Sharad Pawar : शरद पवारांची घोषणा! राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार

मुंबई तक

ADVERTISEMENT

sharad pawar quit from party president
sharad pawar quit from party president
social share
google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना मोठी घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याचं सांगत पवारांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षाबद्दलही त्यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे.

ADVERTISEMENT

शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती पुस्तकाचं मुंबई प्रकाशन झालं. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली. शरद पवार म्हणाले, “1 मे 1960 ते 1 मे 2023 इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता कोठेतरी थांबण्याचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.”

पवार पुढे म्हणाले, “तथापि शिक्षण, शेती, सहकार, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात अधिक काम करण्याचा माझा मानस आहे. तसेच युवक, युवती व विद्यार्थी यांच्या संघटनांकडे आणि कामगार, दलित, आदिवासी व समाजातील इतर कमकुत घटकांच्या प्रश्नांकडे माझे लक्ष राहिलं.”

हे वाचलं का?

हेही वाचा >> ‘गद्दारी झाली तेव्हा ठाकरेंना पहिला फोन सोनिया गांधींचा’, म्हणालेल्या तुम्ही…

“गेल्या 60 वर्षांत महाराष्ट्राने व आपण सर्वांनी मला खंबीर साथ व प्रेम दिले, हे मी विसरू शकत नाही. परंतू यापुढे पक्ष संघटनेच्या संदर्भात पुढील दिशा ठरवणे आवश्यक वाटते. रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सदस्यांची एक समिती गठीत करावी, असे सुचवू इच्छितो”, असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढील अध्यक्ष कोण? पक्षातील हे नेते ठरवणार

शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांची निवड करण्यासाठी एका समितीचीही घोषणा केली. या समितीमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के.के. शर्मा, पी.सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड.

ADVERTISEMENT

याचबरोबर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा फौजिया खान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष धीरज शर्मा, राष्ट्रवादी युवती काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया दूहन यांचाही समितीमध्ये समावेश आहे.

ADVERTISEMENT

अध्यक्षपदाच्या निवडीबद्दल शरद पवार काय म्हणाले?

“ही समिती अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेईल आणि पक्ष संघटना वाढीसाठी, पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोचवण्यासाठी, जनसेवेसाठी सातत्याने झटत राहिल असा मी विश्वास व्यक्त करतो.”

“माझ्या सहकाऱ्यांनो, मी अध्यक्षपदावरून जरी निवृत्त होत असलो तरी माझी सार्वजनिक कार्यातून निवृत्ती नाही. मी साठ दशकांहून अधिक काळ जनमाणसांत काम करीत आलो आहे, त्या सेवेत कुठलाही खंड पडणार नाही. उलट सार्वजनिक कार्यात मला अधिक वेळ देता येईल. मी पुणे, बारामती, मुंबई, दिल्ली अथवा कुठेही असू आपणा सर्वांसाठी नेहमीप्रमाणे भल्या सकाळपासून उपलब्ध राहिल. जनतेच्या अडीअडचणी, प्रश्न यांच्या सोडवणूकीसाठी अहोरात्र कष्ट घेत राहिल”, असं शरद पवार म्हणाले.

हेही वाचा >> “उद्धव ठाकरेंमुळेच ‘मविआ’च सरकार गेलं” : शरद पवारांचा खळबळजनक गौप्यस्फोट

“‘सततचा प्रवास’ हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. मी आपल्या भेटीसाठी सार्वजनिक कार्यक्रम, सभा – समारंभाना येत राहिल. आपणाशी संवाद साधण्यासाठी, आपल्या समस्या जाणून घेण्यासाठी, आपली गाऱ्हाणी ऐकण्यासाठी आणि सरकारकडे मांडण्यासाठी माझी पायपीट अविरतपणे चालू राहिल”, असंही पवार यांनी म्हणाले.

“जनतेचे प्रेम आणि विश्वास हाच माझा श्वास आहे. त्यामुळे आपणापासून कोणतीही फारकत नाही. मी आपणासोबत होतो, आहे व शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहणार ! त्यामुळे भेटत राहू”, असं म्हणत शरद पवार यांनी भाषणाला पूर्णविराम दिला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT