सुप्रिया सुळेंची मागणी, अजित पवारांचं लगेच उत्तर; फडणवीसांसमोर काय घडलं?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यातील राजकीय संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
सुप्रिया सुळेंना अजित पवारांनी टोला लगावत उत्तर दिले.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सुप्रिया सुळेंना अजित पवारांचं उत्तर

point

पुण्यातील कार्यक्रमात सुप्रिया सुळे-अजित पवार दिसले एकत्र

point

देवेंद्र फडणवीस यांचीही कार्यक्रमाला उपस्थिती

Supriya Sule Ajit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर अजित पवार सातत्याने शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांना लक्ष्य करत आहेत. रविवारीही याची प्रचिती आली. पुणे महापालिकेच्या वारजे येथील रुग्णालयाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र दिसले. यावेळी सुप्रिया सुळेंनी सरकारचं एका मुद्द्यावर लक्ष वेधलं. त्यावर लगेच अजित पवारांनी उत्तर देत खोचक टोला लगावला. 

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली आहे. त्यामुळे राजकीय नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीयेत. अशातच अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर आले. सुळे यांनी एक मागणी करताच अजित पवारांनी उत्तर दिले... 

सुप्रिया सुळेंनी काय केली मागणी?

झालं असं की, कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "माझ्या दोन छोट्या मागण्या महाराष्ट्र सरकारकडे आहेत. अनेक दिवस इथे नगरसेवक नाहीये. दोन अडीच वर्ष इथे निवडणुका न झाल्यामुळे आज भागातील मायबाप जनतेने कुणाकडे जावं? हा एक खूप मोठा प्रश्न त्यांच्याकडे येतो."

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> "दमदाटी केली तर गाठ सुप्रिया सुळेशी आहे", नेमका कुणाला इशारा? 

"सत्तेचं विकेंद्रीकर व्हावं जे स्वप्न यशवंतराव चव्हाणांनी पाहिलं, त्याच सत्तेचं विकेद्रीकरण करण्यासाठी एका नगरसेवकाची भूमिका ही खूप महत्त्वाची असते. त्यामुळे नगरसेवक यांची निवडणूक आपण लवकरात लवकर घेतली, तर या संपूर्ण भागातील लोकांना खूप आधार मिळेल", असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

अजित पवारांचे सुप्रीम कोर्टाकडे बोट, लगेच केला पलटवार

खासदार सुप्रिया सुळेंच्या मागणीवर बोलताना अजित पवार म्हणाले, "खरंतर दोन वर्षांपेक्षा जास्त काळ झाला, महापालिकेच्या निवडणुका थांबलेल्या आहेत. या थांबल्यात त्या सुप्रीम कोर्टामुळे थांबल्या आहेत. आम्हालाही वाटतं... आम्हीही लोकांमधून निवडून आलेले कार्यकर्ते आहोत."

ADVERTISEMENT

"वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी... जिल्हा परिषद, तालुका पंचायत, महानगरपालिका, नगर पालिका, नगरपंचायत... पण, सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसी याबद्दलचा एक मुद्दा गेलेला आहे. लवकर त्याचा निकाल लागेना."

ADVERTISEMENT

हेही वाचा >> सुप्रिया सुळेंचं 'या' पोलने वाढलं टेन्शन! अजित पवार जिंकू शकतात चार जागा 

"सातत्याने राज्य सरकार प्रयत्न करत आहे की, त्याची तारीख लागावी आणि लवकरात लवकर या निवडणुका व्हाव्यात, या मताचं महायुतीचे सरकार आहे. याची कृपया नोंद आपण सर्व सहकाऱ्यांनी घ्यावी", असे म्हणत अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना नाव न घेता खोचक उत्तर दिले. यावेळी देवेंद्र फडणवीस हे व्यासपीठावर उपस्थित होते. पण, यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रचार चांगलाच तापणार असंच दिसत आहे. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT