लबाड लांडगा..! भ#वा म्हणत आमदार तान्हाजी मुटकुळे यांना शिवीगाळ, संतोष बांगर यांची जीभ घसरली
Santosh Bangar : हिंगोलीतील एका प्रचारसभेत शिवसेना नेते संतोष बांगर यांनी आमदार तान्हाजी मुटकुळे यांना प्रचारसभेत शिवीगाळ केल्याची घटना आहे. ही घटना 27 नोव्हेंबर रोजी गुरुवारी रात्री घडली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
संतोष बांगर यांच्याकडून शिवीगाळ
संतोष बांगर यांच्या आरोपावर तान्हाजी मुळकुटेंचे प्रत्यारोप
Santosh Bangar : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आरोपांवर प्रत्यारोपांच्या फौरी बघायला मिळत आहे. टीका टीप्पणी करताना अनेकदा नेते मंडळींना भान न राहता ते वादग्रस्त विधान करतात. अशीच एक घटना समोर आली आहे. हिंगोलीतील एका प्रचारसभेत शिवसेना नेते संतोष बांगर यांनी आमदार तान्हाजी मुटकुळे यांना प्रचारसभेत शिवीगाळ केल्याची घटना आहे. ही घटना 27 नोव्हेंबर रोजी गुरुवारी रात्री घडली.
हे ही वाचा : Astrology : काही लोकांना मिळणार कुटुंबाची साथ, तर काहींना करिअरमध्ये मिळणार यश, पण 'या' राशींचं खरं नाही
प्रचारसभेत बोलताना संतोष बांगर यांनी आमदार तानाजी मुळकुटे यांचं नाव न घेता टीकेची तोफ डागली. पण, त्याचक्षणी टीका करताना संतोष बांगर म्हणाले की, 'आमदार भ#वा लबाड' आहे. त्यांच्या या वक्तव्याने हिंगोलीच्या स्थानिक राजकारणावर नेमका कसा परिणाम होईल हे सांगता येणार नाही.
नेमकं काय म्हणाले संतोष बांगर?
ते म्हणाले की, 'माझ्या माता बहिणी जर माहेरी- सासरी गेल्यास आणि कोणी विचारलं तुम्ही कुठल्या हिंगोलीच्या का? तर तेथील लोक विचारतात तुम्ही संतोष बांगरकडचे आहात, हेच काम संतोष बांगरने केलं, पण येथील आमदार लबाड लांडगा आहे. बोलते एक चालते एक आणि करते एक. 2014 साली त्यांच्याकडे काय होतं का? आज 20 कोटींचा महल आहे. त्याने सोयाबीन विकलं की शेत विकलं या भ#व्याने?' असा सवाल करताना त्यांची जीभ घसरली.
पुढे ते म्हणाले की, 'माझ्या माता बहिणीला विनंती आहे की, तुमच्या भावाच्या घराची झडती घेण्यात आली होती. माझी तुम्हाला विनंती आहे की, 2 तारखेला तुम्हाला वाचपा काढायचा आहे. जिथे धनुष्यबाणाचं बटण दिसेल ते दाबा', असं संतोष बांगर म्हणाले. संतोष बांगर यांच्या आरोपानंतर आमदार तान्हाजी मुळकुटे यांनी प्रत्यारोप केले आहेत.










