शिरसाटांना शिंदेंनी खडसावलं? ‘त्या’ भेटीवरून भाजपही नाराज?
sanjay shirsat visit to abhijeet dipke family : अभिजीत दिपके यांच्या कुटुंबीयांच्या भेटीला गेल्याने संजय शिरसाट अडचणीत आल्याची चर्चा आहे. भाजपची नाराजी आणि शिंदे कार्यालयातून स्पष्टीकरण मागवण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
संजय शिरसाटांना शिंदेंनी खडसावलं?
दीपकेंच्या भेटीवरून भाजपही नाराज ?
sanjay shirsat visit to abhijeet dipke family : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या कुटुंबीयांची शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी घेतलेली भेट आता महायुतीत चर्चेचा विषय ठरत आहे. या भेटीमुळे भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त समोर आले असून, त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातून संजय शिरसाट यांना फोन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. झी 24 तासने दिलेल्या वृत्तानुसार, या फोनद्वारे शिरसाट यांच्याकडे त्यांच्या भेटीबाबत स्पष्टीकरण मागवण्यात आले असून, शिंदे यांनी शिरसाट यांची खरडपट्टी काढल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, याबाबत शिवसेनेकडून कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.
हेही वाचा : राहुल गांधींनी ‘Gen Z’ साठी केलेलं K-Pop स्टाइल आहे तरी काय? Friendship Day निमित्त खास शुभेच्छा!
राजकारण आणि वैयक्तिक नातेसंबंध या दोन वेगळ्या गोष्टी - संजय शिरसाट
संजय शिरसाट हे 26 तारखेला छत्रपती संभाजीनगर येथे अभिजीत दिपके यांच्या घरी गेले होते. त्यावेळी अभिजीत दिपके दिल्लीमध्ये असल्याने ते घरी उपस्थित नव्हते. शिरसाट यांनी दिपके यांच्या आई-वडिलांची भेट घेतली आणि माध्यमांशी संवादही साधला. यावेळी त्यांनी अभिजीत दीपके यांच्या आई-वडिलांशी आपले अनेक वर्षांचे संबंध असल्याचे सांगितले. राजकारण आणि वैयक्तिक नातेसंबंध या दोन वेगळ्या गोष्टी असल्यामुळेच आपण त्यांच्या भेटीस गेलो असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी वाद सुरू असल्यामुळे आपण त्यांना भेटायला गेलो नव्हतो, असेही त्यांनी सांगितले होते.
हेही वाचा : Personal Finance: जुना फ्लॅट विकताना कोणत्या चुकांमुळे होतं सर्वाधिक नुकसान?
