेच खरे देशातील प्रश्न आहेत. त्यामुळे यावरील लक्ष हटवण्यासाठीच प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळेच संसद अपशब्द वापरुन त्यावरून नवा वाद निर्माण करायचा आहे असा आरोपही त्यांनी भाजपवर केला आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Raghav Chadha यांचं रॉयल सासर! मेव्हणी ग्लोबल स्टार तर, सासरे…

लढा राजकीय पक्षाबरोबर नाही

खासदार राहुल गांधी यांनी सांगितले की, आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाविरुद्ध लढतच नाही. तर आम्ही भारतातील जनसामान्यांसाठी लढतो आहे. आम्हाला भारताची तयार असलेली प्रतिमा जपायची आहे. त्यासाठीच आमचा लढा सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT