Ramdas Kadam : ''भास्कर जाधव गुजरात बॉर्डरपर्यंत गेले, पण...'', रामदास कदमांचा मोठा गौप्यस्फोट

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

 सुरतच्या बॉर्डवरून भास्कर जाधव मागे गेले का? याबाबत खात्री केली पाहिजे.
ramdas kadam big secret explosion on bhaskar jadhav guwahati yogesh kadam rebel shinde mla udhhav thackeray shiv sena maharashtra politics
social share
google news

Ramdas Kadam On Bhaskar Jadhav : 'गुवाहाटीसाठी भास्कर जाधव बॅग घेऊन तयार होते', असा खळबळजनक गौप्यस्फोट शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांनी शनिवारी केला होता. योगेश कदमांच्या या दाव्यानंतर आता वडील रामदास कदमांनी देखील मोठा दावा केला आहे. 'भास्कर जाधव गुजरात बॉर्डरपर्यंत आलेला', असा प्रचंड मोठा गौप्यस्फोट रामदास कदमांनी केला आहे. आता भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) म्हणणार मी गेलोच नाही, मी निष्ठावाण आहे. पण एकनाथ शिंदेंना खासगीत विचारलंच तरी ते देखील तुम्हाला सांगतील, असा दावा रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केला आहे.  (ramdas kadam big secret explosion on bhaskar jadhav guwahati yogesh kadam rebel shinde mla udhhav thackeray shiv sena maharashtra politics) 

शिवसेना नेते रामदास कदम यांनी एबीपी माझाने एक्सक्लुझिव्ह मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत रामदास कदम यांनी खळबळजनक दावा केला आहे. ''भास्कर जाधव गुजरातच्या बॉर्डरपर्यंत आले होते. पण भास्कर जाधवांना घेण्यास भाजपचा नकार होता. कारण त्यांनी मोदींची नक्कल केली होती आणि भाजपचे 12 आमदार निलंबित केले होते, असा खळबळजनक दावा रामदास कदम यांनी केला आहे. यावर आता भास्कर जाधव म्हणणार मी गेलोच नाही, मी निष्ठावाण आहे. एकनाथ शिंदेंना जरी खासगीत विचारलंच तरी तुम्हाला ते सांगतील, असे रामदास कदम यांनी सांगितले. 

हे ही वाचा : सुप्रिया सुळेंची मागणी, अजित पवारांचं लगेच उत्तर; फडणवीसांसमोर काय घडलं?

दरम्यान भाजपने नकार दिल्यानंतर शिवसेनेच्या नेतृत्वाने त्यांना सांगितले की, तुम्ही थोडे दिवस थांबा, आम्ही त्यांच मन वळवायचा प्रयत्न करतो. म्हणून सुरतच्या बॉर्डवरून भास्कर जाधव मागे गेले का? याबाबत खात्री केली पाहिजे.  उद्या उद्धव ठाकरे भाजपमध्ये गेले तर याला घेतील काही नाही यात शंका आहे. कारण भास्कर जाधवला वाटतंय उद्धव ठाकरे भाजपसोबत जातील, याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरतंय ना. भास्कर जाधवला अचानक साक्षात्कार झाला का? उद्धव ठाकरे भाजपसोबत चालले आहेत.भास्कर जाधवला कुठेतरी काहीतरी कळतंय म्हणून तो बोलतोय, असा खळबळ उडवून टाकणारा दावा देखील रामदास कदम यांनी केला. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : "घोटाळेबाज, लाचखोर", काँग्रेस नेत्याचेच गंभीर आरोप, ठाकरेंचा उमेदवार वादात

भास्कर जाधववरती कुणीही विश्वास ठेवणार नाही. कारण हा माणूस नाटकी आणि नौटंकी आहे, त्यांनी एक नाटक कंपनी काढली पाहिजे, त्यात त्यांनी काम केलं तर त्याची कंपनी खूप चांगली चालेल, तो नकलाकार आहे, आदित्य, उद्धव ठाकरे, बाळासाहेब आणि मोदी अशा सगळ्यांवरती बोलला आहे तो, आणि पुन्हा तो मी नव्हेच अशी टीका रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांच्यावर केली.

राष्ट्रवादीकडून काल आलेला भास्कर जाधव उद्धव ठाकरेंना सांगतो. 'तुम्ही जायचं नाही त्या (भाजप) पक्षामध्ये, नाहीतर मी नसेन तुमच्यासोबत...याचा अर्थ काय?  भास्कर जाधवमुळे उद्धव ठाकरे आहेत की उद्धव ठाकरेमुळे भास्कर जाधव? नेमकं काय? पक्षप्रमुखाला एक आमदार सांगतोय, तिकेड जाल तर मी नसेल तुमच्यासोबत, ही धमकी झाली? असेही रामदास कदम म्हणाले आहेत. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT