Rajya Sabha Election 2024: अजित पवारांचे 'चाणक्य' असलेल्या प्रफुल पटेलांची आहे 'एवढी' संपत्ती, पण...
Praful Patel Wealth Worth: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते प्रफुल पटेल यांची नेमकी किती संपत्ती आहे हे आता समोर आलं आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांनी संपत्तीविषयी माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

प्रफुल पटेलांची किती संपत्ती?

किती कोटींचे मालक आहेत पटेल?

राज्यसभा निवडणुकीसाठी जाहीर केली संपत्ती
Praful Patel Wealth: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) राष्ट्रीय नेते प्रफुल पटेल यांनी असलेल्या खासदारकीचा राजीनाम देत जवळपास दोन वर्षांत दुसऱ्यांदा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. राज्यसभेची निवडणूक ही बिनविरोध होणार असल्यानं प्रफुल पटेल अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर जाणार आहेत. पण, याच निवडणुकीच्या निमित्ताने प्रफुल पटेल यांची नेमकी किती संपत्ती आहे हे आता समोर आलं आहे. तर जाणून घेऊयात प्रफुल पटेल हे किती कोटींचे मालक आहेत? (rajya sabha election 2024 ajit pawar ncp leader praful patel wealth worth 450 crores)
राज्यसभेसाठी सहा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यापैकी प्रफुल पटेल सर्वाधिक श्रीमंत आहेत. प्रफुल पटेल यांची जवळपास दीड वर्षांपूर्वी 400 कोटींच्या घरात संपत्ती होती. ती वाढून आता साडेचारशे कोटी रुपये झाली आहे. त्यांच्याकडील ही एकूण मालमत्ता स्थावर आणि जंगम या स्वरुपात आहे.
प्रफुल पटेलांकडे नेमकी संपत्ती आहे तरी किती?
प्रफुल पटेल यांच्याकडे 39 हजार, तर त्यांच्या पत्नी वर्षा पटेल यांच्याकडे 41 हजार आणि कुटुंबाकडे 1 लाख रुपये रोख रक्कम असल्याचं त्यांनी निवडणूक शपथपत्रात म्हटलं आहे.
याशिवाय पटेलांकडे 37 लाख 25 हजार, त्यांच्या पत्नीकडे 37 लाख 14 हजार, तर कुटुंबाकडे 76 लाख 32 हजार रुपये बँक डिपॉजिट आहे. शेअर्स पाहिले, तर पटेलांकडे 2 कोटी 79 लाख, त्यांच्या पत्नीचे 3 कोटी 53 लाख 92 हजार, कुटुंबाचे 9 कोटी 84 लाख 54 हजार रुपयांचे शेअर्स आहेत.